नवीन लेखन...

फरिश्ता

रात्रभर ड्रायव्हिंग करून थकलेल्या रहिमने आपली टॅक्सी नेहमीच्या जागी पार्क केली. तिच्या महा.xx/०७८६ या नंबर प्लेटच्या खाली बारीक अक्षरातीत ‘फरिश्ता’ या शब्दा कडे पाहून तो समाधानाने हसला. आता रात्री नउ साडेनऊ पर्यंत निवांत होते. रहिम रात्रीच टॅक्सी चालवत असें. आज पुन्हा ‘पाव भाजी’वरच भागवावे लागणार होते.तो दगडूदादाच्या गाड्याजवळच्या बाकड्यावर विसावला. “दगडूदादा, एक पाव भाजी दे दे […]

किस्सा रघ्याचा !

दुपारची उन्ह करकर तापली होती. रेल्वे स्टेशनच्या दादऱ्याखाली, ते दोन मळक्या, फाटक्या कपड्यातले भिकारी सावली धरून बसले होते. नुकतीच बाराची प्यासिंजर निघून गेली होती. ‘धंद्याच्या’ दृष्टीने त्यांचा हा ‘भाकड’ पिरेड होता. त्या मुळे ते दोघे ‘सुख -दुःखाच्या’ गप्पा मारत असावेत असे, पहाणाऱ्यांना वाटत होते. आणि ते खरे हि होते. ज्यास्त कमाई(विना सायास ) म्हणजे ज्यास्त सुख हे त्यांच्या जीवनाचे सूत्र होते! हाच त्यांच्या गप्पांचा विषय पण होता.  […]

केतकी ! (लघुकथा)

सरस्वती विद्यालयाच्या (मुलींची शाळा ) तीन माजली इमारतीच्या पायऱ्यांत, पाचवीतल्या मुलींचा एक घोळका बसला होता. तो घोळका कसल्या तरी गप्पात रंगून गेला होता. त्यात ती, चार दिवसाखाली आलेली नवीन मुलगी, गालावर गोड खळी असलेली, केतकी, पण होती. नवीन असल्यामुळे वर्गातील इतर मुलींच्या फारश्या ओळखी झाल्या नव्हत्या, तरी ती त्या ग्रुपच्या गप्पा एकात होती.  […]

बांड मस… (बोलीभाषेतील लघु कथा)

सोमवारी रातीच्यान जरा गडबड होती घरात. मोठ्या म्हशीला डब्बल भरडा घाल, उरल्या सुरल्या शिळ्या भाकरी मोडून घाल अशी धावपळ गंवडीमामा करत होता. शेलका चारा फक्त त्या मोठ्या म्हशीला घातला व उरलेल्या खंडोरभर 8 जनावरांसनी नुसतं पिंजरावर बसविलं.. ह्या सर्व धावपळीच्या मागच गम्य मला त्या रातीला उमगलचं नाही. त्यानंतर असच सहज फेरी मारून येवूया म्हणून दोन दिवसांनंतर […]

त्या रात्री !

वयाच्या साठीकडे झुकलेले वामनराव तसे मोठे शिस्तीचे भोक्ते. नियमित वागणे, मृदू बोलणे.  मुलगी, स्वाती (जर्मनीत),  मुलगा, शेखर आय.आय.टी. (फायनलला ), पुण्यात कोथरूड सारख्या भागात स्वतंत्र बांगला. एकंदर ते एक ‘आदर्श जेष्ठ नागरिक ‘ होण्याच्या बेतांतले, उच्च माध्यम वर्गीय गृहस्थ.  […]

रात्र अजून भिजत होती !

…… तशा हि परिस्थितीत शशांकचे लक्ष गादीजवळच्या लाईटच्या पोलवरील ‘पोल क्रमांक १७’ने खेचून घेतले. जणू ‘आहे ना लक्षात हा क्रमांक?’ हाच प्रश्न तो हि शशांकला विचारत होता! जन्मजात एक पाय विकसित न झालेलं, दोन्ही डोळ्याच्या पापण्या नसलेलं कुरूप मुलं शशांक(आणि शिखातरी) कस सांभाळणार होता? म्हणून त्याने शिखास ‘मृत मुलं’ जन्मले म्हणून सांगितले होते. […]

वेडा घुम्या !

लहानपणा पासून मी कमी बोलणारा आणि एक्कलकोंडा आहे. लोक माझी खिल्ली उडवतात मला पाहून खिदी -खिदी हसतात. मला वाईट वाटत. मग मी त्यांच्या पासून दूरच रहातो. माझ्या अश्या वागण्याने घरचे लोक मला ‘घुम्या’ म्हणू लागले , मग बाहेरचे पण याच नावाने बोलावू लागले! आज माझी हीच ओळख आहे. घुम्या !! […]

1 2 3 4
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..