सेरेंगेटीतील श्वापदांचे अदभुत स्थलांतर
सफरीत ओढे, नाले, नद्या ओलांडण्यासाठी श्वापदांची एक रांगेत पन्नास किमी लांबीची विलक्षण रांग लागते. १९५१ साली ब्रिटिश राज्यकर्त्यांनी हा पाचहजार सातशे चौरस मैलांचा टापू ‘सेरेंगेटी राष्ट्रीय उद्यान’ म्हणून घोषित केला. श्वापदांच्या या मांदियाळीत सामील असतात, वनराज सिंह, डहाण्या वाघ, चित्ते, किंकाळी फोडणारे तरस, कोल्हे. वर आकाशात गिधाडे भक्षाच्या शोधात सतत घिरट्या घालत असतात. […]