नवीन लेखन...

तुझे तुलाच अर्पण !

तुझेच घेऊनी तुलाच द्यावे,भासते ही रीत आगळी उमजत नाही काय करावे,तुझीच असतां सृष्टी सगळी वाहणाऱ्या संथ नदीतील,पाणी घेऊन अर्घ्य देतो सुंदर फुले निसर्गातील,गोळा करुन चरणी अर्पितो अन्न ग्रहण करण्यापूर्वी,नैवेद्य तुजला दाखवितो जगण्याचा तो मार्ग दोखवी,ह्याचीच पोंच आम्ही देतो विचार ठेवूनी पदोपदीं,साऱ्यांचा तूं असशी मालक दुजास देण्यातील आनंद,हाच मिळवित असे एक डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

विरोघांत मुक्ति

भक्ति करुन प्रभूसी मिळवी, दिसले आम्हा ह्या जगती । परि त्याचाच विरोध करुनी, कांही पावन होऊन जाती ।।१।। लंकाधिपती रावण याने, रोष घेतला श्रीरामाचा । जानकीस पळवून नेई, विरोध करण्यास प्रभुचा ।।२।। झाली इसतां आकाशवाणी, कंसास सांगून मृत्यु त्याचा । तुटून पडता देवकीवरी, नाश करण्या त्याच प्रभुचा ।।३।। प्रभी अवताराचे ज्ञान होते, परि विरोध करीत राही […]

नदीवरील बांध

विषण्यतेने  बघत होतो,भिंतीवरच्या खुणा काळ जाऊन वर्षे लोटली,आठवणी देती पुन्हा बसत होतो नदीकांठी,बालपणीच्या वेळी पात्र भरुनी वहात होती,गोदावरी त्या काळी सदैव पूर येउनी तिजला,गावास वेढा पडे गांव वेशीच्या घरांना मग,पाण्याचे बसती तडे चित्र बदलले आज सारे,पात्र लहान होई बांध घातला धरणावरी,पाणी अल्पसे येई खिन्नपणे खूप भटकलो,भोवतालच्या भागी चकित झाले मन बघूनी,हिरवळ जागोजागी इच्छित दिशेने पाणी वाही,बांध घातल्यामुळे सारे जीवन प्रफुल्ल करीं,आनंदमय सगळे डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

घड्याळ

घड्याळ होते भिंतीवरती टिक टिक करुन चाले सतत दिसली चाल काट्यांची एकाच दिशेने हाले   धावत होता एक तुरु तरु दुजा हळूच धांवे छोटा जाड्या मंद असून पळणे ना ठावे   पळत असती पुढे पुढे समज देती काळ-वेळेचा किती राहीला शिलकीमध्ये प्रवास आपुला जीवनाचा   जीवन चक्रापरि फिरती घड्याळ्यामधले सारे काटे जाणीव करुन देती सतत आपण […]

खरा आस्तिक

नास्तिक असूनी श्रद्धा नव्हती, ईश्वराचे ठायीं विज्ञानाची कास धरुनी ती, भटकत तो जायी // चार पुस्तके वाचूनी त्याचे,  तर्कज्ञान वाढले दृष्य अदृष्य तत्वांमधले , भेद जाणवले // नसेल त्याचे आस्तित्व कसे , तर्काला सोडूनी समजूनी ह्याला “अंध विश्वास” , देई फेटाळूनी // आधुनिक होते विचार त्याचे,  कलाकार तो होता पृथ्वीवरील घटणाना परि ,  योग म्हणत होता […]

बाळाची निद्रा

चिंव चिंव करुं नकोस चिमणे,  बाळ माझे झोपले काय हवे तुज सांग मला ग,   देईन मी सगळे कपाट सारे उघडून ठेवले,   समोर ओट्यावरी मेवा समजून लुटून न्यावे,   डाळ दाणे पोटभरी घरटी बांध तूं माळ्यावरती,   काडी गवत आणूनी कचरा म्हणूनी काढणार नाही,   ही घे माझी वाणी नाचून बागडून खेळ येथे,    निर्भय आनंदानें परि शांत न बसलीस तूं […]

फुलझाडाचे स्वातंत्र

उगवले होते जंगलात ते उंच माळावरी रंग आकर्षक फुलझाडांचे मन प्रसन्न करी // जरी होता उग्रवास तयाला मधूरता आगळी खेचित होते सौंदर्याने फुलपांखरे जवळी // वनराईचा पुष्कराज तो डोलत होता आनंदे ऐकत होता मान हलवूनी कोकिळेची पदें // वर्षा विपूल प्रकाश विपूल आणिक तो वारा स्वच्छंदाचे भाव उमटवित वाढवी स्वैर पसारा// कुणीतरी आला वाटसरु तो घेउन […]

भूतदया जागविली

चिंव चिंव करीत चिमणा चिमणी,खोलीमध्ये माझ्या आली अवती भवती नजर टाकून,माळ्यावरती ती बसली वाचन करण्यात रंगून गेलो,लक्ष्य नव्हते तिकडे आश्चर्य वाटले बघून मजला,काड्या गवताचे तुकडे घरटे बांधण्या रंगून गेली,आणती कडी कचरा मनांत बांधे एकच खुणगांठ,तयार करणे निवारा भंग पावता शांत वातावरण,वैताग आला मला कचरा आणि घरटे काढून,खिडकीतुनी  फेकला काम संपवूनी सांज समयी,घरी परत मी आलो त्याच चिमण्या तसेच घरटे,पाहून चकित झालो पहाट होता चिमण्या उडाल्या,काढून टाकले घरटे असेंच चालले कित्येक दिवस,परी जिद न सोडी ते चार दिवसाची सुटी घालउन,गांवाहून परतलो घरटे बघता संताप येऊन,मुठी  वळवूनी  धावलो घरट्या मधूनी चिमणी उडाली,बसली पंख्यावरती चिव चिव करुनी विनवू लागली,दया दाखवा ती परी मी तर होतो रागामध्ये,चढलो माळ्यावरी मन चरकले बघून अंडी,छोट्या […]

आई

कशासवे तुलना करुं गे आई, तव प्रेमाची कां शब्द न सुचतां म्हणू तुजला,    ‘ प्रेमची ‘ वात्सल्याची देवता, करुणा दिसे नसानसातूनी हात फिरवीता ज्याचे वरती, ह्रदय येते उचंबळूनी जेव्हां पडते संकट, आठवण करितो आपली आई विश्वासाचे दोन शब्द,  उभारी त्यासी देई नऊ मास असता उदरीं, शक्ति तेज आणि सत्व देई ते ह्याच ईश्वरी गुण बिजानी, वाढ […]

कन्येस निराश बघून

कशास घेतला जन्म मुली तूं, आमचे पोटीं समजत नाहीं काय गे लिहीले, तुझ्या ललाटीं झेप तुझी दिसून आली, जन्मापासूनी चतूरपणें तूं मान उंचावली, स्व-गुणांनी तोकडे पडतो सदैव आम्ही, देण्या तुज संधी खंत वाटते मनांस ह्याची, कधी कधी उपजत गुण हे जोपासावे, कळते सारे कांहीं झेप तुझी आणि झेप आमची,  विसंगत राही असे उमलणारे फूल उद्याचे, तूं […]

1 15 16 17 18 19 26
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..