नवीन लेखन...

द अदर साईड ऑफ सोल – ४

…. नंतर त्याचा व्हिडीओ बनवला. अर्थात गळ्यात फास वगैरे अडकवून. तो व्हिडीओ व्हायरल होईल याची त्याला खात्री होतीच. मग त्याने न्यूज चॅनल ऑन केलं. अपेक्षेप्रमाणे त्याच्या आत्महत्येची न्यूज सुरू झाली होती. मग नेहमीचे यशस्वी कलाकार मेकअप करून बाईट्स द्यायला सज्ज झाले. त्याच्या आत्महत्येचं राजकारण सुरू झालं. […]

द अदर साईड ऑफ सोल – ३

आत्म्यानं न लिहिलेल्या सगळ्या पानांची सुरळी झाली होती. चोरीला गेलेली बुलेट त्या पोराच्या घरात सापडल्यानं पुराव्यासह गुन्हा दाखल झाला होता. बुलेट साहेबांकडे गेली होती आणि त्याची किल्ली साहेबांनी लोकशाहीच्या नव्या तरुण शिलेदाराकडे दिली होती. अर्थात उरलेले हप्ते त्या नव्या शिलेदारानं फेडायचे आहेत , हे ते सांगायला विसरले नव्हते … […]

द अदर साईड ऑफ सोल – २

त्यादिवशी माझंही तसंच झालं. समोरचं एसटीचं धूड बघितल्यावर बावचळून मी बाईक साईडला घेतली . एसटीवाला निर्धास्तपणे गेला आणि मी साईडपट्ट्यांजवळ असलेल्या खडीच्या ढिगाऱ्यावर कोसळलो . गाडी माझ्या अंगावर पडली होती आणि मला ती बाजूला करता येत नव्हती . पण माझ्या सुदैवाने , शेजारच्या झाडाजवळ जेवायला बसलेला एक तरुण धावत आला आणि त्यानं गाडी बाजूला केली. मला उठवलं आणि शेजारच्या त्या झाडाच्या सावलीत नेलं. […]

द अदर साईड ऑफ सोल – १

त्यानं डोक्यावरची टोपी काढली . जमिनीवर आपटली . त्या टोपीवर तो थयथया नाचला . टोपीवर जोरात थुंकला आणि पायानं ती टोपी उडवली . टोपी नेमकी कंपाउंड जवळच्या कचराकुंडीत जाऊन पडली . मग त्यानं घाम पुसला . हात स्वच्छ पुसले आणि वरच्या खिशात ठेवलेली पानं हळुवारपणे माझ्या हाती दिली … मी प्रश्नार्थक मुद्रेनं त्याच्याकडे पाहिलं . आणि धक्काच बसला . […]

द अदर साईड ऑफ सोल !

अशी न लिहिली गेलेली आत्मचरित्रं , खूपच वेगळी असतात . अनवट वाटेनं जाणारी असतात . प्रचंड धक्कादायक असतात . खूप गुपितं लपवून ठेवणारी असतात . समाजात गदारोळ करणारी असतात . अनेकांचे बुरखे टराटरा फाडणारी असतात . नातेसंबंध ओरबाडून टाकणारी असतात . अशी आत्मचरित्रं सप्तरंगी नसतातच तर कृष्णधवल रंग त्यात मजबूत असतो . आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ,अशा आत्मचरित्रांचे नायक हे सर्वसामान्य असतात . त्यामुळे त्यांनी न लिहिलेल्या आत्मचरित्रातील त्यांचा आत्मा हा केव्हाच उडून गेलेला असतो . अशा न लिहिलेल्या आत्मचरित्रातील काही पाने माझ्या हाती लागली . […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..