मला भावलेला युरोप – भाग ५

युरोपातील सर्व शहरात सायकलींचे प्रमाण खूपच आहे यापूर्वी असा उल्लेखही आलाय. नेदरलँडमध्ये मध्ये तर,तीन मजली लांबच लांब सायकल स्टॅंड बघून आश्चर्य वाटले. तेथे सायकलींसाठी, फोर व्हीलर साठी आणि पायी चालण्याऱ्यांसाठी एकाच रस्त्यावर स्वतंत्र समांतर ट्रॅक्स आहेत .रहदारी एवढी शिस्तीची की,कोणीही ट्रॅक सोडून चुकूनही जाणार नाही. सिग्नल तोडणे हा प्रकार औषधाला सुद्धा सापडणार नाही. कोणतेही वाहन नसेल, […]

मला भावलेला युरोप – भाग ४

लंडन आणि पॅरिस ही फार मोठी अशी राजधानीची शहरं. नितांत सुंदर रचना असणारी. कोणीही त्यांच्या प्रेमात पडावं अशीच. तेवढीच व्यापारीकरणाची लागण झालेली. सुंदर रचनेच्या उत्तुंग इमारतींनी सजलेली,आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज अशी झकपक. येथून आम्ही निघालो ते बेल्जियम ची राजधानी ,ब्रुसेल्स च्या दिशेने. तोही आरामदायी बसने.आजूबाजूच्या निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत घेत. युरोपातील देश आकाराने आणि लोक संख्येने […]

मला भावलेला युरोप – भाग ३

फ्रान्समधील पॅरिस आणि इटलीतील रोम ही दोन शहरे अप्रतिम अशी कलेचे माहेरघरं आहेत हे मात्र नाकारता येणार नाहीच.दोन्ही देशांना मोठ्या प्रमाणावर राष्ट्रीय इतिहासाची पार्श्वभूमी आहे.पॅरिस शहराला म्युझियम्सचे शहर म्हणतात असा मी पूर्वी उल्लेख केलेला आहेच. राजेशाही अस्तित्वात असणाऱ्या फ्रान्समधील, राजे मात्र कलेचे भोक्ते होते. त्यांना कलेची उत्तम जाण होती आणि ते कलेचा सन्मानही करत असत. उत्कृष्ट […]

मला भावलेला युरोप – भाग २

खरं म्हणजे युरोप विषयी लिहितांना युरोपियन लोकांचे शिष्टाचार, शिस्त,स्वच्छता, त्यांची रहदारीची पद्धत, त्यांनी आत्मसात केलेले तंत्रज्ञान वगैरे गोष्टींवर प्रकाश टाकला नाही तर ते अन्यायकारकच ठरेल. […]

मला भावलेला युरोप – भाग १

आपल्या भारतावर दिडशे वर्षे राज्य केलेले, भारतासारख्या दुभत्या गाईच्या दुधाची संपूर्ण मलयी आपल्या देशात घेऊन जाणारे हे इंग्रज. त्यांचा देश आहे तरी कसा? याची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली होती. […]

Whatsapp वर संपर्क साधा..