मारेकरी!

“श्लोका! हि स्वीटी! माझी होणारी बायको! महत्वाचं म्हणजे हि ‘वास्को’ लीकरवाले पाखरे यांची कन्या आहे!” सुमितने नाटकी ढंगात स्वीटीची ओळख, श्लोकाला करून दिली. लीकरच्या बॅरल सारख्या ‘स्वीटी’ने दोन्ही हात जोडून नमस्कार केल्या सारखा केला.  […]

कथा काळोखाची !

महाराज कृष्णकुंभांनी राजकुमारी कृष्णाकडे नजर टाकली. आज काहीतरी बिनसल्याचे त्यांच्या लक्षात आले होते. त्यांना काय समस्या आहे हे त्यांनीच विचारावे हि महाराजांची अपेक्षा होती. म्हणून ते वाट पहात होते. कृष्णा उद्याच्या, या महाकाय सामराज्याच्या एकमेव उत्तराधिकारी होत्या. त्याना तीक्ष्ण बुद्धीचे वरदान मिळालेले होते. पण अजून पोर वयाचं. अनुभव नगण्यच होता.  […]

मुक्ती दूत

मी चोचीने पंखात अडकलेली ती शुष्क काडी काढून टाकली. चोचीनेच पंखाची पिस सारखी केली. तेव्हड्यात माझे लक्ष समोर गेले. तो लिंग देह एका वृद्ध स्त्रीचा होता. मी माझ्या एकुलत्या एक डोळ्याने निरखून पहिले. तीने साधारण साठी ओलांडलेली होती. म्हणजे बऱ्यापैकी जगलेली होती. खात्यापित्या घरची असावी. तरी पण ती दुःखी दिसत होती. […]

रॉक ! …. (लघुकथा)

राकेशने ‘त्या’ कामा साठी दहा डिसेम्बर हि तारीख ठरवून टाकली.तेव्हा कोठे त्याला थोडे हलके वाटले.  हवी असलेली पूर्व तयारी,(म्हणजे प्लॅनिंग ) झाली होती. आता फक्त अम्मलबजावणी! […]

प्लीज येवू दे ना !

बाहेरच चमकदार निळसर आकाश,त्या खाली नुकताच पिंजलेल्या कापसासारखे पांढरे शुभ्र ढग,सुनीलला विमानाच्या खिडकीतून दिसत होते. खिडकीशेजारचा विमानाचा पंखा,त्या मावळतीच्या सोनेरी सूर्य प्रकाशात तळपत्या तलवारीच्या पात्या सारखा भासत होता. ‘विरोध करणाऱ्याला कापून काढीन ‘ असा त्याचा अविर्भाव होता. […]

फरिश्ता !

रात्रभर ड्रायव्हिंग करून थकलेल्या रहिमने आपली टॅक्सी नेहमीच्या जागी पार्क केली. तिच्या महा.xx/०७८६ या नंबर प्लेटच्या खाली बारीक अक्षरातीत ‘फरिश्ता’ या शब्दा कडे पाहून तो समाधानाने हसला. आता रात्री नउ साडेनऊ पर्यंत निवांत होते. रहिम रात्रीच टॅक्सी चालवत असें. […]

भयानक स्वप्न !

रात्रीचे किती वाजलेत माहित नाही. पण सर्वत्र निजानीज झाली होती. रात्रीची भयाण शांतता आणि गारवा जाणवत होता. मी अंधारातच अंथरुणावर पडल्या पडल्या डोळे किलकिले करून पहिले आणि कोनोसा घेतला. मधेच जाग कशाने आली? लक्षात येत नव्हते. कसलीतरी खाडखूड ऐकू आली. बहुदा अशाच आवाजाने झोपमोड झाली असावी. पुन्हा तोच खड्खुडीचा आवाज. […]

हे सार थांबवा ! प्लीज !!

ती, एक नखशिखान्त पांढऱ्या रंगात रंगवलेली, सरकारी दवाखान्याच्या तळघरातील खोली होती. फार तर दहा बाय बाराची. त्यात त्या कॉटने,ज्यावर मला आता त्या नर्सने बांधले तो,निम्या पेक्षा ज्यास्त जागा व्यापली होती.  त्या खोलीला एकही खिडकी किंवा झरोका नव्हता. फक्त भिंतीशी एकरूप झालेला एक  दरवाजा होता.  तो ही पांढरा फटक! […]

थ्रिल !

‘कर्ता करविता परमेश्वर आहे !’ या तत्वावर दृढ विश्वास असणारा मी माणूस आहे. माझ्या मनात जी भावना उत्त्पन्न होते ‘ती ‘हि  तोच करतो.मग त्याच्या कृतीची संकल्पना आणि अंमलबजावणी योजना माझ्या मेंदूत तयार होते.अशा प्रकारे ती माझ्या कृतीत उतरते. सर्वांच्या बाबतीत अशीच प्रक्रिया असावी. फक्त त्याचे श्रेय मी देवाला देतो ,आणि इतरजण ‘मी केले!’ किवा ‘मी करून दाखवले का नाही ?’म्हणून आपलाच ढोल बडवून घेतात! […]

स्वयपाकिण कोठे मिळेल ? वेताळ कथा

नाना झिपऱ्या हेकटच. त्याने पुन्हा खांद्यावर प्रेत घेतले. आणि तो स्मशानाची वाट चालू लागला. चार सहा पावले नसतील टाकून तोच नानाच्या नाकाला उंची डिओचा वास आला. लोगोलाग वेताळाने प्रेतात प्रवेश करून संभाषण चालू केले. “बँकेच्या कर्जांवरी व्याजा प्रमाणे तुझा हेकटपणा वया बरोबर चक्रवाढ दराने वाढत चाललाय. तू स्वतः बरोबर मला पण त्रास देतोयस. माझे काय जातंय […]

1 2 3 4