नवीन लेखन...

तंत्रविश्व – भाग ७ : ऑनलाइन कोर्सेसच्या विश्वात

कोरोनामुळे बदलत असलेल्या  परिस्थितिमुळे  विविध साधक बाधक बदल आपल्या जीवनशैलीवर झाले व होत आहेत. शिक्षण क्षेत्रही त्याला अपवाद नाही. ऑनलाईन शिक्षण हे केवळ शालेय विद्यार्थ्यांपुरते मर्यादित राहीले नसून स्वतः चा व्यवसाय अधिक लोकांपर्यंत पोहोचवू इच्छिणारे व्यावसाईक, स्वतःचे कौशल्य व ज्ञान वाढवून  वरीष्ठ पद मिळवू इच्छिणारे नोकरदार,स्पर्धात्मक युगात स्वतःचा वेगळा ठसा उमटवू पाहणारे महत्वाकांक्षी विदयार्थी अशा समाजातील बहुतांश गटाला सध्या ऑनलाईन शिक्षण आणि त्या बाबतीतील कोर्सेसची आवश्यकता भासतेय. […]

तंत्रविश्व – भाग ६ : उत्पन्नाचा ऑनलाइन मार्ग शोधताना..

    कोरोनामुळे निर्माण झालेल्या  परिस्थितीमुळे बहुतांश व्यक्तींना आर्थिक अडचणीना सामोरे जावे लागत आहे. अशावेळी अर्थप्राप्तीच्या  पर्यायी मार्गाचाही शोध घेतला जात आहे. जिओमुळे स्वस्त झालेल्या इंटरनेटचा वापर  मनोरंजनाबरोबरच माहिती,ऑनलाईन उत्पन्न मिळविण्यासाठी म्हणजेच online earningकरण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातोय.त्यासंबंधीचे आकर्षक थंबनेल असलेले युट्यूब व्हिडिओ पाहून अनेकांच्या मनात गैरसमज व अवास्तव अपेक्षा देखील निर्माण झाल्या आहेत.अशावेळी ऑनलाईन उत्पन्नाचे मार्ग, पद्धती योग्यरीत्या समजून न घेता त्या गोष्टी करावयास गेल्याने निराशाच पदरी पडते. अशावेळी तुम्ही ऑनलाईन उत्पन्नाचे पर्याय शोधत असाल तर काही बाबी लक्षात ठेवणे तुमच्या गरजेचे असेल. […]

तंत्रविश्व – भाग ५ : ऑनलाइन सिबिल स्कोर कसा चेक कराल ?

कोणत्याही प्रकारचे लोन देताना ज्या विविध गोष्टी बँका तपासतात त्यामध्ये प्रामुख्याने सिबिल स्कोर हा महत्वपूर्ण भूमिका निभावतो. हे सिबिल स्कोअर चेक करणारे अनेक वेबसाइट आहेत. परंतु या बेबसाईटवर दिलेल्या आपल्या माहितीचा गैरवापर केला जावू शकतो. त्याकरिता सिबिल स्कोर चेक करण्यासाठी www.cibil.com  या सरकारी वेबसाईटचा वापर करणे योग्य ठरते. […]

तंत्रविश्व – भाग ४ : ऑनलाइन शॉपिंग सुरक्षा

मित्रांनो आजचा जमाना हा ऑनलाइन शॉपिंगचा जमाना आहे. घरबसल्या आपल्या फोनद्वारे आपल्या दैनंदिन जीवनातील आवश्यक वस्तूंपासून ते मोबाईल इलेक्ट्रॉनिक, कपडे आणि अगदी फर्निचर देखील आपण सर्व काही ऑनलाईन मागू शकतो. अर्थातच त्यामुळे आपले जीवन अधिक सुखकर झाले असले तरी ऑनलाईन शॉपिंग करत असताना काही गोष्टींची खबरदारी घ्यावी लागते, अन्यथा आपली फसवणूक होण्याची शक्यता असते. […]

तंत्रविश्व – भाग ३ : COVID-19 आरोग्य सेतू अँड्रॉइड अँप

चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना व्हायरसने जगभर धुमाकूळ घातला आहे. आपल्या देशातही याचा प्रादूर्भाव झपाटय़ाने वाढत आहे.केंद्रसरकार कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहे.सरकारच्या या प्रयत्नांना साथ देणं हे आपलं कर्तव्य आहे.त्यासाठी केंद्र सरकारने ‘आरोग्य सेतू’ अँप तयार केले आहे, ते आपण डाऊनलोड करून त्याचा वापर करणे आवश्यक आहे. […]

तंत्रविश्व – भाग २ : मोबाईल बँकिंग सुरक्षितता

बँकींग व्यवहार मोबाईलद्वारे करण्याचे म्हणजेच ‘मोबाईल बँकिंग’चे प्रमाण नोटबंदी झाल्यापासून झपाट्याने वाढले आहे. बँकांनी देखील वेगवेगळ्या अँड्रॉईड अँपद्वारे मोबाईल बँकींग सुलभरित्या करण्याची सोय उपलब्ध करून दिली. सरकारने देखील यूपीआय सारखी सुरक्षित आणि जलदरीत्या फंड ट्रान्स्फर करणारी सुविधा उपलब्ध करून दिली. असे असले तरी एखाद्या अँपमधील आणि सुविधेमधील त्रुटींचा (loopholes) शोध घेऊन त्याचा आणि इतर मार्गांनी मिळविलेल्या माहितीचा वापर करून आर्थिक फसवणूक करण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे.त्यासाठी मोबाईल बँकिंग करताना ते सुरक्षितरित्या करणे आवश्यक असते. […]

तंत्रविश्व – भाग १ : गरज तंत्रसाक्षरतेची

तंत्रज्ञान जसे बदलत आहे तसे त्याचा गैरवापर करून फसवणूक करण्याचे लोकांचे प्रमाण देखील झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे बदलत्या  तंत्रज्ञानाचा तुम्ही वापर करा अगर करू नका परंतु दुसऱ्या कोणाकडून त्याचा गैरवापर केला जाऊन तुम्ही फसवले जाऊ नये असे वाटत असल्यास तंत्रज्ञान समजून घेणे आवश्यक ठरते. […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..