नवीन लेखन...

स्वैराचार.. स्वतच्या इच्छेने जगणे.. मेरी मर्जी (बेवड्याची डायरी – भाग २५ वा)

मिस्टर इंडिया मधील अनिल कपूर सारखे अदृश्य होणारे ब्रेसलेट प्राप्त झाले तर काय काय कराल हा सरांचा प्रश्न सूचक होता ..सगळ्यांनी त्यांच्या मनातील इच्छा बोलून दाखवल्या ..सर्वाची उत्तरे ऐकून सर म्हणाले ..आता जी उत्तरे दिलीत तुम्ही त्यात एकानेही देशसेवा करण्याबद्दल ..गरीब…दिन दुबळे यांचे जीवन सुखी करण्याबद्दल ..किवा सर्व विश्वाचा काही फायदा करून देण्याबद्दल विचार मांडला नाही . […]

ब्लँकआउट ( बेवड्याची डायरी – भाग २४ वा )

काही जण तर या ‘ ब्लँकआउटच्या ‘ अवस्थेत एका गावातून रेल्वेत बसून दुसर्या गावी जातात ..तेथे दारू उतरली की भानावर येतात ..त्यांना आपण या गावी का आणि कसे आलो हे देखील आठवत नाही ..याच अवस्थेत काही जणांच्या हातून रागाच्या भरात खून ..एखाद्याला जबरी मारहाण असे गुन्हे घडू शकतात..वस्तूंची तोडफोड फेकाफेक ..काहीजण खिश्यातील सगळे पैसे उडवतात.. […]

मानसोपचार तज्ज्ञांची भेट ! ( बेवड्याची डायरी -भाग २३ वा )

आज मानसोपचार तज्ञांच्या भेटीचा वार होता ..या आठवड्यात नवीन दाखल झालेल्या सर्वांना माँनीटरने …सकाळी प्रार्थनेच्या वेळी त्यांना आज मानसोपचार तज्ञांना भेटायचे आहे हे सांगितले होते ..त्यावर एकदोन जणांनी सरळ सरळ नकार दिला होता ..त्यांना माँनिटरने वारंवार दारू अन्य मादक पदार्थांच्या सेवनाने मेंदूवर कसे दुष्परिणाम होऊन ..मानवी विचार ..भावना ..वर्तन यात कसा नकारात्मक बदल होतो हे समजून सांगितल्यावर ते तयार झाले […]

माता विठ्ठल ..पिता विठ्ठल ! ( बेवड्याची डायरी – भाग २२ वा )

..सर ईश्वरी शक्ती बदल सांगत असताना मला लहानपणी ऐकलेला संत नामदेवांचा अभंग आठवला ..ज्यातील एका कडव्यात ‘ माता विठ्ठल ..पिता विठ्ठल ..बंधू विठ्ठल ..गोत्र विठ्ठल ..गुरु विठ्ठल ..गुरु देवता विठ्ठल ..निधान विठ्ठल ..निरंतर विठ्ठल ‘ असे म्हंटले गेले होते ..म्हणजे संतानी पण निसर्ग ..नातीगोती ..गुरुजन ..समाज..यांनाच विठ्ठल म्हणजे ईश्वर मानले होते तर ! […]

डोक्याला खुराक …डायरी रायटिंग ( बेवड्याची डायरी – भाग २१ वा )

सरांनी डायरीत लिहायला सांगितलेल्या प्रश्नाचे उत्तर लिहायला बसलो ..मात्र सुरवातीला काहीच सुचेना ..कॉलेजनंतर सुमारे २० वर्षांनी काहीतरी लिहिण्यासाठी वही घेवून बसावे लागले होते इथे ..लिहिण्याची सवय मोडलेली होती ..तसेही मला लिहायचा कंटाळा होता […]

ईश्वरी संकल्पना… उच्चशक्ती (बेवड्याची डायरी – भाग २०)

सरांनी अल्कोहोलिक्स अँनाँनिमसच्या दुसऱ्या पायरीत दर्शवलेल्या उच्च्शक्ती बद्दल माहिती देताना सांगितले की..” बहुतांशी वेगवेगळ्या धर्मानी .. पंथांनी ..मानवसमूहांनी ..त्यांच्या बुद्धीच्या आवाक्याबाहेरचे गोष्टी घडवणारा ..सर्व सृष्टीवर नियंत्रण करणारा ..कणाकणात वसलेला…पाप पुण्याचा हिशोब ठेवून फळ देणारा ..कोणीतरी स्वामी ..आहे हे सांगितले आहे……. […]

