नवीन लेखन...

कंप्यूटरच्या “कोबोल” या भाषेची निर्माती ग्रेस हॉपर

संगणकविज्ञान आत्मसात करून “प्रोग्रॅमिंग’मध्ये अजरामर योगदान देणाऱ्या ग्रेस मरे हॉपर या पहिल्या महिला शास्त्रज्ञ! आपल्या असामान्य बुद्धीवैभवाने त्या अमेरिकन नौदलातल्या पहिल्या “नेव्हल ऑफिसर’ ठरल्या. संगणकशास्त्र आणि नौदलातील महत्त्वपूर्ण योगदानासाठी नावाजलेली ज्येष्ठ महिला शास्त्रज्ञ म्हणजे रिअर ऍडमिरल ग्रेस मरे हॉपर. संगणक प्रोग्रॅमिंगच्या भाषेची पहिली संकलक अशी ग्रेसची ओळख आहे. […]

१ जानेवारी २००२ – युरोपातील चलनबदल

१ जानेवारी २००२ या दिवशी युरो या चलनानं त्या-त्या देशाच्या मूळ चलनाची जागा घेतली. म्हणजेच जर्मनीत १० मार्कची नोट घेऊन आता कुणी बाजारात गेलं तर त्या चलनाला काही अर्थ उरला नव्हता. फक्त युरोमध्येच सगळे व्यवहार होणार असं आता ठरलं होतं. यामुळे आता १२ देशांमधल्या साधारण ३० कोटी जनतेला फक्त युरो हे एकच चलन वापरायचं होतं. […]

हिदुस्थानी संगीतातील जयपूर घराण्याचे श्रेष्ठ गायक मल्लिकार्जुन मन्सूर

हिदुस्थानी संगीतातील जयपूर घराण्याचे श्रेष्ठ गायक मल्लिकार्जुन मन्सूर यांचा जन्म १ जानेवारी १९११ रोजी झाला. मन्सूरांचे आरंभीचे शिक्षण ग्वाल्हेर घराण्याचे बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचे शिष्य पं. नीळकंठबुवा यांच्याकडे झाले. जयपूर घराण्याचे उस्ताद अल्लादियाखाँ यांचे पुत्र मंजीखाँ आणि भूर्जीखाँ यांच्याकडे त्यांनी पुष्कळ वर्षे तालीम घेतली. मन्सूर यांनी अवघड गायकीला मुलायमपणा आणला व लोकभिमुख संगीत दर्जेदार नसते, हा विचार चुकीचा ठरविला. जयपूर घराण्याचे […]

शंकर वासुदेव किर्लोस्कर तथा ‘शं. वा. कि.’

शंकर वासुदेव किर्लोस्कर तथा ‘शं. वा. कि.’ यांचा जन्म ८ ऑक्टोबर १८९१ रोजी झाला. शंकर वासुदेव किर्लोस्कर यांचे वडील सोलापुरातील पहिले पदवीधर डॉक्टर होते. त्यांना यंत्रकलेची अफाट आवड होती. किर्लोस्कर कंपनीने या वेळी कडबा कापण्याचे यंत्र बनविले होते. त्याची जाहिरात बनविण्याचे काम शंकररावांना देण्यात आले. दोन बैलांचे संभाषण. एक बैल या यंत्राने कापलेला कडबा किती स्वच्छ असतो हे […]

बॉलिवूडची अभिनेत्री सोनाली बेंद्रे

बॉलिवूडची अभिनेत्री सोनाली बेंद्रेचा जन्म १ जानेवारी १९७५ रोजी झाला. सोनालीने करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली. सोनाली बेंद्रेने अभिनेत्री म्हणून १९९४ मध्ये आलेल्या झालेल्या ‘आग’ सिनेमातून पदार्पण केले होते. सोनालीला उत्कृष्ट नवोदित अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. मात्र, सोनालीचे फिल्मी करिअर काही खास राहिले नाही. तिने अनेक मेगाबजेट आणि मल्टीस्टार सिनेमांत काम केले. सोनाली सिनेमांत हवे तसे यश मिळवू शकली नाही […]

