नवीन लेखन...

संगीत सौभद्र – अण्णासाहेब किर्लोस्करांची अजरामर कलाकृती

नाटककार अण्णासाहेब किर्लोस्करांचे १८ नोव्हेंबर १८८२ साली रंगभूमीवर आलेलं ‘संगीत सौभद्र’ हे नाटक आज तब्बल १३५ वर्षांचा प्रदीर्घ काळ लोटूनही तितक्याच आवडीनं रसिक उचलून धरतात यातच या नाटकाची अभिजातता दडलेली आहे. कलावंतांच्या अनेक पिढय़ांनी आपल्या गान-अभिनयानं हे नाटक तोलून धरलं, त्यात आपले रंग मिसळले आणि तरीही ‘संगीत सौभद्र’ची जादू कधीच ओसरली नाही. […]

बंदिशकार पं. बबनराव हळदणकर तथा श्रीकृष्ण हळदणकर

बंदिशकार पं. बबनराव हळदणकर तथा श्रीकृष्ण हळदणकर यांचा जन्म २७ सप्टेंबर १९२७ रोजी झाला. पं. हळदणकर यांनी संगीतविषयक संशोधन आणि लेखनही केले होते. आग्रा घराण्याचे गायक आणि बंदिशकार म्हणून पंडित बबनराव हळदणकर यांची ओळख होती. मा.हळदणकरानी ५० वर्षांहून अधिक काळ शास्त्रीय गायनाने संगीतप्रेमींना मंत्रमुग्ध केले. रस पिया हे त्यांचे टोपणनाव होते. ते नव्वदीच्या वयातही संगीताची साधना […]

काव्यतीर्थ हणमंत नरहर जोशी तथा कवी सुधांशु

काव्यतीर्थ हणमंत नरहर जोशी तथा कवी सुधांशु यांचा जन्म ६ एप्रिल १९१७ रोजी झाला. कवी सुधांशु यांनी आध्यात्मिक (प्रामुख्याने दत्तविषयक) आणि मुलांसाठीची अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. १९३७ पासून सुधांशु यांनी काव्यलेखनास प्रारंभ केला. त्यांच्या कविता किर्लोस्कर, स्त्री, मनोहर आदी मासिकांतून प्रसिद्ध होत होत्या. या कवितांचे पुढे पुस्तकरूपाने संग्रह झाले. मराठी कवी कुंजविहारी यांनी ह. न.जोशी यांना सुधांशु […]

निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते, पद्मश्री व्ही.शांताराम

निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते, पद्मश्री व्ही.शांताराम यांचा जन्म १८ नोव्हेंबर १९०१ रोजी कोल्हापूर येथे झाला. शांताराम राजाराम वणकुद्रे उर्फ व्ही. शांताराम हे भारतीय चित्रपट सृष्टीतलं सुवर्णाक्षरांनी लिहिलं गेलेलं नाव. शांताराम बापू या नावानं ते ओळखले जात. निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता अशा तिन्ही क्षेत्रांत त्यांनी आपला खोल ठसा उमटवला. दिग्दर्शक म्हणून अनेक नवीन संकल्पना त्यांनी पहिल्यांदा भारतीय चित्रपटसृष्टीत वापरल्या. जवळजवळ […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..