सृजनरंग

रंगांनी सजलेल्या नवरात्रोत्सवाचं फोटोशूट करण्याची संधी मला वृत्तपत्रांमुळे अनेकदा मिळाली. हे फोटोशूट म्हणजे एका विशेष रंगांचे पारंपरिक वस्त्र परिधान केलेल्या मराठी सिनेतारकांना घेऊन केलेले फोटोशूट. संकल्पना जरी सहज सोपी वाटत असली तरीही ती प्रत्यक्षात आणण्यात अनेक दिवसांची आणि फोटोमागे काम करणाऱया अनेक कलाकारांच्या कलेची ती मेहनत होती. […]

अलबेला अभिनेता – मंगेश देसाई

मंगेश देसाई समंजस, परिपक्व अभिनेता… फोटो काढताना मंगेशच्या व्यक्तिमत्त्वातील समोर न आलेले अनेक पैलू उलगडलेत… मंगेशकडे कोणताही चेहरा ताकदीने प्रेझेंट करण्याची दैवी कला आहे आणि ते तो प्रामाणिकपणे गेली तेवीस-चोवीस वर्षे करतोय. मंगेशचा ‘खेळ मांडला’ ते ‘एक अलबेला’ असा प्रवास याचीच प्रचीती म्हणता येईल. […]

दिलखुलास – प्रवीण दवणे

प्रवीण दवणे… वक्ते, साहित्यिक, मराठीचे अध्यापक आणि एक मनमोकळं व्यक्तिमत्त्व. जे त्याच्या छायाचित्रातून जाणवत राहते… पासष्टहून अधिक पुस्तकांसाठीचं लिखाण, अनेक कवितासंग्रह, नाटकांचं लिखाण, तब्बल सवाशेहून अधिक मराठी चित्रपटांसाठीची गीतरचना, अडीचशेहून अधिक कॅसेटस्साठी दोन हजांहून अधिक भावगीतं आणि भक्तिगीतांचं लिखाण, सतत दौऱयावर राहून दर्दी प्रेक्षकांची गर्दी खेचणाऱया कार्यक्रमांचा सूत्रधार आणि सुमारे चार दशकं मराठीचे खमके अध्यापक म्हणून […]

विलक्षण तेजस्वी… देखणा अंगद म्हसकर

अंगद म्हसकर… एक गुणी आणि वास्तववादी कलावंत… रंगमंचावरून प्रवेश करून त्याने स्वत:चा पाया किती पक्का आहे हे कधीच दाखवून दिलंय…. साधारणपणे पंधरा वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. दिग्दर्शक विजू मानेचा मला फोन आला. मराठी इंडस्ट्रीत येऊ पाहत असलेल्या एका फिमेल मॉडेलचं फोटोशूट करण्यासाठीचा तो फोन होता. ठरल्याप्रमाणे आम्ही स्टुडिओत भेटलो आणि शूटला सुरुवातही केली. त्या मॉडेलचं शूट संपल्यावर […]

लक्षवेधी – स्वप्नाली पाटील

साधारणपणे दहा वर्षांपूर्वी म्हणजेच २००७ – २००८ साली ठाण्यातल्या घंटाळी मंदिरात मी आणि स्वप्नाली पहिल्यांदाच एकमेकांसमोर आलो. निमित्त होतं गुढीपाडव्यानिमित्त आयोजित केलेल्या एका शूटचं. या मंदिराच्या आवारात असलेल्या डौलदार झाडांच्या बॅकग्राऊंडला आम्ही शूट करत होतो. मराठमोळी संस्कृती उठून दिसावी असाच पेहराव स्वप्नालीचा होता. लाल रंगाची नक्षीदार साडी, नाकात नथ, लाल रंगाची मोठाली टिकली, अंबाडा त्यावर हळुवारपणे सजलेला मोगऱयाचा गजरा आणि या सगळ्यात तिचा खुललेला चेहरा. हे सारं काही कॅमेऱयात बंदिस्त करण्याची माझी धडपड सुरू होती. अत्यंत प्रसन्न वातावरणात आमचं शूट तासाभरात पार पडलं. […]

