नवीन लेखन...

भारताचे संस्थानिक आणि रेल्वे

भारतीय संस्थानिकांचं रेल्वेप्रेम, त्यांनी बांधलेले आपल्या संस्थानातील रेल्वेमार्ग, त्यासाठी परदेशातून मागविलेली विविध प्रकारची इंजिनं, राजेशाही डबे या सर्व बाबींचा इतिहासही मोठा मनोरंजक आणि वाचनीय आहे. बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी आपल्या छोट्या युवराजाला वाढदिवसानिमित्त छोट्या रुळांवरून चालणारी वाफेच्या इंजिनाची गाडी भेट दिली होती. तो स्वतः इंजिन चालवीत संपूर्ण महालाच्या परिसरात आपल्या मित्रांना घेऊन फिरत असे. मुंबई-बडोदा […]

कलकत्ता मेल व्हाया नागपूर – भाग ३

नियतीने हा वन डाऊन चा मार्ग माझ्यासाठी पुढे अनेकदा निवडून ठेवला होता आणि थेट सिक्कीम, भूतान , आसाम पर्यंत या गाडीच्या मदतीने माझे पाय लागले. आता वन डाऊन च्या तोडीची गीतांजली व दुरांतो एक्सप्रेस या गाड्या दिमतीला आहेत. परंतु आजही वन डाऊन नागपुर मेल तशीच रुबाबात आपला प्रवास करीत आहे. […]

ट्रेन टू पाकिस्तान

स्वातंत्र्यपूर्व काळात दिल्ली-लाहोर एक्सप्रेस एक अतिशय लोकप्रिय गाडी होती. खचाखच प्रवाशांनी भरलेली ही गाडी हिंदू मुस्लिम समाजाच्या एकोप्याचे प्रतीक होते. ६० वर्षांनंतर दिल्ली-लाहोर समझोता एक्सप्रेस सुरू झाली आहे तिचे भवितव्य काळच ठरविणार आहे. […]

हत्ती व सिंहाचा रेल्वे रुळांवरील वावर

भारताच्या अतिपूर्वेकडील प्रांतात म्हणजे आसाम, बिहार , पश्चिम बंगाल या भागात काही वर्षांपूर्वी रेल गाडीची धडक लागून ६५ हत्तींचा मृत्यू झालेला आहे. बरेचसे मृत्यू रात्रीच्या अंधारात घडलेले असून, बरेच वेळा इंजिनांचंही नुकसान होत आहे. […]

कलकत्ता मेल व्हाया नागपूर – भाग २

दत्तूकाका व माझे वडिल अनेक वर्षे खडकपूरला सुट्टीमध्ये जातच राहिले. मोठी रेल्वे कॉलनी. रोज निरनिराळ्या गाड्यांच्या गप्पा त्यातही वन डाऊन विशेष चर्चेत असे. गाड्यांचे टाईमटेबल व त्या लेट का होतात यावर तासन्तास काथ्याकूट. या सर्व मार्‍याचा दत्तूकाकांच्या मनावर असा काही जबरदस्त पगडा बसला की त्यांनी चक्क इंजिनमधील फायरमनची नोकरी पकडली. […]

कलकत्ता मेल व्हाया नागपूर – भाग १

मुंबईहून नागपूर मार्गे कलकत्त्याला जाणारी ही एक महत्त्वाची व तितकीच मानाची गाडी. त्यामुळे तिला नंबर सुध्दा होता वन डाऊन टु अप. काळाप्रमाणे आता हे नंबर बदललेले आहेत.  […]

महाकाय ब्रम्हपुत्र नदीवरील अजस्त्र बोगीबील डबल डेकर पूल

भारतीय रेल्वेने हा बांधलेला अजस्त्र पूल म्हणजे रेल्वे इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहून ठेवणारी घटना आहे. आसाम मधील दिब्रुगड ते धेमजी अरुणाचल प्रदेश अशी दोन महत्वाची राज्ये जोडली जाणार आहेत. या पुलामुळे नेहमीचा रेल्वे प्रवास ११० ते १३० किमीने कमी होणार आहे, तर रस्त्याने प्रवासात ४०० ते ५५० किमी अंतराची बचत होणार आहे. […]

डी. बी. के. रेल्वे प्रकल्प

हा रेल्वे मार्ग बांधणी म्हणजे इंजीनियरिंगचा एक पराक्रम म्हणून त्याकडे पाहिले जाते. रेल्वेने १९६३ च्या सुमारास या खडतर विभागातून ११० किमी अंतराची कठिण रेल्वे लाईन बांधली. समुद्रसपाटी पासून सुरु होणारा हा मार्ग अनंतगिरी घाटमार्ग पार करत अराकू हिल स्टेशन पर्यंत गेलेला आहे. […]

निसर्गरम्य तळकोकणचा  प्रवास – आरामदायी  तेजस एक्सप्रेसने

कोकणचा निसर्ग रसिक पर्यटकाना सतत बोलावत असतो. त्यातही  ज्याला रेल्वे प्रवास प्रिय त्यांच्यासाठी तर पर्वणीच. विशेषतः खवय्यांना  तर मांडवी एक्सप्रेस चांगले २०-२५ पदार्थ पेश करते. हिरवा गार निसर्ग,लाल मातीचे डोंगर, घाट मार्गात अनेक बोगदे. रत्नागिरी स्टेशन आखीव नीटस मनात भरणारे. स्टेशन बाहेर रेल्वे बांधणीत मृत्यू पावलेल्या कर्मचारी वर्गाच्या स्मृतिस्मारकासमोर आपण नतमस्तक होतो. […]

रेल्वेची अद्भुत, रंजक दुनिया

रेल्वेच्या संबंधातील विषयांची व्याप्ती फारच मोठी आहे. इतिहास,  रेल्वे बांधणी, विविध मार्ग, गाड्या, प्लॅटफॉर्मस,  वेटिंग रुम्स,  स्टेशनांच्या इमारती, तांत्रिक माहिती….  खरंतर या जंत्रीला शेवटच नाही,  या सर्वांमधून मिळणारी माहिती शोभादर्शकातून म्हणजेच  `कॅलिडोस्कोप’ मधून दिसणाऱ्या रंगीत काचेच्या तुकड्यांच्या क्षणचित्रांसारखी रंजक आहे. […]

1 2
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..