नवीन लेखन...

स्वागत…. नववर्षाचं

अख्ख्या जगात हजारो कालगणन पध्दती आहेत, त्यांच्या दिनदर्शिका आहेत, त्यांचे अनुयायी वर्षानुवर्षे नववर्ष दिवस नियमितपणे साजरे करीत आहेत आणि अेकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा देअून, नवीन किंवा ठेवणीतले पोशाख घालून मेजवान्या झोडीत आहेत. […]

‘जात’ म्हणजे काय?

जात हा शब्द, संस्कृत जन..जा..म्हणजे जन्म घेणे या क्रियापदापासून आलेला आहे. त्यापासूनच. जन, जनता, जनक, जननी, पूर्वज, वंशज वगैरे शब्द आलेले आहेत. […]

पृथ्वीचं पुस्तक

आपली पृथ्वी कधी निर्माण झाली? तिच्यात कोणकोणती स्थित्यंतरं घडली? तिचं आणि तिच्यावर राहणार्या सजीवांचं अस्तित्व किती काळ टिकणार आहे? आणि शेवटी पृथ्वीचा अंत कधीकाळी आणि कशारितीनं होणार आहे? हे प्रश्न, मानव विचार करू लागला तेव्हापासूनच त्याला सतावीत आहेत आणि तो या प्रश्नांची अुत्तरंही तेव्हापासूनच शोधतो आहे. […]

विज्ञानाच्या दृष्टीकोनातून भगवद् गीता

भगवद् गीता या, सुमारे 5 हजार वर्षांपूर्वी सांगितल्या/लिहिल्या गेलेल्या महान ग्रंथावर आतापर्यंत हजारो विद्वानांनी भाष्य केलं आहे आणि अजूनही अनेक विद्वानांना निराळ्या दृष्टीकोनातून भाष्य करावसं वाटतं आहे. गीतेच्या  18 अध्यायात वेदोपनिषदांचं तत्वज्ञान सामावलेलं आहे. गीता म्हणजे अुपनिषदांचं सार आहे असं मानलं जातं. गीता लिहून सुमारे 5 हजार वर्षांचा काळ अुलटला आहे. या काळात, विशेषत: पंधराव्या-सोळाव्या शतकांपासून […]

देहदान हाही अेक अंत्यसंस्कारच

कोणताही सजीव मरण पावला म्हणजे त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणे, पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून, आवश्यक असते. मानवी पार्थिवावर धार्मिक विधिनुसार अंत्यसंस्कार केले जातात. वैद्यकीय महाविद्यालयाच्या अॅनाॅटॉमी विभागाला, वैद्यकीय अभ्यासासाठी देहदान करणे हाही अेक अंत्यसंस्कारच आहे या विषयी या लेखात चर्चा केली आहे. […]

शनिवारचा सत्संग : ५

देहिनः अस्मिन्यथा देहे कौमारं यौवनं जरा | तथा देहांतर प्राप्तिः धीरः तत्र न मुह्यति ||२:१३|| देहिन:: देहधारि आत्म्याला, अस्मिन् :: यात, देहे :: शरीरामध्ये, कौमारम् :: बालपण, यौवनं :: तारुण्य, जरा :: म्हातारपण, देहान्तर :: देहाचे स्थित्यंतर, धीर: :: धैयवान पुरूष, न मुह्यति :: मोहित होत नाही. येथे धैर्यवान माणूस म्हणजे, विवेकी, ज्ञानी माणूस असा घ्यावयाचा […]

विज्ञानीय दृष्टीकोनातून भगवत् गीता – अ. २ श्लो १२

आपण, म्हणजे वर्तमानकाळातील पिढी आणि महाभारतकाळातीलही पिढी, आपल्या म्हणजे त्यांच्याही पूर्वजांच्या रुपात अस्तित्वात होते, महाभारतकाळातील माणसेही, त्यांच्या वंशजांच्या स्वरूपात आजही अस्तित्वात आहेत आणि आपण सर्वजण, पृथ्वीवर सजीव जगू शकतात तो पर्यंत, आपल्या उत्क्रांत झालेल्या वंशजांच्या स्वरूपात अस्तित्वात असणारच आहोत, हे खर्‍या अर्थाने समजणे कठीण आहे असे मला वाटते. यासंबंधीच या लेखात चर्चा केली अअहे. […]

सजीवांच्या शरीरातील आनुवंशिक तत्व

मागच्या पिढीशिवाय पुढच्या पिढीचा जन्म होत नाही हे विज्ञानीय सत्य आहे. याची चर्चा आपण मागच्या आठवड्यात केली. मागच्या पिढीचा जन्म, मागच्याच्या मागच्या पिढीचा जन्म, मागच्याच्या मागच्याच्या मागच्या पिढीचा जन्म …… ही साखळी अशीच चालू होती म्हणूनच माझा जन्म होअू शकला. मी आणि माझ्या बायकोनं, आमच्या अपत्यांना जन्म दिला. त्या अनुषंगानं केलेली ही कविता वाचा आणि त्यावर […]

माझा जन्म… आत्म्याचा आनुवंशिक तत्व सिध्दांत – २

सजीव, त्यांची पुनरुत्पादन यंत्रणा आणि त्यांचा जन्म, या विषयी विचार करता करता काही कवितां स्फुरल्या. त्यापैकी काही येथे देत आहे. कारण त्या, माझ्या … आत्म्याचा आनुवंशिक तत्व सिध्दांताशी संबंधीत आहेत. माझा जन्म….. माझा जन्म हा …. माझ्या आअीबाबांचा निर्णय होता. या पृथ्वीवर …. जन्म घेण्याशिवाय मला दुसरा पर्यायच नव्हता …. प्रत्येक सजीवाच्या बाबतीत हे अगदी खरं […]

आत्म्याचा आनुवंशिक तत्व सिध्दांत – १

माझी तत्वसरणी कदाचित कुणालाही सहजासहजी पटणार नाही, याची मला पूर्ण जाणीव आहे. तरीपण ती सर्वाना सांगण्याचा मोह टाळता येत नाही. विचारांची दिशा म्हणजे विचारसरणी….तसेच तत्वांची दिशा म्हणजे तत्वसरणी असा अर्थ समोर ठेअून मी हे लेख लिहिले आहेत. जेव्हा मानव भोवतालच्या निसर्गाचं निरीक्षण करू लागला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की, निसर्गातील घटना घडण्यामागं प्रचंड शक्ती आणि कमालीची […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..