नवीन लेखन...

लेखक आणि दिग्दर्शक सय्यद अली रझा

आन, अंदाज, मदर इंडिया, रेश्मा और शेरा, राजा जानी आणि दस नंबरी यासारख्या हिट चित्रपटांच्या पटकथा त्यांनी लिहिल्या होत्या. १९६८ मध्ये त्यांना सरस्वतीचंद्र सर्वोत्कृष्ट संवाद लेखक म्हणून त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. १९७५ मध्ये त्यांनी प्राण जाये पर वचन ना जाये या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. […]

जेष्ठ गीतकार तन्वीर नकवी

तन्वीर नकवी यांचे खरे नाव सय्यद खुर्शीद अली. तन्वीर नकवी यांचे वंशज मूळचे इराणचे. १९४० च्या दशकात तन्वीर नकवी यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत गीतकार म्हणून सुरुवात केली. त्यांनी पाकिस्तानमध्ये जाण्यापूर्वी सुमारे २०० हून अधिक चित्रपटांसाठी गीत लिहिले. […]

बॉलिवूडमध्ये ८० चे दशक गाजवणारी अभिनेत्री पद्मीनी कोल्हापुरे

पद्मिनी कोल्हापूरे… हिंदी चित्रपटसृष्टीत नाव कमावणारी मराठमोळी अभिनेत्री. ‘प्रेम रोग’,’आहिस्ता आहिस्ता’,’वो सात दिन’,’विधाता’ अशा विविध सिनेमातील भूमिकांनी पद्मिनी कोल्हापूरे यांनी रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. त्यांच्या चेह-यावरील निरागसपणा, आकर्षक आणि घायाळ करणारं सौंदर्य यामुळे ८०च्या दशकात पद्मिनी कोल्हापूरे यांची वेगळीच जादू होती. […]

ज्येष्ठ अभिनेते शरद तळवलकर

शरद तळवलकर हे नाव मराठी चित्रपटसृष्टीशी निगडित असले तरी त्यांचे स्वतःचे नाट्यवेड हे प्रख्यात होते. नाटकाप्रमाणे चित्रपटातदेखील शरद तळवलकरांनी महत्त्वपूर्ण भूमिका केल्या. लाखाची गोष्ट, पेडगावचे शहाणे, तुळस तुझ्या अंगणी, रंगल्या रात्री अशा अखेर जमलं, वाट चुकलेले नवरे, बायको माहेरी जाते, मुंबईचा जावई आणि एकटी अशा कितीतरी गाजलेल्या चित्रपटातून त्यांनी भूमिका केल्या. […]

ज्येष्ठ संगीतकार, गीतकार यशवंत देव

केवळ गीतकार आणि संगीतकार एवढेच ‘शब्दप्रधान गायकी’चे पुरस्कर्ते यशवंत देवांचे कर्तृत्व नाही. ते उत्तम संगीत शिक्षक व संगीत संयोजक होते, काव्याचे डोळस अभ्यासक होते. चित्रपटांप्रमाणेच नाट्यक्षेत्रातील त्यांचे योगदान लक्षणीय आहे. चाळीसहून अधिक नाटकांसाठी त्यांनी गीत, संगीत, पार्श्वसंगीत देण्याची जबाबदारी सांभाळली आहे. […]

सुप्रसिद्ध लेखिका योगिनी जोगळेकर

गायिका, कवयित्री, नाटककार व सुप्रसिद्ध लेखिका योगिनी जोगळेकर यांचा जन्म ६ ऑगस्ट १९२५ रोजी पुणे येथे झाला. योगिनी जोगळेकर यांनी बी.ए.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यावर १९४८ ते १९५३ या काळात त्यांनी शिक्षिका म्हणून नोकरी केली. तसेच ‘राष्ट्रसेविका समिती’च्या माध्यामातून त्यांनी अनेक वर्ष सामाजिक कार्यही केले. याच काळात त्यांनी विविध कथा, कादंबरीतून स्त्रीविषयक लेखन केले. त्यांचे काही काव्यसंग्रह व […]

वर्ल्ड व्हेगन डे

दरवर्षी १ नोव्हेंबरला संपूर्ण जगभरामध्ये World Vegan Day साजरा करण्यात येतो. व्हेगन डायट म्हणजे प्राणिजन्य अन्नपदार्थांचा संपूर्ण त्याग. ही आहारशैली पाळणारे लोक दूध, तूप, अंडी हे पदार्थ देखील खाण्यास वर्ज्य मानतात. हे पदार्थ मिळवताना हिंसा होते असा त्यांचा सिद्धांत आहे. […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..