आत्मकेंद्रीत वृत्तीला लगाम.. (बेवड्याची डायरी – भाग ३२ वा)

सरांनी ‘ फक्त आजचा दिवस ‘ मधील पुढील सूचना फळ्यावर लिहिल्या होत्या .. ७ ) आज मी कोणाच्या भावना दुखावल्या जातील असे वर्तन करणार नाही ..माझ्या भावना कोणी दुखावल्या तरी मी तसे दर्शवणार नाही . ८ ) फक्त आजचा दिवस मानसिक व्यायाम म्हणून मी स्वतःला न आवडणाऱ्या दोन तरी गोष्टी करेन . ९ ) फक्त आज […]

झडती.. कडक तपासणी – (बेवड्याची डायरी – भाग ३१ वा)

सकाळी प्रार्थनेच्या वेळीच माॅनीटरने जाहीर केले की आता प्रार्थना झाल्यावर सर्वांनी आपापल्या लॉकर मधून ताबडतोब चहाचे ग्लास काढून घेवून ..आपल्या लॉकरची किल्ली इथे कार्यकर्त्याकडे जमा करायची आहे ..आज सर्वांच्या लॉकरची तपासणी करणार आहोत आम्ही ..हे ऐकून सगळ्याचा आश्चर्य वाटले ..काहीजण कुरबुर करू लागले ..हे काय नवीन लफडे ? आम्ही काय चोर आहोत का ? वगैरे चर्चा […]

बुद्धीचा गैरवापर ! ( बेवड्याची डायरी – भाग ३० वा )

सर हे वाचत असताना आम्ही सर्व मनापासून हसून मिलिंदच्या बुद्धीला दाद देत होतो …त्याने एक दारुडा नेमका कसा वागतो याचेच वर्णन केलेले होते ..जे आम्हाला सर्वाना तंतोतंत लागू पडत होते ..फक्त त्याने हे विडंबन केले असल्याने ..हे सरांना कळले तर ते रागावतील म्हणून वहीत लिहून लपवून ठेवलेले होते […]

परिस्थितीशी जुळवून घेणे ( बेवड्याची डायरी – भाग २९ वा )

खरे तर निसर्गाशी ..कुटुंबियांशी ..नातलगांशी ..समाजाशी ..परिस्थितीशी जुळवून घेण्यातच माणसाचे भले असते ..त्रासदायक असलेल्या परिस्थितीतून योग्य मार्ग काढण्यासाठी भावनिक पातळीवर संतुलित राहून..सर्वांच्या हिताचा विचार करून प्रयत्न केले तरच आपण परिस्थिती बदलण्यासाठी स्वता:ची ताकद वाढवू शकतो ..त्यामुळे माणसाचा नेहमी जुळवून घेण्याकडे कल असला पाहिजे . […]

फक्त आजचा दिवस ! ( बेवड्याची डायरी – भाग २८ वा )

स्वताच्या इच्छेने जीवन व्यतीत करण्याच्या आपल्या अट्टाहासामुळेच आपले प्रचंड नुकसान झालेय हे लक्षात घेतले तरच तिसरी पायरी आचरणात आणण्याची मानसिक तयारी होते असे सांगत सरांनी तिसऱ्या पायरीचे यशस्वीपणे आचरण करण्यासाठी ‘ फक्त आजचा दिवस ‘ हे तत्वज्ञान खूप मदत करू शकते हे सांगितले […]

मेरी मर्जी ! ( बेवड्याची डायरी – भाग २७ वा )

..अजून तुला स्वताची इच्छा सोडून देता येत नाहीय म्हणून वारंवार यावे लागतेय ..या पुढे पिण्याच्या पहिले ‘ मी आज दारू पिवू का ?’ अशी आई वडिलांची ..पत्नीची परवानगी घे ..ते हो म्हणाले तरच दारू पी ..हे जेव्हा तू शिकशील तेव्हाच व्यसनमुक्त राहशील …! […]

झाडू ड्युटी… ( बेवड्याची डायरी – भाग २६ वा )

…. उत्तर लिहून डायरी माॅनीटर कडे द्यायला गेलो ..डायरी घेत मला म्हणाला ..विजयभाऊ आज उद्या तुमची झाडू ड्युटी लागली आहे ..तुम्हाला आता येथे एक आठवडा उलटून गेलाय ..तुमची तब्येतही चांगली आहे ..तेव्हा उद्या सर्व हॉल मध्ये ..सकाळी चहानंतर ..दुपारी जेवणानंतर आणि रात्री जेवणानंतर झाडू मारण्याचे काम तुम्हाला करायचे आहे […]

स्वैराचार.. स्वतच्या इच्छेने जगणे.. मेरी मर्जी (बेवड्याची डायरी – भाग २५ वा)

मिस्टर इंडिया मधील अनिल कपूर सारखे अदृश्य होणारे ब्रेसलेट प्राप्त झाले तर काय काय कराल हा सरांचा प्रश्न सूचक होता ..सगळ्यांनी त्यांच्या मनातील इच्छा बोलून दाखवल्या ..सर्वाची उत्तरे ऐकून सर म्हणाले ..आता जी उत्तरे दिलीत तुम्ही त्यात एकानेही देशसेवा करण्याबद्दल ..गरीब…दिन दुबळे यांचे जीवन सुखी करण्याबद्दल ..किवा सर्व विश्वाचा काही फायदा करून देण्याबद्दल विचार मांडला नाही . […]

ब्लँकआउट ( बेवड्याची डायरी – भाग २४ वा )

काही जण तर या ‘ ब्लँकआउटच्या ‘ अवस्थेत एका गावातून रेल्वेत बसून दुसर्या गावी जातात ..तेथे दारू उतरली की भानावर येतात ..त्यांना आपण या गावी का आणि कसे आलो हे देखील आठवत नाही ..याच अवस्थेत काही जणांच्या हातून रागाच्या भरात खून ..एखाद्याला जबरी मारहाण असे गुन्हे घडू शकतात..वस्तूंची तोडफोड फेकाफेक ..काहीजण खिश्यातील सगळे पैसे उडवतात.. […]

मानसोपचार तज्ज्ञांची भेट ! ( बेवड्याची डायरी -भाग २३ वा )

आज मानसोपचार तज्ञांच्या भेटीचा वार होता ..या आठवड्यात नवीन दाखल झालेल्या सर्वांना माँनीटरने …सकाळी प्रार्थनेच्या वेळी त्यांना आज मानसोपचार तज्ञांना भेटायचे आहे हे सांगितले होते ..त्यावर एकदोन जणांनी सरळ सरळ नकार दिला होता ..त्यांना माँनिटरने वारंवार दारू अन्य मादक पदार्थांच्या सेवनाने मेंदूवर कसे दुष्परिणाम होऊन ..मानवी विचार ..भावना ..वर्तन यात कसा नकारात्मक बदल होतो हे समजून सांगितल्यावर ते तयार झाले […]

1 2 3 4