नवीन लेखन...

सोळा हजारांत देखणी – प्रियांका शेट्टी

प्रियांका शेट्टी… लावणीची कोणतीही पार्श्वभूमी नसतानाही या लोककलेत स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलंय… नृत्यसमशेर माया जाधव यांच्या तालमीत तयार होऊन गेली तीन दशकं याच कलेचा ध्यास घेत ही कला जीवापाड जपत, त्यावर प्रेम करत आणि ती जगावी यासाठी सर्वार्थाने प्रयत्न करणारी कलावती म्हणजे प्रियांका शेट्टी. […]

Photogenic – नम्रता गायकवाड

मधाळ हसणारी, गालावर गोड खळी असलेली, बोलक्या डोळ्यांची, सुरेख केसांची वळण लाभलेली, तरतरीत नाकाची अन् कलावतीला शोभेल अशीच उंची लाभलेली नम्रता गायकवाडची लोभस व्यक्तिरेखा सर्वांच्या डोळ्यात भरेल अशीच आहे. एखाद्या प्रकल्पावर काम करत असताना त्या प्रकल्पाची गरज ओळखून त्याला साजेसा ठरेल असा चेहरा छायाचित्रकाराला निवडायचा असतो. मात्र काही चेहरे असे असतात त्याला कोणताही मेकओव्हर केला तरीहि […]

नखशिल्पाचा जादुगार – अरविंद सुळे

नखाच्या सहाय्याने कागदावर कमीअधिक दाब देऊन आखीव-रेखीव असं नखशिल्प साकारणारा जादुई कलाकार. गेल्या तब्बल पाच दशकांहून अधिक काळ आपली ही नखशिल्प कला जिवापाड जपणारा सच्चा कलावंत. आपल्या कलेतून अनेक मनं जिंकणारे अन् जोडलेली मनं टिकवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असलेले अरविंद सुळे म्हणजे नखशिल्प कलेतलं दादा नाव. […]

सूर तेच छेडिता – चिनार–महेश

मराठी सिनेमांच्या संगीतासाठी सध्या आघाडीच्या नावांमध्ये घेतलं जाणार एक नाव म्हणजे चिनार-महेश. चिनार खारकर आणि महेश ओगले या जोडगोळीने संगीतकार म्हणून मराठीतल्या अनेक सिनेमांच्या गाण्यांना संगीत दिलं. या दोघांनी एकत्रच मराठी सिनेइंडस्ट्रीत संगीतकार म्हणून श्रीगणेशा केला तो २००४ साली. […]

चौकटीबाहेरचा माणूस – कुशल बद्रिके

अमूक एका चौकटीत बसणारा अभिनेता असं कुशलचं वर्णन करता येत नाही. कुशलचा अभिनय, त्याचं भाषेवरील प्रभुत्व, संवादांची फेक, अभिनयाची उंची हे सारं पाहता कुशल येणाऱया काळात छोटय़ा पडद्यापेक्षा रूपेरी पडदा चांगलाच गाजवेल, अशी खात्री मला वाटते. कलाकार चेहऱयापेक्षा त्याच्या अभिनयाने ओळखला जातो, ही जाण असलेले दिग्दर्शक पुढे आले की कुशलचा हात अभिनय क्षेत्रात कोणी धरणार नाही, हे नक्की! […]

चोखंद़ळ – सोनाली खरे

दूरदर्शनवरील ‘बंदिनी’, ‘दामिनी’ यासारख्या मालिकांतून अभिनयाचा श्रीगणेशा केलेल्या सोनाली खरेनं अल्पावधीतच मराठी इंडस्ट्रीत ग्लॅमरगर्ल म्हणून एक वेगळी ओळख निर्माण केली. या मालिकांमुळे सोनालीचा चेहरा महाराष्ट्रभर घराघरात पोहोचला. आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी मालिकांनंतर थेट हिंदी रुपेरी पडद्यावरून सोनालीनं रसिकमनावर मोहिनी घातली. […]

रंग… कला… आणि कटिंग चहा – रवी जाधव

रवी जाधव… आजचा आघाडीचा चित्रपट दिग्दर्शक… पण त्याच्या जडणघडणीत भक्कम असलेला त्याच्या कलेचा पाया महत्त्वाचा ठरतो… ‘टाइमपास’, ‘बालक पालक’, ‘नटरंग’, ‘बालगंधर्व’ या मराठी सिनेमांनी केवळ राज्यातच नव्हे तर देश-परदेशातल्या सिनेरसिकांवर आपली भुरळ घालत कोटय़वधी रुपयांचा गल्ला जमवला.आपल्या दिग्दर्शनात सातत्य राखत विक्रमांचे अनेक थर रचून मराठी सिनेसृष्टीत नवी क्रांती घडवून आणणारा दिग्दर्शक म्हणून रवीकडे पाहिलं जातं. […]

मराठमोळा मोहक चेहरा – स्पृहा जोशी

स्पृहा जितकी परखड आहे तितकीच मदत करणारीसुद्धा! एका व्यावसायिक शूटच्या वेळी वेळेची मर्यादा लक्षात घेऊन स्पृहाला चक्क दहा वेगवेगळे पेहराव करावे लागले होते, ते तिने कोणतीही तक्रार न करता केले. हिंदुस्थानी सणांवर हे शूट बेतलं होतं. वेगवेगळे हिंदुस्थानी सण आणि एकच चेहरा अशी थीम होती. कल्पना सुरेख असली तरीही ती तडीस नेणं हे तसं कठीण होतं. आपल्या चेहऱयावर एकाच दिवशी दहा प्रयोग होणार होते. त्यातून आपली वेगळी प्रतिमा जगासमोर येणार होती. या सर्वांचा अभ्यास करूनच स्पृहाने या शूटला होकार दिला असावा. […]

सृजनरंग

रंगांनी सजलेल्या नवरात्रोत्सवाचं फोटोशूट करण्याची संधी मला वृत्तपत्रांमुळे अनेकदा मिळाली. हे फोटोशूट म्हणजे एका विशेष रंगांचे पारंपरिक वस्त्र परिधान केलेल्या मराठी सिनेतारकांना घेऊन केलेले फोटोशूट. संकल्पना जरी सहज सोपी वाटत असली तरीही ती प्रत्यक्षात आणण्यात अनेक दिवसांची आणि फोटोमागे काम करणाऱया अनेक कलाकारांच्या कलेची ती मेहनत होती. […]

अलबेला अभिनेता – मंगेश देसाई

मंगेश देसाई समंजस, परिपक्व अभिनेता… फोटो काढताना मंगेशच्या व्यक्तिमत्त्वातील समोर न आलेले अनेक पैलू उलगडलेत… मंगेशकडे कोणताही चेहरा ताकदीने प्रेझेंट करण्याची दैवी कला आहे आणि ते तो प्रामाणिकपणे गेली तेवीस-चोवीस वर्षे करतोय. मंगेशचा ‘खेळ मांडला’ ते ‘एक अलबेला’ असा प्रवास याचीच प्रचीती म्हणता येईल. […]

1 2 3 4
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..