नवीन लेखन...

आकाशातील कापूस

कपाशीचे  ढीग अगणित विखुरले  दिसती आकाशीं मानव येथें उघडा  असूनी वस्त्र  अपुरें दिसे अंगाशी   ।।१।।   कोठे आहे कापड गिरणी वस्त्र जेथें बनत असें दयावान तूं मालक असतां त्रोटक कापड निघे कसे   ।।२।।   पाठव तूं तो वस्त्रांचा कोठा लाज  राखण्या मानवाची गरीब बिचारा विवस्त्र तो कीव करावी वाटे त्याची   ।।३।।   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०

 गर्भातील अभिमन्यू

श्रीकृष्ण सांगतो सुभद्रेला, चक्रव्युंहामधली रचना, हुंकार मिळे त्याला, सुभद्रा झोपली असताना ।।१।।   गर्भामधले तेजस्वी बाळ, ऐकत होते सारे काही, जाण आली त्याची कृष्णाला, वळूनी जेव्हा तो पाही ।।२।।   चक्रव्यूहांत शिरावे कसे, हेच कळले अभिमन्यूला, अपूरे ज्ञान मिळोनी, घात तयाचा झाला ।।३।।   गर्भामधला जीव देखील, जागृत केंव्हां होवू शकतो, खरा ज्ञानी तोच असूनी, सुप्तावस्थेत […]

दृष्टीची भ्रमंति

बालपणीच्या काळामध्यें, दृष्टी आमची आकाशीं लुकलुकणारे तारे बघतां, गम्मत वाटे मनी कशी       १   चमके केव्हां मिटे कधी कधी, लपंडाव तो त्यांचा वाटे फुलवित होते आशा सारी, वेड तयांचे आम्हास मोठे      २   वाटत होते भव्य नभांगण, क्षितीजाला जाऊनी भिडले भिंगऱ्यांचा तो खेळ खेळतां, सर्व दिशांनी नयनी भरले    ३   मोहक भासे विश्व भोवती, भिरभिरणाऱ्या दृष्टीपटाला […]

निसर्गाचे मार्ग

आखून देतो निसर्ग सदा, मार्ग जीवनाचे त्या वाटेवरी चालत रहा,  आवाहन त्याचे…..१ चालत राहती जे जे  कुणी, त्यावरी विसंबूनी यशस्वी होती तेच जीवनी,  समाधान लाभूनी….२ कर्ता समजूनी काही काही,  अहंकारी होती सुख दु:खाच्या चक्रामध्ये,  तेच सापडती….३ भटकत जाती भिन्न मार्ग,  काही कळापरि परिस्थितीचे चटके बसता,  येती वाटेवरी….४ हिशोबातील तफावत ही,  दु:खाचे कारण नजीक जाता आखल्या मार्गी,  सुखी […]

शक्य आहे का ते ?

आज हे आकाश मजला,  थोटके का भासते झेप घेण्या पंख फूटतां,  हाती येईल काय ते ? उंच हा गिरीराज देखूनी,  शिखर चढावे वाटते चार पावले टाकतां क्षणी,  चढणे सोपे काय ते ? अथांग सागर खोल जरी ती,  डूबकी घ्यावी वाटते जलतरण कला अवगत होता,  सूर मारणें जमेल कां ते? काव्य सरिता वाहात आहे,  ज्ञान गंगोत्री भासते केवळ कविता […]

काव्यानुभव

फळ आज हे मधूर भासते, तपोबलातील अर्क असे कष्ट सोसले शरिर मनानें, चिज तयाचे झाले दिसे….. बसत होतो सांज सकाळी, व्यवसाय करण्या नियमाने यश ना पडले पदरी. केव्हा मान फिरविता नशीबाने…. निराश मन सदैव राहूनी, मनीं भावना लहरी उठती शब्दांना आकार देवूनी, लेखणी मधूनी वाहू लागती… लिहीता असता भाव बदलले, त्यात गुरफटलो पुरता छंद लागूनी नशाच […]

ग्रह परिणाम

वळून बघता पूर्व आयुष्यी,  प्रखरतेने हेची जाणले घडले नाही कधीही ते ते, हवे असूनी मनी योजीले….१ सभोवतालची देखूनी स्थिती,  आखती योजना कल्पकतेने खेळामधली चाल नियतीची,  ध्यानी न येते दुर्दैवाने…..२ मार्ग तिचे हे ठरले असूनी,  बांधलेले इतर जीवांशी अपूर्व योजना निसर्गाची,  कळेल कुणाला सहज कशी….३ जाळीतल्या धाग्याची टोके,  गुंतली असती ग्रह गोलाशी फिरता फिरता खेच पडे,  वा […]

जखमांचे वण

किती खाल्ला मार, किती खाल्या शिव्या याची गणतीच नव्हती. एकच गोष्ट सतत कानी पडत होती. उनाड आहे, बावळट आहे, धडपड्या आहे, तडफड्या आहे, मूर्ख कुठचा. भडीमार होत होता आईकडून शब्दांचा.. आम्ही होतो बालपणीच गांधीवादी. एका गालांत कुणी मारली तर दुसरा गाल पुढे करणारे. मुकाट्यानें मान वर न करता सारे शब्द पचविणारे. खेळणें, कुदणें, उड्या मारणें, त्यातच […]

चिमणीची निद्रा मोड

‘पहाट झाली, चिव चिवते चिमणी उमज येईना, उठविले तिजला कोणी…..१, आई आहे कां ? जी उठवी शाळेसाठी, गुदगुदल्या करूनी कुरवाळिते हळूंच पाठी….२, घड्याळ उठवी घण घण करूनी नाद घरट्यामधुनी, नाही ऐकला असा निनाद.’..३, ‘ उषाराणी  येते, साऱ्यांची आई बनूनी प्रेमानें मोडी झोंप, नाजूक करकमलांनी…..४, घड्याळ आमचे, दवबिंदू पडतां पानावरूनी चाळविती निद्रा, टपटप आवाज करूनी’ …..५ डॉ. […]

काळाची चाहूल

जो जो येईल पाया खालती, तुडविला जातो त्याचक्षणी कुणी मरावे अथवा जगावे, सारे प्रभूवर अवलंबूनी….१, भक्ष्य शोधण्या किटक चाले, तसाच फिरतो प्राणी देखील जगण्यासाठी फिरत असता, मृत्यूची येते त्याला चाहूल…२, चालत असतो काळ सदैव, दाही दिशांनी घिरट्या घालीत झडप घाली अचानक तो,  जो जो येई त्याच्या टापूत…३, जरी दिसे मारक कुणीतरी,  करवूनी घेतो काळच सारे विश्वाचा […]

1 2 3 14
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..