कृष्णधवल सिनेमा काळातील जेष्ठ नटी व गायिका उमा देवी खत्री उर्फ टूनटून

कृष्णधवल सिनेमा काळातील जेष्ठ नटी व गायिका उमा देवी खत्री उर्फ टूनटून यांचा जन्म १ जानेवारी १९२३ रोजी झाला. टूनटून यांचे खरे नाव उमा देवी खत्री होते. १९४०-४५ चा काळ होता, रम्य अशा दिवसातली ती सकाळची वेळ होती, संगीकार नौशादजी आपल्या आशियाना या घरात हार्मोनियमवर गाण्याचे स्वर काळ्या पांढरीच्या शृंगारात बसवत होते. इतक्यात त्यांच्या दारावर थाप पडली. पाठोपाठ आणखी […]

बहुप्रसव लेखक राजा राजवाडे

बहुप्रसव लेखक राजा राजवाडे यांचा जन्म १ जानेवारी १९३६ रोजी देवरूख जवळच्या निवे बुद्रुक येथे झाला. राजा राजवाडे यांच्या वडीलाचं देवरूखला हॉटेल होतं. व पूर्वापार चालत आलेली निवे गावात शेती होती. हा एक कौटुंबिक पार्श्वभूमीचा भाग आहे. बाबांचं मॅट्रिकपर्यंतच शिक्षण, देवरूखच्या‘न्यू इंग्लिश स्कूलमधून झाल्यानंतर, राजा राजवाडे पुढील शिक्षणासाठी मुंबईल आले. राजा राजवाडे यांचे शिक्षण मुंबईतील खालसा कॉलेज […]

रघुनाथ अनंत माशेलकर

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन महामंडळ या संघटनेचे माजी अध्यक्ष रघुनाथ अनंत माशेलकर यांचा जन्म १ जानेवारी १९४३ रोजी झाला. रघुनाथ अनंत माशेलकर यांना रमेश माशेलकर या नावानेही ओळखले जाते. रघुनाथ माशेलकरांचा जन्म कोकणातल्या माशेल गावाचा. बालपण मुंबईत गेलं. मुंबईतल्या पालिकेच्या शाळेतल्या शिक्षकांनी माशेलकरांचं आयुष्य घडवलं. त्यांच्या आई, हे त्यांचं प्रमुख प्रेरणास्थान! शिवणकाम किंवा मिळेल ते काम करुन माशेलकरांच्या आई […]

ज्येष्ठ संवादिनीवादक अप्पा जळगावकर

तब्बल साठहून अधिक वर्षांच्या तपश्चर्येतून संवादिनी या वाद्याला प्रतिष्ठा मिळवून देणारे आणि अनेक दिग्गज गायक-वादकांना आपल्या अलौकिक प्रतिभेने समर्थ साथ देऊन मैफली रंगविणारे ज्येष्ठ संवादिनीवादक अप्पा जळगावकर यांचा जन्म १ जानेवारी १९२२ रोजी जालना येथे झाला. श्रुतीप्रधान भारतीय संगीतात मिंडयुक्त स्वर आणि श्रुती केवळ सारंगीसारख्या तंतुवाद्यातूनच मिळू शकतात, या कल्पनेने संवादिनीला दुय्यम वागणूक देण्यात येत असताना संवादिनीमधून स्वरविकास […]

जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर

जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचा जन्म १ जानेवारी १९५१ रोजी झाला. नाना पाटेकर यांचे मूळ नाव विश्वनाथ पाटेकर. नाना पाटेकर यांचे वडील दिनकर पाटेकर हे चित्रकार होते. नाना मुंबईतील जे.जे. स्कूल ऑफ आर्ट’चे विद्यार्थी होते. नाना पाटेकर यांनी ’गमन’ या १९७८ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून चित्रसृष्टीत पदार्पण केले. ही भूमिका इतकी छोटी होती की ते प्रेक्षकांच्या नजरेतही आले नाहीत. […]

1 2
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..