नवीन लेखन...

एकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग २ – अ

आपण भाषेच्‍या शुद्धपणाचा परकीय भाषेच्‍या संदर्भात विचार केला. आतां आपण त्‍याचा विचार लोकभाषेच्‍या दृष्‍टीकोनातून करूं या. त्‍यावरून पाहूं या, इंग्रजी भारतीय भाषांचं अस्तित्‍व नाहीसं करून टाकील, असा निष्‍कर्ष निघतो कां तें.  आपण आधी पाहिलंच आहे की जी लोकभाषा असते, ती टिकून राहते, कारण ती जनसामान्‍यांची भाषा असते. तिला प्रतिष्‍ठा असो वा नसो, पण तिचं अस्तित्‍व टिकून राहतं. […]

मराठे आणि दिल्‍ली – १८वे शतक – भाग ६

१८व्‍या शतकातील मराठे दिल्‍लीस जाऊन पोचले परंतु दिल्‍लीचे अधिपती झाले नाहीत, ह्या गोष्‍टीचा विचार करतांना दिल्‍लीला धडक देणार्‍या व्‍यक्‍ती कोण होत्‍या, हे पुन्‍हा एकदा विचारात घेणे आवश्‍यक आहे. आधी हा उल्‍लेख आलाच आहे की, बाजीराव, सदाशिवराव भाऊ व महादजी या तिघांमधील एकही जण स्‍वतः राजा नव्‍हता, ते कुणा दुसर्‍याचे सेवक होते, अंकित होते. सर्व निर्णय स्‍वतः घेण्‍याचे स्‍वातंत्र्य त्‍यांना नव्‍हते. […]

एकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग १ – ड

आमची संस्‍कृती नष्‍ट होत चालली आहे असं आमचे विचारवंत म्‍हणतात. पण इतिहास वेगळंच चित्र दाखवतो. परदेशी विद्वानही म्‍हणतात की भारतीय वांशिक समुह आपल्‍या संस्‍कृतीचं वेगळेपण नेहमी जपत असतो. म्‍हणूनच आमची संस्‍कृती व आमची भाषाही नष्‍ट होण्‍याचा पुढलया शतकात तरी कांहींहीं संभव दिसत नाहीं. […]

मराठे आणि दिल्‍ली – १८वे शतक – भाग ५

ऑगस्‍ट १७६० मधील परिस्थिती मराठ्यांना दिल्‍लीपती बनण्‍यासाठी अनुकूल नव्‍हती. स्‍वारीस निघाल्‍यापासून भाऊने सर्व राजेरजवाड्यांना या स्‍वारीत मराठ्यांना येऊन मिळण्‍याविषयी पत्रे पाठवली होती. अब्‍दालीशी लढायला आल्‍यावर आणि त्‍यासाठी हिंदुस्‍थानातील राजे व नबाब यांची मदत मागितल्‍यावर आणि स्‍वतः अब्‍दालीचा यमुनेपलीकडील धोका लक्षात घेतल्‍यावर, मराठ्यांना त्‍यावेळी दिल्‍लीपती कसे होता आले असते ? […]

एकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग १ – क

ज्‍या इंग्रजीच्‍या आक्रमणाची आपल्‍याला एवढी धास्‍ती वाटते, तिचंच उदाहरण पाहूं. इंग्रजीनं अनेक शब्‍द इतर भाषांमधून मुक्‍तपणे घेतले आहेत आणि त्‍यामुळे इंग्रजी भाषेची प्रगतीच झालेली आहे […]

मराठे आणि दिल्‍ली – १८वे शतक – भाग ४

मराठ्यांच्‍या अर्थकारणाचा विचार केल्‍याशिवाय तत्‍कालीन परिस्थितीचे पूर्ण आकलन होत नाही. मराठी माणूस पैशाच्‍या मागे लागत नाही, अर्थकारण करत नाही, असा एक समज हल्‍ली झालेला आहे. परंतु १८व्‍या शतकातील परिस्थिती वेगळी होती, हे सत्‍य आपण लक्षात घ्‍यायला हवे […]

एकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग १ – ब

तुम्‍हाला नवल वाटेल की फक्‍त फारसीतूनच भारतीय भाषांमध्‍ये शब्‍द आले आहेत असं नाहीं, तर संस्‍कृतमधूनही फारसीत अनेक शब्‍द गेलेले आहेत. या विषयावरील श्री. राजेश कोचर यांचे लेख माझ्या वाचनात आले आहेत. मुंबईचे श्री. प्रकाश वैद्य यांनीही मौलिक संशोधन केलं आहे (आणि थोडंफार मी स्‍वतःसुद्धां ). […]

कायदा आणि गर्भवती स्त्रिया

याहूनही अधिक मूलभूत एक प्रश्न आहे. कायदा हा व्यक्ती आणि समाज यांच्या संबंधात असतो. उदा. – स्त्रियांना मंदिर-प्रवेश, मुस्लिमांमधील ‘ट्रिपल् तलाक’ची पद्धत. पण, स्वतःचा गर्भ ठेवणें किंवा गर्भपात करणें या  बाबीचा  समाजाशी संबंध कसा ? आपला गर्भ ठेवावा की गर्भपात करावा, हा अधिकार खरें तर त्या त्या स्त्रीलाच असला  पाहिजे. हा तिचा व्यक्तिगत   प्रश्न आहे.  समाजानें किंवा समाजाचा प्रतिनिधी म्हणून, सरकारनें, त्या स्त्रीच्या जीवनात किती हस्तक्षेप करावा, हें ठरवायला नको कां ? […]

नरेंच केली हीन किति नारी !!

थोर भारतीय संस्कृती’‘असें आपण सदासर्वदा म्हणत असतो, आपल्याला या संस्कृतीचा अभिमानही असतो. संस्कृतीतील चांगल्या गोष्टीबद्दल अभिमान असणें रास्त आहे ; पण संस्कृतीचें हेंही दुसरें, अयोग्य, हीन रूप आहे, आणि त्याला राजमान्यता होती , ‘शिष्टजनां’ची मान्यता होती, हेंही आपण विसरतां कामा नये. […]

मराठे आणि दिल्‍ली – १८वे शतक – भाग ३

१७१९ मध्‍ये बाळाजी विश्वनाथ चौथाई व सरदेशमुखीची सनद घेऊन आला तो राजकीय वास्‍तव ओळखून आणि शाहूचा मुघली सत्तेविषयीचा दृष्टिकोण ध्‍यानात घेऊनच. शाहूला स्‍वतःसाठी विलासप्रिय व शांत जीवन हवे होते. त्‍यासाठी त्‍याच्‍या सरदारांनी मुलुखगिरी करून, चौथाई गोळा करून त्‍यातील हिस्‍सा त्‍याला दिला की तो खुष होता. […]

1 2 3
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..