नवीन लेखन...

कुटुंब !

भव्य मंडप उभारण्यात आला होता. मुख्य प्रवेशद्वारावर कानापर्यंत थोबाड फाकवलेल्या, उर्मटचेहऱ्याच्या माणसाचा हात जोडलेला, पांढऱ्याशुभ्र कपड्यातला, बाराफुटी कट आऊट बोर्ड, स्वागताला उभा केला होता. डीजेच्या भिंती, आणि बाकी — वेगळं काहीच नव्हतं. नेहमीची लगीन घाई, माणसांची वर्दळ, तेच ते. […]

प्रेमात? वाट्टेल ते! (लघुकथा)

वाट पहाणं किती त्रासदायक असत, हे समीरला आज पुन्हा जाणवलं. ‘साल, या पोरींना वेळच महत्वच नसत!’ त्याने सातव्या वेळेला आपल्या मनगटावरील घड्याळातवर नजर टाकली. आख्खे वीस मिनिट, तो या प्रेमदान हॉटेलच्या लॉन वर अंजलीची वाट पाहत होता! धिस इज टू मच! वेटर दोनदा ऑर्डरसाठी घुटमळून गेला होता. […]

कायाकल्प!

आज कौसल्याबाईंना ते पुन्हा जाणवले. पांघरून नेहमीचेच होते. पूर्वी कधी, ते झोपताना डोक्यावरून घेतले की, पाय बाहेर जात नसत. हल्ली बरेचदा पाय बाहेर जात होते. काहीतरी बदलत होत. नक्की काय हे त्यांना कळेना. आज डॉक्टरांना सांगायला हवं.  […]

झुंज !

जर तुम्हाला त्यांच्या स्वप्नात जाण्याची परवानगी असती तर, भास्करराव चिकाटीने त्या वाघाशी झुंज देताना दिसले असते! कोणी तरी मदतीला येई पर्यंत त्यांना त्या जनावराला थोपवणे भागच आहे!! […]

पाठलाग एका स्वप्नाचा !

समोरच्या भिंतीवरचे घड्याळ रात्रीचे दोन वाजल्याचे दाखवत होते. कुठूनस एक वटवाघुळीच  पिल्लू, त्या बेडरूम मध्ये घुसलं होत आणि खोलीभर भिरभिरत होत. चारदोनदा भिंतीवर धडकून ते शेवटी झिरो बल्बवर विसावले. बहुदा बेडरूमची खिडकी उघडी राहिली असावी. त्याच्या पाठोपाठ अजून चार सहा वटवाघुळे त्या खोलीत आपल्या पंखाची फडफड करत घुसली. त्या सर्वांची डोळे पेटल्या निखाऱ्यासारखी लाल भडक होते. पंखांच्य फडफडीचा आवाज होतच राहिला, कारण लाल भडक डोळ्याची संख्या वाढत होती! खोलीतील उजेड त्यांच्या पंखानी अडल्यामुळे सर्वत्र गच्चं अंधार झाला होता. त्या काळ्या पंखानी त्या खोलीतला कण ना कण व्यापून टाकला. तरी पंखाच्या फडफडीचा आवाज कमी होत नव्हता.  […]

मारेकरी!

“श्लोका! हि स्वीटी! माझी होणारी बायको! महत्वाचं म्हणजे हि ‘वास्को’ लीकरवाले पाखरे यांची कन्या आहे!” सुमितने नाटकी ढंगात स्वीटीची ओळख, श्लोकाला करून दिली. लीकरच्या बॅरल सारख्या ‘स्वीटी’ने दोन्ही हात जोडून नमस्कार केल्या सारखा केला.  […]

कथा काळोखाची !

महाराज कृष्णकुंभांनी राजकुमारी कृष्णाकडे नजर टाकली. आज काहीतरी बिनसल्याचे त्यांच्या लक्षात आले होते. त्यांना काय समस्या आहे हे त्यांनीच विचारावे हि महाराजांची अपेक्षा होती. म्हणून ते वाट पहात होते. कृष्णा उद्याच्या, या महाकाय सामराज्याच्या एकमेव उत्तराधिकारी होत्या. त्याना तीक्ष्ण बुद्धीचे वरदान मिळालेले होते. पण अजून पोर वयाचं. अनुभव नगण्यच होता.  […]

मुक्ती दूत

मी चोचीने पंखात अडकलेली ती शुष्क काडी काढून टाकली. चोचीनेच पंखाची पिस सारखी केली. तेव्हड्यात माझे लक्ष समोर गेले. तो लिंग देह एका वृद्ध स्त्रीचा होता. मी माझ्या एकुलत्या एक डोळ्याने निरखून पहिले. तीने साधारण साठी ओलांडलेली होती. म्हणजे बऱ्यापैकी जगलेली होती. खात्यापित्या घरची असावी. तरी पण ती दुःखी दिसत होती. […]

रॉक ! …. (लघुकथा)

राकेशने ‘त्या’ कामा साठी दहा डिसेम्बर हि तारीख ठरवून टाकली.तेव्हा कोठे त्याला थोडे हलके वाटले.  हवी असलेली पूर्व तयारी,(म्हणजे प्लॅनिंग ) झाली होती. आता फक्त अम्मलबजावणी! […]

प्लीज येवू दे ना !

बाहेरच चमकदार निळसर आकाश,त्या खाली नुकताच पिंजलेल्या कापसासारखे पांढरे शुभ्र ढग,सुनीलला विमानाच्या खिडकीतून दिसत होते. खिडकीशेजारचा विमानाचा पंखा,त्या मावळतीच्या सोनेरी सूर्य प्रकाशात तळपत्या तलवारीच्या पात्या सारखा भासत होता. ‘विरोध करणाऱ्याला कापून काढीन ‘ असा त्याचा अविर्भाव होता. […]

1 2 3 4
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..