ठसकेबाज ‘वच्छी आत्या’ – वर्षा दांदळे

वर्षाचे आजवरचे अनेक फोटो मी पहिले होते. वर्षातल्या अभिनेत्रीसोबतच तिच्यातल्या शिक्षिकेची बाजू एकाच छायाचित्रात मांडण्यासाठी हा फोटो महत्त्वाचा ठरणार होता. फोटो काढताना वर्षाला मी पूर्वकल्पना न देता केवळ या बोर्डाच्या बाजूला शिक्षिकेच्या पात्रात तुम्ही असाल तर कसे हावभाव असतील असं विचारून मी त्यांचे हे भाव टिपत होतो. […]

ऋषितुल्य भाई गायतोंडे

भाई गायतोंडे हे नाव संगीत क्षेत्रात संगीत ऋषी म्हणून जगप्रसिद्ध असलेलं. याच ऋषितुल्य भाईंची तुला त्यांच्या शिष्यांनी त्यांच्या एका वाढदिवसानिमित्त केली होती. भाईंच्या वजनाचे तबले यावेळी भाईंना भेट म्हणून मिळाले होते. हे तबले भाईंच्या घरी एका काचेच्या कपाटात दिमाखात सजले होते. याच तबल्याच्या पार्श्वभूमीवर मी भाईंचा आणखी एक फोटो टिपला. भाईंची सांगीतिक श्रीमंती या फोटोकडे नजर टाकल्याच क्षणी दिसते. मी टिपलेला हा फोटो भाईंनादेखील खूप भावला आणि म्हणून माझ्यासाठी तो विशेष ठरला. पुढे हाच फोटो स्वरदायिनी ट्रस्टच्या दिनदर्शिकेसाठी वापरला गेला होता. […]

आवाजाचा किमयागार – उदय सबनीस

एका क्षेत्रावर आपली पकड मिळवलेली असतानाच वेगळ्या कलाक्षेत्रात आपली ओळख निर्माण करू पाहणं हे एका कलाकारासाठी तसं आव्हानात्मकच असतं. उदय सबनीसांनी मात्र हा धोका पत्करला आणि यशस्वी दुहेरी ओळख निर्माण केली. अभिनय क्षेत्रावर आपली चांगलीच पकड मिळवलेली असतानाच म्हटलं तर संबंधित आणि म्हटलं तर तशा स्वतंत्र अशा आवाजाच्या जादुई दुनियेवरही आपली छाप उमटवण्यात उदयला चांगलंच यश मिळालं आहे. […]

डिसिल्व्हा अंकल

डिसिल्व्हा अंकल… छायाचित्रणाची आवड… आयकर विभागातील सुरक्षित नोकरीत स्वेच्छानिवृत्ती घेऊन पूर्णवेळ छायाचित्रकार होण्याच्या निर्णयातून खऱया अर्थाने त्यांची छायाचित्रकारिता फुलली… […]

सात्त्विक गोड चेहरा – पूर्वा गोखले

पूर्वा गोखले. शांत,गोड चेहरा, चेहऱयातील सात्त्विकता, टवटवीतपणा हे तिचे खास वैशिष्टय़. इतिहासाची वेगळी साक्ष देणाऱया ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेत सईबाईची चोख भूमिका साकारणारी, तर ‘कुलवधू’ मालिकेतून आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवलेली अन् ‘रिमझिम’, ‘थरार’, ‘भाग्यविधाता’ या मराठी, तर ‘कोई दिल में है’, ‘कहानी घर घर की’ या हिंदी मालिकांमधून घराघरांत पोहोचलेला आणि ‘स्माईल प्लीज’ या […]

1 2