मदत मागणे.. मदत घेणे ! (बेवड्याची डायरी – भाग १९)

आजच्या समूह उपचारा मध्ये सरांनी ..मदत घेणे ..मदत मागणे या विषयावर चर्चा केली …प्रत्येक व्यसनी व्यक्तीला आपण कोणाचीही मदत न घेता व्यसन सोडू शकतो असा खोटा आत्मविश्वास असतो ..एकतर मुळातच आपण व्यसनी आहोत हे त्याला मनापासून मान्य नसते ..त्यात कोणाची मदत घेणे म्हणजे त्याला खूप कमीपणा वाटतो ..खरे तर मदत घेण्यात कोणताही कमीपणा नसतो ..उलट व्यसनाच्या आकर्षणाशी लढण्यासाठी स्वतची शक्ती वाढवणे असते मदत घेणे म्हणजे .. […]

कृतज्ञता.. परस्परावलंबन (बेवड्याची डायरी – भाग १८)

प्रत्येक व्यक्ती ही कोणत्या न कोणत्या कारणासाठी इतरांवर अबलंबून असते काही वेळा मानसिक दृष्ट्या तर काही इतर कारणांनी.. परस्परावलंबनाची ही जाणीव प्रत्येकाला असणे आवश्यक आहे ..कृतज्ञता यालाच म्हणतात …ही कृतज्ञता ज्यांना समजते ती माणसे कधीच कोणाचा तिरस्कार करत नाहीत ..कधीच व्यसने करत नाहीत ..किवा समाजविघातक कृत्ये करत नाहीत ..उलट अशी माणसे सर्वांच्या विकासासाठी आपली आपला पैसा ..श्रम आणि बुद्धी यांचा वापर करून स्वतचे आणि इतरांचेही जीवन सुखी करण्यासाठी प्रयत्नशील राहतात .. सोप्या भाषेत कृतज्ञता म्हणजे काय हे समजावून सांगितले… […]

रविवारची सफाई.. टिवल्याबावल्या.. (बेवड्याची डायरी – भाग १७)

आज रविवार म्हणून सकाळी कोणाला लवकर उठवले गेले नव्हते ..एक तास उशिरा सगळे उठले ..रविवारी पी.टी…आणि इतर थेरेपीजना सुटी असते हे कालच समजले होते मला ..काल रात्री आमच्यासाठी ‘ डँडी ‘ या सिनेमाची सीडी लावण्यात आली होती ..एक मध्यमवयीन दारुड्याची कथा छान दाखवली गेली होती ..अनुपम खेर ने दारुड्या व्यक्तीची घालमेल ..दारूची ओढ ..कुटुंबियांचेप्रेम ..या कात्रीत सापडलेली व्यक्तिरेखा छान वठवली होती .. सिनेमा पाहताना अनेकदा मला माझ्या मुलीची आठवण झाली ..वडिलांना सुधारणेसाठी प्रेरणा देणारी ..वडिलांवर खूप प्रेम असलेली तरुण मुलगी पूजा भट्ट ने तंतोतंत साकारली होती […]

भाग्यवान दारुडा – औषधे वाटप (बेवड्याची डायरी – भाग १६)

हॉल मध्ये सर्वाना एकत्रित बसवले गेले होते ..आता अल्कोहोलिक्स अँनाँनिमसची मिटिंग होणार आहे हे समजले ..मी कुतूहलाने अगदी पुढच्या रांगेत जाऊन बसलो ..माँनीटर ने प्रार्थना घेतली ..बोलायला सुरवात केली ..नमस्कार मित्रानो माझे नाव संदीप ..”मी एक भाग्यवान दारुडा आहे ..केवळ ईश्वराची असीम कृपा ..अल्कोहोलिक्स अँनाँनिमसने दर्शवलेला बारा पायऱ्यांचा सुंदर जीवनमार्ग ..आणि आपणा सर्वांचे मला लाभलेले प्रेम ..केवळ याच बळावर मी आज दारूच्या त्या पहिल्या विषारी घोटापासून दूर आहे ..तसेच सुखी ..समाधानी ..संतुलित जीवन जगण्याचा प्रयत्न करतोय ” […]

1 2 3 4 5
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..