नवीन लेखन...

जोसेफ रडयार्ड किपलिंग

ब्रिटिश कथाकार, कवी आणि कादंबरीकार व मोगली व जंगलबुकचे लेखक जोसेफ रडयार्ड किपलिंग यांचा जन्म ३० डिसेंबर १८६५ रोजी मुंबई येथे झाला. जोसेफ रडयार्ड किपलिंग हे रडयार्ड किपलिंग या नावानेच प्रसिद्ध होते. जोसेफ रडयार्ड किपलिंग हे पाच वर्षांचा झाल्यावर त्याला आई-वडिलांनी इंग्लंडला शिकण्यासाठी नेलं होतं. पुढे ते वयाच्या १८व्या वर्षी पुन्हा भारतात परतले आणि त्यांनी पत्रकारिता केली. […]

मराठीतील प्रसिध्द शाहीर पिराजी रामजी सरनाईक

मराठीतील प्रसिध्द शाहीर पिराजी रामजी सरनाईक यांचा जन्म २८ जुलै रोजी झाला. शाहीर तिलक, शाहीर विशारद आणि करवीर दरबारचे शाहीर व ‘लहरी हैदर गुरूजी माझे शीघ्र कवी थोर! त्यांच्या कृपेने शाहीर पिराजी पोवाडा लिहिणार!’असे म्हणणा-या पिराजी रामजी सरनाईक या शाहिराने आपल्या खडय़ा आवाजात अनेक चित्रपटांतून, नाटकांतून, वीररसाने ओथंबलेले पोवाडे म्हटले आणि पिचलेल्या मनगटातही जान आणली, छातीत स्फुरण आणले. कोल्हापुरात […]

मातब्बर मराठी चित्रपट दिग्दर्शक दत्ता धर्माधिकारी

मातब्बर मराठी चित्रपट दिग्दर्शक दत्ता धर्माधिकारी यांचा जन्म २ डिसेंबर १९१३ रोजी कोल्हापूर येथे झाला. महाविद्यालयीन शिक्षण चालू असताना मा.दत्ता धर्माधिकारी कोल्हापूरचे प्रसिद्ध गायक वामनबुवा पाध्ये यांच्याकडे शास्त्रोक्त गाणे शिकायला जात. ‘प्रभात फिल्म कंपनी’त त्यांना नोकरी मिळाली. ‘प्रभात’मध्ये त्यांना ‘टाईमकीपर’ची ‘हजेरी मास्तर’ नोकरी मिळाली. ‘प्रभात’मध्ये त्यावेळी कुठल्याही कर्मचार्याचला चित्रपटात एखादी किरकोळ भूमिका करावयास सांगत. काही मंडळी अगदी हौसेनं […]

भारताच्या अंतराळ युगाचे शिल्पकार विक्रम साराभाई

भारताच्या अंतराळ संशोधनाचे पितामह आणि भारताच्या अंतराळ युगाचे शिल्पकार विक्रम साराभाई यांचा जन्म १२ ऑगस्ट १९१९ रोजी झाला. विक्रम साराभाई यांचे वडील हे एक उद्योगपती होते. शिवाय ब-याच राजकीय व्यक्तिंशी त्यांचे संबध असल्याने त्या लोकांचे (रविंद्रनाथ टैगोर, जवाहरलाल नेहरू, सरोजनी नायडू , महात्मा गांधी) त्यांच्या घरी जाणे-येणे होते. त्यामुळे खरंतर विक्रम साराभाईंना उद्योग क्षेत्रात अथवा राजकारणात जम बसवण्यासाठी […]

कवि मा.मंगेश पाडगावकर

कवि मंगेश पाडगावकर यांचा जन्म १० मार्च १९२९ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे झाला. शाळेत असल्यापासूनच मराठीवर त्यांचं प्रेम जडलं आणि वयाच्या १४ व्या वर्षापासूनच ते कविता करू लागले. कविवर्य वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज आणि बा. भ. बोरकर यांचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता. परंतु, पाडगावकर एका साच्यात कधीच अडकले नाहीत. त्यांनी स्वतःची शैली निर्माण करून मराठी […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..