नवीन लेखन...

तलावांचे शहर ठाणे – भाग २


नमस्कार मित्रांनो, तलावांचे शहर च्या पहिल्या भागात आपण मासुंदा तलावा विषयी जाणून घेतलं. आजच्या दुसऱ्या भागात आपण जाणून घेणार आहोत अश्याच एका तलावा विषयी जो तरुणाईचं मुख्य आकर्षण आहे. म्हणजेच उपवन तलावा विषयी.

उपवन तलावाला निसर्गाची मोठी देणगी लाभली आहे, एकीकडे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा विस्तीर्ण जंगलमय परिसर तर दुसरीकडे वेगाने वाढत चाललेलं ठाणे शहर.

ठाणे रेल्वे स्टेशन वरून जर इथे यायचं असेल तर सॅटिस बस स्टॉप वरून उपवन बस जाते, त्याच प्रमाणे महापौर निवास, येऊर अशी आणखी काही बसेसही जातात.

बस ने प्रवास करीत  असताना आपल्याला रस्त्यात कॅटबरी चॉकलेट चा सुगंध जाणवायला लागतो म्हणजेच समजायचं की प्रसिद्ध कॅटबरी कंपनी आली, त्याच्याच थोडं पुढे गेलात की उजव्या बाजूला पूर्वीची रेमंड कंपनी दिसेल. बस ने पुढे प्रवास केल्यावर आपल्याला डाव्या बाजूला जंगलाकडे जाणार रस्ता  दिसेल, तिथून सुरू होतो येऊरचा परिसर, अर्थात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची सुरवात. आणि ते संपत थेट बोरिवलीच्या नॅशनल पार्क ला. जर तुम्हाला निसर्गाची आवड असेल तर तुम्ही नक्कीच येऊर च्या जंगलाला भेट द्या तुमचा वेळ  वाया जाणार नाही याची खात्री पटेल.

बरं येऊर च्या रस्त्याकडे न जाता आपल्याला उपवन तलावाकडे जाण्यासाठी सरळ पुढे प्रवास करायचा आहे, थोड्याच अंतरावर आपल्याला निसर्गाने संपन्न अस असलेलं आणि ठाण्याची एक विशेष ओळख असलेलं उपवन तलाव आपल्या नजरेस पडत. त्याच्या एका कठड्यावर बसून निवांत तलाव न्याहाळला की आपला प्रवासामुळे झालेला थकवा कुठच्या कुठे पळून जातो आणि आपण एका वेगळ्याच विश्वात हरवून जातो. थोडा आराम करून झाल्यावर तलावाची प्रदक्षिणा करायला घ्यायची.

सुरुवातीलाच प्रशस्त अस उपवनच अँपी थिएटर नजरेस पडतं. या ठिकाणी उपवन फेस्टिवल दरम्यान अनेक कार्यक्रम सादर होतात. अरे हो, आता उपवन फेस्टिवल चं नाव घेतलच आहे तर त्याविषयी थोडं सांगतो. दर वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच साधारण जानेवारी महिन्यात संस्कृती प्रतिष्ठान तर्फे काही दिवसांचा उपवन फेस्टिवल भरवला जातो, त्या कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने रसिक प्रेमी भेट देत असतात. अनेक नामवंत कलाकार इथे आपली कला सादर करण्यासाठी उत्सुक असतात. स्ट्रीट प्ले असो की पेंटिंग, गायन असो वा संगीत, प्रत्येक कलाकार आपापली कला इथे सादर करत असतो, आणि हो हा सगळा नजराणा आपल्या सगळ्यांसाठी मोफत असतो हे विशेष. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती असते ती तरुणांची, असाही हा तलाव तरुणांचा जास्त आवडता आहे. उपवन फेस्टिवल म्हणजे आजच्या काळातली मॉडर्न जत्रा, इथे मोठ्या संख्येने स्टॉल्स उभारले जातात. तुम्ही उपवन फेस्टिव्हल ला जरूर भेट द्या.

