नवीन लेखन...

चाटा क्लास !!

उज्ज्चल राजकीय भविष्यासाठी एकच नाव  दैनिक ‘रोजची पहाट’ चे संपादक आणि विशेषांक सम्राट सूर्याजीराव रविसांडे, काका सरधोपटांची वाट पहात होते. सूर्याजीरावांचे मूळनाव ताकसांडे. ताकसांड्यांचे रविसांडे कसे झाले ह्याबद्दल, ताकसांडे ते रविसांडे या ताकसांडे घराण्याच्या इतिहास ग्रंथात सविस्तर माहिती दिली आहे. जिज्ञासूंनी तो ग्रंथ पहावा. (प्रकाशक रोजची पहाट प्रेस) तर सांगायचा मुद्दा आजच्या कथेचा आणि या इतिहासाचा काही […]

सफर सम्राट

दैनिक रोजची पहाट’चे प्रमुख वार्ताहर काका सरधोपट बरोबर दहा वाजता ‘सफर सम्राट’ म्हणजे ज्याला आपण प्रचलित मराठीत ‘किंग ऑफ सफारी म्हणतो, त्या राघोभरारींच्या सोनेरी सफरच्या कार्यालयात म्हणजे ज्याला प्रचलित मराठीत ‘ट्रॅव्हल एजन्सी’ म्हणतो तिथे पोचले. दैनिक ‘रोजची पहाट’च्या पर्यटन विशेषांकासाठी त्यांची मुलाखत घ्यायला. मुलाखतीची वेळ सकाळी सव्वादहाची होती आणि राघोभरारी हे वेळेच्या बाबतीत फार आग्रही असतात […]

रॅगदॉल

“काका आपल्या खाद्य विशेषांकाचे काम जवळजवळ पूर्ण होत आले आहे. अजूनही तुम्ही त्या मॅडम बुदिमाला रॅगदे यांची मुलाखत घेतली नाही? कधी घेणार आहात?’ सुप्रसिद्ध दैनिक ‘रोजची पहाट’ चे संपादक, विशेषांक सम्राट, सूर्याजीराव रविसांडे आपले प्रमुख मुलाखत विशारद काका सरधोपट यांना विचारीत होते.” “साहेब, त्या अमेरिकेला गेल्या आहेत. उद्या येतील. मी उद्याचीच वेळ घेतली आहे. उद्या मुलाखत […]

अंधश्रद्धा निर्मूलन कायदा

“काका अंधश्रद्धा निमूर्लन विशेषांसाठी, अंधश्रद्धा निमूर्लनासंबंधी लवकरच सरकारच्या मान्यतेच्या प्रतीक्षेत असणाऱ्या कायद्याबाबत तुम्ही कायदेमंत्री चिंधड्यांची मुलाखत घेणार होता, त्याचे काय झाले?” रोजची पहाट या प्रख्यात दैनिकाचे संपादक, विशेषांक सम्राट सूर्याजी रविसांडे यांनी त्यांचे मुख्य मुलाखतकार काका सरधोपट यांना कार्यालयात आल्या आल्या प्रश्न विचारला. “साहेब, त्यांच्या मुलाखतीसाठी तारीख मिळवता मिळवता अगदी नाकीनऊ आले. अखेर शेवटी उद्या सकाळी […]

ज्येष्ठत्व नको पण कायदा आवर!

“काका आपल्या अंधश्रद्धा विशेषकांसाठी तुम्ही कायदामंत्री श्री. खुशालरावजी चिंधडे यांची घेतलेली मुलाखत आपल्या वाचकांना फारच आवडली. वाचकांची नुसती पत्रावर पत्र येताहेत.” रोजची पहाटचे संपादक, विशेषांक सम्राट, सूर्याजीराव रविसांडे आपले वार्ताहर काका सरधोपट यांच्यावर फारच खूश झाले होते. “होय साहेब, कायदेमंत्र्यांनी अंधश्रद्धा निमूर्लन कायद्यामध्ये अंधश्रद्धावाले आणि अंधश्रद्धा निर्मूलनवाले या दोघांचेही कसे समाधान केले आहे ते अगदी छान […]

गोजिरा माळिते गजरा

पेडर रोडवरची आकाशगंगा ही वीस मजली आलिशान इमारत. त्यात तेराव्या मजल्यावर फ्लॅट नंबर तेरामध्ये ‘मिळून साऱ्या सया’ या आंतरराष्ट्रीय कीर्तिच्या भारतीय महिला संघटनेच्या कार्याध्यक्ष सौ. चारू चिटे राहतात. ‘चाची’ या टोपणनावाने त्या स्त्रियांच्या समस्या, प्रश्न, आंदोलने यावर लेख, कथा, पुस्तके, प्रबंध (विशेषकरून इंग्रजी दैनिके, साप्ताहिके, मासिके) लिहितात. मराठीतील अग्रगण्य दैनिक ‘रोजची पहाट’ चे संपादक सूर्याजी रवीसांडे, […]

कासवचाल

‘रोजची पहाट’ या लोकप्रिय दैनिकाचे संपादक, विशेषांक सम्राट श्री. सूर्याजीराव रविसांडे आपले प्रमुख वार्ताहर, मुलाखतज्ञ श्री. काका सरधोपट यांची फार आतुरतेने वाट पाहत होते. कुणाचीही आणि कसलीही मुलाखत असो तिची चुटकसरशी वाट लावण्यात म्हणजे आटोपण्यात काकांचा हातखंडा होता. सध्या ऐरणीवर असलेल्या धडाकेबाज ज्वलंत समस्येवर साधकबाधक चर्चा करणारा असा एक धडाकेबाज दिवाळी विशेषांक काढायची सूर्याजीरावांची योजना होती. […]

बाणे ऑलिम्पिक

सुप्रसिद्ध दैनिक ‘रोजची पहाट’ चे संपादक सूर्याजीराव रविसांडे हे फार अस्वस्थ होते. ते विशेषांक सम्राट म्हणून ओळखले जातात. प्रत्येक आठवड्याला ‘रोजची पहाट’चा विशेषांक काढायचा हे त्यांचे वैशिष्ट्य आणि ज्यांच्या जीवावर हा त्यांचा विशेषांक सम्राटाचा डोलारा उभा होता त्या काका सरधोपटांचा गेले दोन दिवस झाले पत्ताच नव्हता. सूर्याजीरावांच्या अस्वस्थतेचे हेच कारण होते. काका सरधोपट हा एक अवलिया […]

वास्तुविशेषांक

दैनिक रोजची पहाट’चे संपादक आणि विशेषांकांचे सम्राट सूर्याजी रवीसांडे, काका सरधोपटांची वाट पाहत होते. काका सरधोपट, रोजची पहाट’ चे मुख्य वार्ताहर. ‘वेष असावा बावळा परि अंतरी नाना कळा’ असा अवलिया. ज्यांच्या मुलाखती घेण्याच्या कौशल्यावर संपादकांनी आपल्या सम्राटपदाचा डोलारा उभा केला होता. तसं तर रवीसांडे आणि रोजची पहाट दाखवणारा ‘रवी’ यांच्यात काही साटंलोटं नाही. त्यांचे मूळ नाव […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..