नवीन लेखन...

आली दिवाळी – धनत्रयोदशी

आज धनत्रयोदशी. पारंपारीक दिवाळीचा दुसरा दिवस. धनाची पूजा करण्याचा हा दिवस. दसऱ्याच्या मुहूर्तावर सुरू झालेला कापणीचा हंगाम ओसरत आलेला असतो. शेतकऱ्याच्या खळ्यात धान्याच्या राशी लागलेल्या असतात. शेतकयांच्या नजरेतून खळ्यातल्या धान्याच्या राशी हेच त्यांचे धन..! ‘धान्य’ या शब्दातूनच ‘धन’ शब्दाचा जन्म झाला असावा, उगाच नाही ‘धन-धान्य’ हा जोडशब्द तयार झाला. आणि आज पैसा जे विनिमयाचं काम करतो, तेच काम पूर्वी ‘धान्य’ करायचं. म्हणजे बार्टर एक्स्चेंजच्या काळात धान्य हे महत्वाचं धन असायचं. […]

आली दिवाळी – वसुबारस

वर्षभर ज्या सणाची आतुरतेने वाट पाह्यची सवय लहाणपणापासुनच लागलेली आहे, तो दिवाळसण आजपासून सुरु झाला. यंदा गणपती, नववरात्राप्रमाणे दिवाळीवरही पावसाची सावट असल्याने आणि फटाक्यांमुळे होऊ शकणाऱ्या प्रदुषणाचा बागलबोवा उगाचंच उभा केला गेला असल्यामुळे थोडासा हिरमोड झाला हे खरं असलं तरी उत्साह मात्र कणभरही कमी झालेला नाही. परिस्थिती नैसर्गिक असो वा मानव निर्मित, सणांची राणी असलेल्या दिवाळीचं स्वागत तिच्या इतमामाने, पारंपारीक पद्धतीनेच केलं पाहिजे हे माझं आग्रहाचं मत आहे, मग पाऊस काही करो आणि कायदा काही म्हणो. दिवाळी हा कृषी संस्कृतीतला सण असल्याने या दिवसांत पाऊस हा असायचाच कारण शेतीचा तो अविभाज्य भाग आहे, पण या सणात कायद्याची लुडबूड मात्र अनाकलनीय आहे. असो, आपण आपला सण पारंपारीक पद्धतीनेच साजरा करावा असं मला वाटतं, क गाढव असतो..! […]

आली दिवाळी..

गणपती गेल्यानंतर वेध लागतात ते नवरात्राचे व त्यानंतर येणाऱ्या दसरा दिवाळीचे..दुकाने नविन कपड्यांनी सजू लागतात, सेल सुरू होतात..वर्तमानपत्रांत इलेक्ट्रॉनिक वस्तू, गाड्यांच्या मोठमोठ्या जाहीराती प्रसिद्ध होऊ लागतात अन् चाहुल लागते ती दिवाळीची..आणि दिवाळी म्हटलं की हटकून आठवतं ते अजरामर बालगीत– “दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी” […]

दिवाळीचा फराळ आणि आपले आरोग्य!!

लाडू, चिवडा, शेव, करंज्या, शंकरपाळे, अनारसे…..वाढता वाढता वाढे असलेली फराळाच्या पदार्थांची यादी. त्यात वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले मिठाईचे बॉक्स आणि आता तर चॉकलेटस् चे डबेसुद्धा. दिवाळी आली म्हणजे आठवडा- पंधरा दिवसांत हे सगळे पदार्थ खाऊन पोटाचा घेर हा हा म्हणता वाढतो. वजनाच्या काट्याची तर गोष्टच निराळी. अशा माहौलात वजनावर नियंत्रण कसे ठेवावे  याकरता पाच सोप्या टिप्स. १. […]

गोवत्स द्वादशी अर्थात वसुबारस

आश्विन कृष्ण द्वादशीला गोवत्स द्वादशी म्हणतात. यालाच ‘वसुबारस ‘ असे नांव आहे. समुद्रमंथनातून पाच कामधेनू निर्माण झाल्या. त्यातील नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हे व्रत आहे. या दिवशी स्त्रिया एकभुक्त राहून सायंकाळी सवत्स धेनूचे पूजन करतात. तिची प्रार्थना करतात. हे सर्वात्मिके आणि सर्व देवांनी अलंकृत अशा नंदिनी माते, तू माझी मनोकामना सफल कर. गोडधोड करून तिला खाऊ […]

धूर आणि कानठळ्या बसवणारा आवाज म्हणजे दिवाळी का?

भारतात सण आणि उत्सवांचा एक वेगळा इतिहास आहे आणि त्यात दिवाळीचा सण वेगळा नाही. दिवाळी साजरी करण्याची परंपरा प्राचीन काळा पासून चालत आली आहे. जीवनात प्रकाश निर्माण करण्यासाठी आणि काळोखाला दूर सारण्यासाठी पणत्या आणि समया देवघरात लावल्या जायच्या. त्यांचा प्रकाश मंद आणि आल्हाददायक वाटत असे. त्यापासून कमी उष्णता उत्सर्जित होत असे. दिवाळीत रांगोळी भोवती पणत्या लाऊन […]

कविता सागर दिवाळी अंकाला पुरस्कार जाहीर

जयसिंगपूर येथून जाहिरात विरहित व केवळ कवितांसाठी प्रसिद्ध होणा-या ” कविता सागर ” दिवाळी अंकाने उत्कृष्ट दिवाळी अंकाचे पारितोषिक पटकावले असून लवकरच ठाणे येथे होणार्‍या पुरस्कार वितरण सोहळ्यात ” कविता सागर ” चे प्रकाशक डॉ. सुनील पाटील यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
[…]

लक्षदीप हे रुपेरी पडद्यावरी ….

“मानवी भाव भावनांचं रहाणीमानाचं आणि समाजाचं प्रतिबिंब आपल्याला चित्रपटामधून उमटलेलं दिसतं. सणासुदींची परंपरा, व्रत वैकल्ये यांसारखे विषय हिंदी व प्रादेशिक चित्रपटांना अपवाद नव्हते; मग दिवाळी सारखा “राजेशाही सण” तरी कसा चित्रपटांपासून लांब असेल.. […]

चिरोटे

दिवाळीच्या सणात इतर फराळाबरोबरच बर्‍याच जणांच्या घरी हमखास केला जाणारा पदार्थ म्हणजे ‘चिरोटे’. अजून दिवाळीला बराच वेळ असला तरी हा पदार्थ आपण कोणत्याही सणाला करु शकतो असाच…
[…]

नरक चतुर्दशी

अश्विन कृष्ण चतुर्दशीला नरक चतुर्दशी असे म्हणतात. भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराला मारले तो दिवस, अश्विन कृष्ण चतुर्दशीचा होता.
[…]

1 2
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..