नवीन लेखन...

मुद्राराक्षस : आधुनिक काळातला..

हल्ली हा जुना मुद्रा राक्षस मोबाईलवर भेटू लागलाय. पुन्हा पुन्हा आणि वारंवार. मुद्रा राक्षस हे नांव सर्व काम छपाईच्या मशिनवर व्हायचं त्या काळातलं आहे. सध्या टायपिंगचा काळ असल्याने याला ‘टायपो डेमाॅन’ म्हणावं का, की त्याला आणखी कुठलं मराठी नांव द्यावं हे कळत नाही. […]

शब्दांची पालखी – भाग तीन

मला पुढं ‘किशोर’ गवसला आणि वेड लावता झाला. २४ पानांची करमणूक आणि लोकसत्ता चांदोबामुळे मनाची घडवणूक नकळत सुरु असतानाच, बोरकरांच्या त्या अस्तावस्त घरात मला चांदोबाचं अधिक शहाणं भावंड म्हणता येईल असा ‘किशोर’ हाताशी लागला. ‘किशोर’ने माझ्या खांद्यावर मित्रासारखा हळूच हात टाकून, मला आजुबाजूला दिसू शकणाऱ्या माझ्याच जगातल्या गोष्टी सांगायला सुरुवात केली. ‘किशोर’मधल्या कथा माझ्याच वयाच्या मुलांच्या असायच्या. कथेतल्या मुलांचं वय साधारण माझ्याइतकंच असल्याने त्या कथा मनाला भावायच्याही.. चांदोबापेक्षा किशोरचं आकारासहीत असलेलं हे वेगळं जग मला आवडत होतं. […]

शब्दांची पालखी – भाग दोन

‘लोकसत्ते’मुळे लागलेली वाचनाच्या गोडीला ‘चांदोबा’ने खतपाणी घातलं. वाचावं कसं, ते मला चांदोबाने शिकवलं. चांदोबाने माझं भावविश्व समृद्ध केलं. ….चांदोबातून ओळखीच्या झालेल्या रामायण, महाभारत, शिवलिलामृत, वेताळ पंचविशीतील कथा पुढे थोड्याशा मोठ्या वयात संपूर्ण वाचून काढल्या, त्या याच पद्धतीेने. कळत फार नव्हतंच, परंतू त्यातलं नाट्य मात्र मोहवत होतं. […]

शब्दांची पालखी – भाग एक

मला अगदी मी वाचायला शिकलो, त्या वेळेपासूनच वाचायची आवड लागली होती. तेंव्हा परिस्थिती यथातथाच. आमचीच नव्हे, तर बहुतेक सर्वच कुटूंब गरीब म्हणता येतील अशीच. वाचायची आवड शाळेच्या पुस्तकांवर भागवायची कारण इतर पुस्तकं मिळणं अशक्यच होतं. संस्कृतीत सण ही एकच गोष्ट असायची, वाचन वैगेरेही संस्कृतीचा भाग आहे, हे कुणाच्या गांवीही नसायचं. पुस्तकं सोडा, रोजचा पेपर मिळणंही दुरापास्त असायचं. पेपर न घेणं यासाठी, परवडत नाही हे एकच कारण असायचं. […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..