वृंदावन (लघुकथा)

आई-बाबांच्या आठवणींनी समृद्ध घर निव्वळ आपल्याला जमत नाही म्हणून आपण विकायला निघालो हा विचार येताच तो खजिल झाला. या व्यवहारी जगात उच्च रहाणीमान सांभाळायच्या नादात आपण किती मग्न होतो. […]

अंतरपाट (लघुकथा)

अंतरपाट धरताच भुतकाळात रमण्यामागचं कारणही तसच होतं. कारण हा अंतरपाट “श्रीमंतीचा ताणा”आणि “गरिबीचा बाणा”ह्या धाग्यांनी गुंफला होता.कालिंदीच्या बाबांच्या उदात्त विचारसरणीमुळे श्रीमंत-गरीब ही दरी भरून निघाली होती. […]

सप्तपदी – लघुकथा

हसता हसता रमाकांतांनी सप्तपदीची शेवटची सुपारी ढकलली ती शेवटचीच ठरली. अवघ्या महिन्याभरात सगळा खेळ संपला होता. […]

मी गांधारी

आज पुन्हा चिडचिड झाली. मोबाईल जागेवर नव्हता. कारण शुल्लक होते. कळत होते. पण वळत नव्हते. हे हल्ली नेहमीचच झालय. बुद्धीने विचार करण्याच्या वेळी, भावनेच्या आहारी जातो. मग मूड जातो, मग डिप्रेशन येते, मग स्वतः ला दोष, पुन्हा चिडचिड! या वर मी एक उपाय शोधलाय. उपयुक्त आहे. असा मूड ऑफ झाला कि, मी माझे सारे पेंटिंगज् जमिनीवर […]

कोट

मला या लग्ना -कार्या बद्दल काही मूलभूत प्रश्न आहेत. जसे लग्नातले भटजी दाढी का करत नाहीत?, (हल्ली भटजीला एकटं वाटूनये म्हणून नवरदेव पण दाढी ठेवतात म्हणे !),अश्या कर्यात, बहुतौन्श बायका निळ्या रंगाच्या साड्या का घालतात? वगैरे वगैरे. तसेच लग्ना – कार्यात, पिवळा किंवा मोतिया रंगाचा नेहरू शर्ट आणि विजार घालून उगाच मांडवात लुडबुड करणाऱ्यांची एक जमत […]

दाम्या !

दाम्याच्या उल्लेखा शिवाय माझे अन त्याचे बालपण पूर्ण होणार नाही. दाम्या माझ्या पाचवीला पुजलेला! म्हणजे पाचवी पासूनचा वर्ग मित्र, ते थेट म्याट्रिक (मी ) होईपर्यत एकाच शाळेत.तो सातवीत, मी एस. एस. सी. होईपर्यंत थांबला. मी कॉलेज साठी आणि त्याने बाह्य जगातून ज्ञानार्जना साठी शाळा सोडली. दाम्या चांगला माझ्या पेक्षा तीन -चार वर्षांनी मोठा. सॉलिड काळे चिप्प […]

अब्दुल !

परवा टी.व्ही. वर ‘तानी’ सिनेमा पहिला. त्यातील सायकल रिक्षा पाहून मला माझ्या परळीतीलवास्तव्याची आठवण झाली. चाळीस -पन्नास वर्षापूर्वीचा तो काळ होता. त्याकाळी ‘पब्लिक ट्रांस्पोर्ट ‘ साठी देवांनी दिलेले दोन पाय किंवा सायकल रिक्षा असायची.फटफटी, जीप हि खूपच श्रीमंती वहन. सामान्यांसाठी विरळच! या सायकलरिक्षा फक्त दोन आसनी असत. सामान, लहान पोर याना ‘पॅसेंजर’च्या पायाशी जागा असे. रिक्षावाले […]

बायको आणि मैत्रिण

दोन घट्ट वेण्या घालून, सोबत शाळेत येणारी शेजारची ‘निमी ‘, अचानक एके दिवशी सुंदर पौनी टेल करून येते. ‘ये तुम्ही पोर पोर, तिकडं पलीकडं खेळा’ म्हणणारी, हल्ली स्वतःच दूर जाऊन खेळते. फडतूस विनोदाला घोड्या सारखं खिंकाळून हसणारी, मंद गालातल्या गालात हसते. काल पर्यंत, ‘ये मला सायकल शिकव ना ‘ म्हणणारी, ‘चल निमे आपण सायकल खेळू, मी, […]

ओला कोप

गेल्या दोन दिवसान पासून सूर्य दर्शन नाही. बाहेर पावसाची रिप रिप सुरु आहे. हवेत सुखद गारवा आहे. अशी बाहेर पाऊसाची झड लागली कि मी अंतर्मुख होतो. आत्ताही एकटाच हाती कॉफीचा मग घेवून, खिडकीबाहेरचा पाऊस आणि गार वाऱ्यात ओले झालेले त्याचे तुषार चेहऱ्यावर झेलताना होणारा अल्ल्हाद एन्जोय करतोय. काळ्या – निळ्या ढगांनी भरून आलेलं आभाळ, त्या पावसाच्या […]

फरिश्ता

रात्रभर ड्रायव्हिंग करून थकलेल्या रहिमने आपली टॅक्सी नेहमीच्या जागी पार्क केली. तिच्या महा.xx/०७८६ या नंबर प्लेटच्या खाली बारीक अक्षरातीत ‘फरिश्ता’ या शब्दा कडे पाहून तो समाधानाने हसला. आता रात्री नउ साडेनऊ पर्यंत निवांत होते. रहिम रात्रीच टॅक्सी चालवत असें. आज पुन्हा ‘पाव भाजी’वरच भागवावे लागणार होते.तो दगडूदादाच्या गाड्याजवळच्या बाकड्यावर विसावला. “दगडूदादा, एक पाव भाजी दे दे […]

1 2
error: कॉपी कशाला करता? लेखकाला लिहायलासुद्धा कष्ट पडतात.. चोरी कशाला करायची ? स्वत:च लिहा की....