नवीन लेखन...

गेले द्यायचे राहून…..

स्वतःच्या केबिन मध्ये अनय शांतपणे बसून होता. त्याला कारणही तसंच काहीसं होतं पैसा, पॉवर, स्टेटस मिळवताना खूप काही निसटून गेलं होतं. वळून मागे बघितल्यावर त्याला जाणवलं की या सगळ्या चढाओढीत आपण आपल्या माणसांना हरवून बसलोय. […]

ऑफर ! (कथा)

कोर्ट, हॉल मध्ये दाखल झालं तसे, आत्तापर्यंत चालू असलेली कुजबुज एकदम शांत झाली. हॉल मधील सर्व व्यक्ती आदराने उभ्या राहिल्या. कोर्ट, स्थानापन्न झाल्यावर, सगळे जण खाली बसले. एक न्यायनिष्ठुर जज म्हणून, कोर्टात श्रीकांतचा दरारा होता.  […]

सहल !

उन्हाळा संपता, संपता आभाळात ढगांची उपस्थिती जाणवू लागली कि, आमच्या वश्याचे मन बेचैन व्हायला सुरु होत. त्यानं पावसाची एखादी सर येऊन गेली तर, विचारायलाच नको! हा महिना, महिना मुडक्याच्या टपरीकडे न फिरकणार, दिवसातून तीन, तीन चकरा मारतो. ‘अल्ते कारे ते दोघे?’, म्हणजे मी अन शाम्या, म्हणून मुडक्याला भंडावून सोडतो. तर या वश्याचे आणि पावसाळ्याचे काही तरी कनेक्शन आहे? पण नेमकं काय? तेच तर आज तुम्हाला सांगणार आहे! […]

निरोप्या!

उंच्यापुऱ्या भारदस्त विष्णुपंतांनी शेजारच्या तांब्याच्या पेल्यातले पाणी, तोंड वर करून नरड्यात ओतले. पांढऱ्याशुभ्र धोतराच्या सोग्याने, ओल्या मिश्या साफ केल्या. गरमागरम चहा बशीत ओतून मन लावून पिला. चहा पिताना, अभिमानाने आपल्या वाडलोपार्जीत, भव्य दगडी तटबंदी असलेल्या वाड्यावरून समाधानाने नजर फिरावी. हत्तीवर अंबारीत बसून त्यांचे पूर्वज, या समोरच्या वीतभर रुंद भरीव लोखंडी दाराच्या कमानीतून येत असत! […]

स्वप्नबंध (कथा)

स्नेहा … वय वर्ष ३२..व्यवसायाने फिटनेस ट्रेनर . शहरातल्या एका नामांकित जिम मधली एक कुशल फिटनेस ट्रेनर म्हणून ती प्रसिद्ध होती. स्नेहा ने अनेकांना फिटनेस फ्रीक करून सोडलेलं…लोकांना व्यायामाची गोडी कशी लावायची याची स्नेहाला उत्तम जाण होती आणि म्हणूनच तिला इतर ठिकाणहून खूप ऑफर्स येत असत. पण जिथे पहिली संधी मिळाली त्या कामालाच सर्वस्व मानून तिथेच कार्यरत रहायचयं आणि बाकी कामं फ्री लान्स पद्धतीने सुरु ठेवायची असं  तिचं ठरलेलंच होतं. मुळात चार दगडांवर पाय ठेवण्याचा तिचा स्वभाव नव्हताच मुळी . एक काम घेऊन त्यातच झोकून देण्याची तिची वृत्ती अनेकांना भावत असे. […]

भुजंगाची गर्लफ्रेंड! – ‘माझ्या नेटक्या गोष्टी’ – १५

आजचे त्यांचे ‘लक्ष्य’ होते ‘चार्मी!’ ‘चार्मी’ म्हणजे भुजंगरावांची लेटेस्ट गर्ल फ्रेंड! सुंदर, तरुण, स्मार्ट, मॉडर्न! (बाकी वर्णन तुमच्या कल्पना शक्तीवर सोडतो.) […]

खोटारडी आई! – ‘माझ्या नेटक्या गोष्टी’ तुन – १४

जगदीशची आई म्हणजे नंबर एकची खोटारडी बाई होती. अशी खोटारडी ‘आई’ जगाच्या पाठीवर नसेल, हे माझे नाही तर, जगदीशचेच म्हणणे आहे! आयुष्यभर (अर्थात तिच्या) ती आपल्या लाडक्या जगूला खोटंच बोलत आली म्हणे! […]

नो सॉरी! – ‘माझ्या नेटक्या गोष्टी’ तुन – १३

प्रत्येक पोराला ‘पराठे’ आणि मुलींना ‘कराटे’ आले पाहिजेत. हि आजची गरज होऊ पहात आहे. बेफिकीर मायबाप, मोकाट पोर, नवतारूण्याचा माज(जोश असायला हवा!) हे कोण अन कस आवरायचं? प्रश्न आपलेच आहेत. आज दारात असतील. उद्या घरात येतील! उत्तर शोधायला हवीत. […]

1 2 3 4
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..