माझी माणसं – कोण होती ‘ती’?

तसा ‘तिचा ‘ आणि माझा सहवास उणे -पुरे पंचेवीस -तीस वर्षांचा . आमच्या सहवासातून आणि तिच्या सांगण्यातून ‘ती ‘ थोडी फार समजली . जगण्याची चिकाटी आणि दुःख यांचं मिश्रण होती . […]

माझी माणसं – शाम्या ‘द बेकुफ’

प्री -डिग्री ला शाम्या माझ्या सोबत होता . बी . एस सी . पर्यंत कॉलेजात हुंदडून एम .एस . सी साठी . औरंगाबाद ला गेला . त्यानंतर म्हणजे बारा पंधरा वर्षा नंतर भेटत आहे . माझा फोन नम्बर कसा मिळवला कोणास ठाऊक ? पण श्याम्या असले चमत्कार करू शकतो ! […]

माझी माणसं – बनुचा बाबा

तर हा असा ‘ बनूचा बाबा ‘ . बिन चेहऱ्याचा , बिन अस्तित्वाचा ! ‘बनूचा बाबा ‘ या पलीकडे त्याला आयडेंटिटी नाही ! कसलीही महत्वकांक्षा नाही , तो जगतो तो फक्त बनू साठी ! […]

माझी माणसं – अंश्याबाई आज्जी

तिच्या ‘ धाडसी ‘धडपडीच्या कथेचे तुकडे माझ्या आई कडून ऐकले . ते विसंगत तुकडे जोडण्याचा मी प्रयत्न केलाय . मला ती अजिबात आठवत नाही , मला आठवतोय तो तिचा खरखरीत मायाळू हात , हलकेच पाठीवरून फिरणारा ! […]

माझी माणसं – तात्या सोमण

आपल्या आयुष्यात कोण याव हे बहुदा नियतीच्या हाती असाव . ते आपल्या हाती जरी असते तरी आपण , जी माणसे नियतीने आपल्या पदरात टाकलीत त्या पेक्षा उत्तम आपल्याला निवडता आली असती का नाही कोणास ठाऊक ? […]

माझी माणसं – अब्दुल

आजपर्यंत मी अनेक दाहक प्रसंगांना सामोरे गेलो आहे . पण अब्दुलच्या ओझरत्या स्पर्शाने जो’चटका’दिला त्याची दाहकता अजूनही मनात जिवंत आहे . […]

माझी माणसं – दत्ता काका

दुटांगी पांढरधोतर , वर पांढरा सदरा , डोक्यावर पांढरी /काळी कोणतीतरी टोपी , अन बगलेत धरलेली आडवी छत्री या खेरीज दत्ताकाकाला इतर पोशाखात पाहिल्याचे मला स्मरत नाही .दत्ताकाका माझ्या वडिलांचा दूरचा भाऊ . वडिलांपेक्षा सहा-सात वर्षांनी लहान . त्याचे आई वडील प्लेगात गेले . जाताना ‘ रंगनाथा, आमच्या दत्ताला अंतर देऊ नकोस ‘ असे वचन घेतले होते म्हणे . ते आमच्या वडिलांनी म्हणजे अण्णांनी मरे पर्यंत पाळले . अगदी पाठच्या भावा प्रमाणे मानले आणि वागवले सुद्धा ! तो हि अगदी सख्या भावा सारखाच वागला ! […]

माझी माणसं – बंडू दादा

तो कोणाचा कोण होता माहित नाही पण माझा मात्र बंडूदादाच होता! त्याच्यात माझ्यात सहासात वर्षाचे अंतर होते . तेव्हा मी सात आठ वर्षांचा असेल . पण वय कधीच त्याच्या माझ्यात आड आले नाही . मी लहान म्हणून त्याने कधी दुय्यमतेने वागवले नाही कि, तो मोठा म्हणून अंतर ठेवले नाही . तो एक ‘ब्राह्मणाचे अनाथ पोर ‘ हि माहिती नन्तर मिळाली पण ती गौण होती आणि गौणच राहिली . आमच्या घरातहि त्याच्यात माझ्यात कधीच भेदभाव झाला नाही . […]

माझी माणसं – जिवलग

या ‘कंगाल ‘ वाटणाऱ्या माणसांनी माझ्या झोळीत काही ना काही टाकलय , मला ‘श्रीमंत ‘ केलाय ! ती आहेत तशी स्वीकारलीत तर ‘माझी माणसं ‘ ‘आपली माणसं ‘ होतील ! आज पासून त्यातील काहींची ओळख करून देणार आहे . आज माझ्या काही मित्रांचे ‘नमुने ‘ एन्जॉय करा . […]