देवभूमीतील पंचबद्री – विशालबद्री किंवा बद्रीनाथ – भाग 3
बद्रीनाथपासून साधारण ३ कि.मी. अंतरावर मूर्तीमातेचे मंदीर आहे. सहस्रकवच राक्षसाचा वध करण्यासाठी श्रीविष्णूंनी नर-नारायणाच्या रूपात मूर्तीमातेच्या उदरात प्रवेश केला व भूतलावर प्रगट झाले. त्यामुळे मूर्तीमाता बद्रीनाथाची आई समजून तिची पूजा केली जाते. मूर्तीमातेच्या मंदिराला माता मंदीर म्हणतात. वामन द्वादशीच्या दिवशी बद्रीनाथाची व मातेची भेट घडवून आणली जाते. शृंगारलेली बद्रीनाथाची चांदीची चतुर्भूज उत्सवमूर्ती वाजत गाजत या ठिकाणी […]