अँफि थिएटर च्या पुढे गेल्यास ठाण्याचे प्रथम नागरिक म्हणजेच महापौरांचा बंगला दिसतो. त्याच्याच बाजूला आहे उपवन मधील सर्वात प्रसिद्ध गणेश मंदिर. अनेक भाविक इथे श्रद्धेने येत असतात आणि तलावाचा निसर्गरम्य परिसराचा आनंदही घेत असतात.उपवन तलावाच्या एका बाजुला गणपती मंदिर आहे तर त्याच्या अगदी विरुद्ध बाजूला पालायदेवीचे मंदिर आहे. तसेच तलावाच्या मध्यभागी शंकराची मूर्ती सुद्धा पहावयास मिळते. तलावाची प्रदक्षिणा घेत असताना आपल्याला तलावाच्या किनारी अनेक प्रकारची फूड स्टॉल्स दिसतील. त्यांची  ग्राहकांना बसण्याची व्यवस्थासुद्धा वाखाणण्या जोगी आहे. कारण बाहेरच तलावाच्या किनाऱ्यावर त्यांनी खुर्च्या टाकून बसण्याची व्यवस्था केलेली आहे. त्याची मजा म्हणजे स्नॅक्स खाता खाता तलावाच्या रमणीय दृश्याचा आनंद घेत वेळ कसा निघून जातो हे कळत नाही.

उपवन तलावाच दुसरं आकर्षण म्हणजे इथे लहान थोरांसाठी बोटिंग ची व्यवस्था करण्यात आली आहे, संध्याकाळच्या वेळेला इथे बोटिंग करण म्हणजे एक वेगळाच आनंद आहे.

तलावाच्या बाहेरील बाजूस अनेक प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आलेली आहे त्यामुळे इथलं वातावरण नेहमीच थंड आणि आल्हाददायक असत. नागरिकांना बसण्यासाठी संपूर्ण तलावाकिनारी व्यवस्था करण्यात आली आहे. याच ठिकाणी आपल्याला हॉर्स रायडिंग च प्रशिक्षण सुद्धा  अल्प दरात शिकवलं जातं , आहे की नाही मज्जा.

तलावाची प्रदक्षिणा घालत असताना जवळ असणाऱ्या हिरवळीतून आपल्याला अनेक प्रकारच्या फुलांची झाड सुद्धा दृष्टीस पडतात, आणखी एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की इथे एक गार्डन आहे आणि त्याच नाव संगीत उद्यान अस ठेवण्यात आलय आणि हो ते नाव अगदी सार्थ सुद्धा वाटत कारण तिथे जागोजागी संगीत वाद्यांची प्रतिरूप बनवून ठेवण्यात आली आहे, त्यात हार्मोनियम आणि गिटार सारख्या वाद्यांची प्रतिकृती ठेवण्यात आलेली आहेत , यांच्या शेजारी उभे राहून अनेक जण सेल्फी घेत असतात, त्यात तरुणांचा ओढा जास्त आहे. तलाव शेजारी अनेक ठिकाणी सेल्फी पॉईंट ची निर्मित करण्यात आली आहे.

संगीत उद्यानातून बाहेर पडल्यावर थोडं पुढे गेलात की एक ओपन थिएटर आहे तिथे बसून रसिक प्रेक्षक अनेक संगीतमय कार्यक्रमाचा आनंद उपवन फेस्टिवल मध्ये घेत असतात.

उपवन तलावाच सर्वात मोठं आकर्षण म्हणजे इथून दृष्टीस पडणारा संध्याकाळचा सूर्यास्त अगदी विलोभनीय असतो. अगदी डोंगर माथ्यावर होणारा सूर्यास्त आणि त्याचं तलावाच्या पाण्यात उमटणार सुंदर अस प्रतिबिंब पाहत आपण तासनतास बसू शकतो. अस हे विलोभनीय दृश्य कॅमेरात कैद करण्यासाठी अनेक मंडळी आपल्या कॅमेरा सह इथे आलेले तुम्हाला दिसतील. अनेक प्रकारचे फोटो शूट इथे अगदी सामान्य बाब आहे.

अश्या ह्या उपवन तलावाला भेट दिल्यानंतर आपण येऊर च्या निसर्गरम्य ठिकाणाला जरूर भेट द्यावी असंही मला आवर्जून सांगावेसे वाटते, पावसाळ्यात इथलं वातावरण अगदी प्रसन्न करणार असतं. अश्या ह्या निसर्गरम्य ठिकाणी जाऊन भेट द्या वी अस तुम्हाला नक्की वाटत असेल ना …

— भैय्यानंद वसंत बागुल.

छायाचित्र सौजन्य: महेश देवलकर.

लेखकाचे नाव :
भैय्यानंद वसंत बागुल
लेखकाचा ई-मेल :
bvbagul4@gmail.com

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..