नवीन लेखन...

मंचक महात्म्य – डोहाळे आणि भीमा काकी !

जगाच्या पाठीवर मंचकरावांसाठी सर्वात कठीण काम म्हणजे ‘विचार करणे ‘ हेच होते , आणि वारंवार ते त्यांना करावे लागत असे . आत्ता हि ते आपल्या झुपकेदार मिशीचे डावे टोक चिमटीत धरून विचारमग्न झाले होते . चिंतेचे कारण होते कि ‘ भीमा काकीस अर्जेंट कसे बोलावून घावे ?’ असे काय कारण होते कि भीमा काकीस पाचारण करण्याची […]

गोष्ट एका ‘ Post ‘ ची

साली एक साधी पोस्ट सुचू नये ? गणूला आजवर असा कधी प्रश्न पडला नव्हता . आता तुम्हाला ‘हा कोण बुवा , गणू ?’ असा प्रश्न पडला असेल . जर तुमचे फेसबुक असेल तर प्रश्नच नाही . तुम्ही त्याला ओळखत असणारच .! कारण त्याचा फे बु मित्रांची संख्या पावसाळ्यात तुंबलेल्या गटारा प्रमाणे ओसंडून वाहत आहे .! म्हणून ‘गणूच्या गप्पा ‘ नावाचे पेज सुरु केले . तेही लोकल लोकनेत्याच्या ढेरी प्रमाणे दिवसेंदिवस फुगतच आहे . शिवाय तो दहा बारा ग्रुपचा तो ऍडमिन आहे ! यात तुम्ही कोठे तरी असणारच कि ! […]

‘पिंपळ्या’ ! एक लघुकथा

‘जिंदगीमे क्या खाना तो -दम -खाना , और क्या करना तो -आराम -करना ‘ हे नागूचे लाडके तत्व . कामाचा प्रचंड कंटाळा . खाऊन झोपणे . झोपेतून उठून पुन्हा खाणे . याच साठी तो जन्माला होता ! तो म्हणजे साक्षात आळस ! पण यालाही एक कारण होते . […]

‘ती’ तिच्या सोबतच !

मला खूप लहानपणा पासून चष्मा लागलाय ,म्हणजे लावायला लागला . याला माझे क्रिकेटचे वेड कारणीभूत होते . असेन दहा बारावर्षाचा ,फॉरवर्ड शॉर्ट लेग माझी फिल्डिंग पोझिशन , नेहमीचीच . तेव्हा आजच्या सारखी हेल्मेट्स नव्हती . […]

मंगळ – एक लघुकथा

नाना हे गावातील प्रसिद्ध व्यक्तीमत्व. नानांच्या नावातच दोनदा ‘ना’ असल्यामुळे त्यानी कधी कोणाला नंतर ना म्हटलेच नाही. नानांच वय साधारण 60 वर्षे पण नाना आजही 10 वर्ष वयाच्या बालकांपासुन तर मरणासक्त झालेल्या म्हाताऱ्यां पर्यंत उत्तम पध्दतीने जुळवून घेतात ते नानांच मोठ कौशल्यच म्हणाव लागेल. […]

डिनर – एक लघुकथा

गाडी चालवता चालवता त्याने डॅश बॉर्डरवरल्या घड्याळावर नजर टाकली . रात्रीचे अकरा वाजून काही मिनिटे झाली होती . डोक्यात नुकत्याच झालेल्या पार्टीची धुंदी होती . पण तो परफेक्ट कंट्रोल मध्ये होता . रस्ता तसा निर्मनुष्यच होता . रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या दिव्यांची निमुळती होतजाणारी रांग आणि त्यातला तो रस्ता एखाद्या स्वप्नातल्या दृष्या सारखा मोहक दिसत होता . […]

टॅक्सी !

शंकर मुडकेचा बेचव चहा आणि तिखटजाळ सामोसा खाल्ल्याशिवाय आमच्या ऑफिसात कोणीच कामाला सुरवात करत नाही . तसा तो खाऊन आम्ही रोजच्या प्रमाणे आजही सुरवात केली . पण आज काहीसा वेगळाच दिवस होता . […]

गोष्ट वाईट मुलाची आणि गोष्टीतला वाईट मुलगा

तो एक वाईट मुलगा होता . ‘आदर्श कथा ‘ मधल्या वाईट मुलाच्या गोष्टीतल्या सारखाच . गोष्टीतल्या मुलाचे नाव राम असते ,पण याचे नाव शाम होते . गोष्टीतल्या गोष्टी सारखी याची परिस्थिती कधीच नव्हती . म्हणजे गोष्टीतल्या रामाची आई , म्हातारी , थकलेली , अंथरुणाला खिळलेली . ‘ आता माझ मरण जवळ आलंय ! माझ्या माघारी तुझं कस होणार ?तुला कोण पहाणार ? तुझे लाड कोण करणार ? तू शाळेतून आल्यावर तुला -गाजर का हलवा -कोण करून देणार ? तुला झोपताना अंगाई कोण म्हणणार ? ‘असं म्हणून घळाघळा रडणारी असते . ( तशी ती लवकर मरत नाही म्हणा ! ) […]

शॉक

साला वैताग आहे !  आज पुन्हा निर्मलेने कडकड केली ! आमच्या लग्नाला आता या चोवीस  मेला पाच  वर्ष होतील .अजून तिच्या स्वभावात काही फरक पडत नाही . तशी ती भांडकुदळ नाही , पण भडक माथ्याची मात्र  आहे . कधी कधी फारच लावून धरते , लहान मुलांसारखं . हल्ली तिला भडकायला कसलंही कारण चालत , इतकंच काय […]

1 2 3 4
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..