कोकणातील भाजपचा ८० च्या दशकातील एकमेव चेहरा आप्पा गोगटे

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे देवगड विधानसभा मतदारसंघातून सलग चार वेळा विधानसभेत नेतृत्व करणारे आप्पा गोगटे यांनी उभ्या हयातीमध्ये जनतेप्रती वडीलकीचे नाते जपले. आप्पा गोगटे सदरा, धोतर अशा साध्या वेशातील आमदार मंत्रालयात एखाद्या ठिकाणी जात असे तेव्हा नवागतास ते आमदार आहेत, याचा भासही कधी झाला नाही. पराकोटीची साधी राहणी, संयमी पण ठाम वक्तृत्व, वडीलकीचे नातं जपणारी व्यक्ति अशी अनेक वैशिष्ट्यं त्यांच्याबाबतीत सांगता येतील. […]