नवीन लेखन...

मला भावलेला युरोप – भाग ११

कोलोझियम, कोलोेझिअम म्हणजे प्रचंड मोठे जवळजवळ पन्नास हजार प्रेक्षक बसतील एवढे अगदी गावात असणारे एक स्टेडियम.रोम शहरा मध्ये फिरत असताना कुठूनही त्याचा एखादा तरी भाग दृष्टीस पडायचाच. आणि खंडहर झालेली ही एक ऐतिहासिक वास्तू असावी,हे मनाने आगोदरच ताडले होते. पण प्रत्यक्ष प्रवेश केला नि, एवढे प्रचंड स्टेडियम बघून डोळेच विस्फारले. […]

मला भावलेला युरोप – भाग १०

शाळेमध्ये असल्यापासून पिसाचा झुलता मनोऱ्या विषयी कमालीचे कुतूहल होते. पाडोवातून निघाल्यानंतर जेंव्हा, आमच्या बस ने आम्हाला पिसाच्या मनोर्‍याच्या परिसरामध्ये सोडले तेंव्हाचा तो क्षण खरचं खूप अविस्मरणीय ठरला.पुस्तकांमधून वाचलेले चित्र मनावर कोरले गेले होतेच. ते लख्खपणे समोर दिसले.मन आणि काया दोन्हीही मोहरून जायला झाले.आपण प्रत्यक्ष तेथे जाऊन ते बघतोय! हेच मुळी स्वप्नवत होते! पिसा येथे, स्क्वायर अॉफ […]

मला भावलेला युरोप – भाग ९

दो लब्जो की है, दिल की कहानी, याद है मोहब्बत, याद है जवानी. ‌ये कश्ती वाला, क्या गा रहा था, कोई उसे भी, भी याद आ रहा था. लाला लाललाला लाला लाला‌‌ऽ लाला… माझ्या वयाच्या साधारण १३,१४ व्या वर्षी अमिताभ व झिनत या जोडीवर चित्रित झालेला हा मुव्ही मी बघितलेला. द ग्रेट गॅम्बलर च्या उपरोक्त गाण्याने […]

मला भावलेला युरोप – भाग ८

‘प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो’असे आपण नेहमी म्हणतो. त्या प्रमाणे प्रत्येक टूरच्या यशामागे टूर लीडरचा सहभाग फार महत्त्वाचा, असे म्हणावेसे वाटते. आपली टूर कशा प्रकारे पार पडली आणि आपण त्यातून किती आनंद मिळवला, हे सर्वस्वी आपल्याला लाभलेल्या टूर लिडरवर खूपसे अवलंबून असते .असे माझे वैयक्तिक मत. आंतरराष्ट्रीय पातळीवर आपण टूर करणार असू , तर […]

मला भावलेला युरोप – भाग ७

आल्प्स पर्वतांच्या कुशीमध्ये विसावलेला युरोपचा भाग म्हणजे ,जणू काही प्रत्यक्ष स्वर्गच. प्रत्येक ठिकाणचे आपले असे वेगळे वैशिष्ट्य वेगळेच सौंदर्य.निसर्गाचे एक वेगळेच रूप आपल्या मनावर राज्य करते. माउंट टिटलिसच्या सौंदर्य स्थळांवरुन अजून बाहेरही आलो नव्हतो आम्ही, तर दुसऱ्या दिवशीची रम्य सकाळ आम्हाला,झुंग्फ्रौ येथील निसर्गसौंदर्याचा आस्वाद देण्यासाठी आसुसलेली होती. […]

मला भावलेला युरोप – भाग-६

युरोपात फिरण्यासाठी सिझन चांगला म्हणून मे महिन्यात,हा एकच हेतू ठेवून केलेली टूर पण यथावकाश तारखा बघितल्यानंतर आमच्यासाठी ‘सोने पे सुहागा’ अशी ठरली. आत्तापर्यंतच्या आयुष्यात लग्नाच्या वाढदिवसाला कधीच ठरवून असे मुद्दाम कुठेही गेलो नव्हतो आम्ही. पण यावेळी योगायोगाने थेट स्वित्झर्लंड मध्येच.आणि तेही माउंट टिटलिस ला!माझा विश्वासच बसत नव्हता,पण खरे होते हे! […]

मला भावलेला युरोप – भाग ५

युरोपातील सर्व शहरात सायकलींचे प्रमाण खूपच आहे यापूर्वी असा उल्लेखही आलाय. नेदरलँडमध्ये मध्ये तर,तीन मजली लांबच लांब सायकल स्टॅंड बघून आश्चर्य वाटले. तेथे सायकलींसाठी, फोर व्हीलर साठी आणि पायी चालण्याऱ्यांसाठी एकाच रस्त्यावर स्वतंत्र समांतर ट्रॅक्स आहेत .रहदारी एवढी शिस्तीची की,कोणीही ट्रॅक सोडून चुकूनही जाणार नाही. सिग्नल तोडणे हा प्रकार औषधाला सुद्धा सापडणार नाही. कोणतेही वाहन नसेल, […]

मला भावलेला युरोप – भाग ४

लंडन आणि पॅरिस ही फार मोठी अशी राजधानीची शहरं. नितांत सुंदर रचना असणारी. कोणीही त्यांच्या प्रेमात पडावं अशीच. तेवढीच व्यापारीकरणाची लागण झालेली. सुंदर रचनेच्या उत्तुंग इमारतींनी सजलेली,आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज अशी झकपक. येथून आम्ही निघालो ते बेल्जियम ची राजधानी ,ब्रुसेल्स च्या दिशेने. तोही आरामदायी बसने.आजूबाजूच्या निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत घेत. युरोपातील देश आकाराने आणि लोक संख्येने […]

मला भावलेला युरोप – भाग ३

फ्रान्समधील पॅरिस आणि इटलीतील रोम ही दोन शहरे अप्रतिम अशी कलेचे माहेरघरं आहेत हे मात्र नाकारता येणार नाहीच.दोन्ही देशांना मोठ्या प्रमाणावर राष्ट्रीय इतिहासाची पार्श्वभूमी आहे.पॅरिस शहराला म्युझियम्सचे शहर म्हणतात असा मी पूर्वी उल्लेख केलेला आहेच. राजेशाही अस्तित्वात असणाऱ्या फ्रान्समधील, राजे मात्र कलेचे भोक्ते होते. त्यांना कलेची उत्तम जाण होती आणि ते कलेचा सन्मानही करत असत. उत्कृष्ट […]

मला भावलेला युरोप – भाग २

खरं म्हणजे युरोप विषयी लिहितांना युरोपियन लोकांचे शिष्टाचार, शिस्त,स्वच्छता, त्यांची रहदारीची पद्धत, त्यांनी आत्मसात केलेले तंत्रज्ञान वगैरे गोष्टींवर प्रकाश टाकला नाही तर ते अन्यायकारकच ठरेल. […]

1 2
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..