नवीन लेखन...

जेवणाची योग्य वेळ कोणती – भाग 10

शरीरात एक बॅटरी असते. ती पुरवून पुरवून वापरायची असते. शरीराला रात्रौच्याच वेळी, पूर्ण विश्रांतीच्या वेळी ही उर्जा वापरायची असते. मोबाईल बॅटरीमोडवर जातो, तेव्हा बॅटरी लवकर संपते. चार्जिंग ऑन असताना त्याच्यावर ऑडीओ ऐका, नाहीतर, व्हिडिओ पहा. बॅटरीवर लोड नाही. तसंच सूर्य असताना दोन्ही जेवणं संपली की शरीरातील बॅटरीवर लोड नाही, जी उर्जा अन्य महत्त्वाच्या अंतर्गत कामासाठी वापरली […]

जेवणाची योग्य वेळ कोणती ? भाग 9

ऋतुनुसार, दिनमानानुसार सर्वसाधारणपणे सकाळी 6 ते 10 हा काल कफाचा, 10 ते 2 पित्ताचा आणि 2 ते 6 हा वाताचा काळ येतो. असेच सायंकाळ पासून सकाळ पर्यंत समजावे. जेवण हे भूक लागेल तेव्हा घ्यावे. भूक असेल तेवढेच घ्यावे. परंतु सूर्य असेपर्यंतच घ्यावे. म्हणजे सर्व साधारणपणे दिवसा जेवावे. रात्रौ जेवू नये. व्यवहारात, नियम करायचाच झाल्यास, जेवणाच्या मुख्य […]

जेवणाची योग्य वेळ कोणती ? भाग 8

योगरत्नाकर या ग्रंथामधील हा आणखी एक श्लोक पहा. सायं प्रातर्मनुष्यानां अशनं श्रुतिचोदितम्। नान्तरा भोजनं कुर्यात् अग्निहोत्र समो विधि:।। शास्त्रात इतक्या स्पष्ट शब्दात लिहिले आहे. सायंकाळी आणि सकाळी या दोन वेळा जेवले पाहिजे. जसे सूर्योदय आणि सूर्यास्त या वेळी अग्निहोत्र चुकत नाही, तसंच भोजन हे पण एक प्रकारचे अग्निहोत्रच आहे. या वेळेला जेवण्याचा नियम अजिबात चुकवू नये. […]

जेवणाची योग्य वेळ कोणती – भाग 7

आधी पोटोबा मग विठोबा ही म्हण का पडली असेल ? दिव्यात वात तोंडात हात, अशी एक म्हण आपल्याकडे रूढ आहे. म्हणजे सूर्यास्त झाल्यावर देवाकडे दिवा लावला की लगेचच जेवून घ्यावे. काहीजण म्हणतात, दिव्यात जेव्हा वात लावली जाते, तेव्हा तोंडात हात नको. ते पण बरोबरच आहे. अगदी त्यावेळी नको. पण त्यानंतर दहा पंधरा मिनीटात, दिवसा उजेडी जेवण […]

जेवणाची योग्य वेळ कोणती – भाग 6

कावळ्याचिमणीची गोष्ट गुरू दत्तात्रेयांनी 24 गुरू केले होते. त्यात एक क्षुद्र किटक, कोळी सुद्धा होता. भक्ष्याला पकडण्यासाठी तयार केलेलं जाळं तुटलं तरी जिद्द न हरता, परत परत तो तयार करीत होता. ज्याच्याकडून जे शिकता येईल ते शिकावं हे दत्तगुरूनी शिकवलं होतं. तसं हा कावळा पक्षी माझा गुरू झाला. खूप काही शिकवून गेला. एकदा रात्री साडे दहा […]

जेवणाची योग्य वेळ कोणती – भाग 5

सगळे कावळे एकाच आकाराचे कसे ? हा प्रश्न एकदा मला पडला. त्याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा विचारांची गाडी सूर्यास्तापाशी येऊन थांबली. वो हुआ कुछ इस प्रकार… एकदा समुद्रकिनारी फिरताना, पंधरा वीस कावळे काहीतरी “फिस्ट” चा आनंद मजेत घेत होते. जवळ जाऊन बघितले तर तो एक मेलेला कुत्रा होता. खूप घाणेरडा वास येत होता. बहुतेक तीन […]

जेवणाची योग्य वेळ कोणती – भाग 4

दिवसा सूर्य असतो. रात्री सूर्य नसतो. सूर्य म्हणजे साक्षात अग्नि. पचनाला मदत करणारा. म्हणून तर आयुर्वेदात एक वचन आहे, आरोग्यम् भास्कराद् इच्छेत. म्हणजे आरोग्य ठीकठाक ठेवण्यासाठी सूर्याची भूमिका महत्वाची आहे. सर्वात शुद्ध काय असते ? अग्नि सर्वात शुद्ध. सूर्य म्हणजे अग्नि. सूर्य म्हणजे शुद्धता. सूर्य उगवला की बाकी सर्व जीवजंतु नष्ट व्हायला सुरवात होते. या सूर्याची […]

जेवणाची योग्य वेळ कोणती – भाग 3

जेवण सकाळी आणि सायंकाळी करावे ? काहीतरीच सांगताय राव ! ही काय जेवायची वेळ आहे ? भूक तर लागली पाहिजे ना ! आमचं सकाळचा नाश्ता खाल्लेलाच पचत नाही, तर जेवायचं कुठुन ? यासाठी काही मुलभुत गोष्टी समजून घ्याव्या लागतील. आज जे काही सांगितले जातेय, ते कितपत योग्य आहे ते आधी ठरवावं लागेल. दर दोन तास किंवा […]

जेवणाची योग्य वेळ कोणती ? भाग 2

रोग वाढण्याच्या काही कारणांचा विचार केला असता, त्यातील एक कारण म्हणजे जेवणाची वेळ न पाळणे. उत्तम आरोग्यासाठी जेवणातील अन्नपदार्थ हा वेगळा च विषय होईल, पण केवळ जेवणाची वेळ पाळल्याने बरेचसे आजार कमी होतात किंवा आयुर्वेदीय परिभाषेत सांगायचे झाल्यास, व्याधीचा संप्राप्ती भंग करता येतो. कमी वेळात व्याधीची लक्षणे कमी होत जातात. आणि लवकर बरे वाटते. म्हणून जेवणाची […]

जेवणाची योग्य वेळ कोणती ? भाग 1

केवळ जेवणाची वेळ बदलली तरी अनेक आजार बरे होतात, बरे नाही, निघूनच जातात कायमचे. त्यासाठी पथ्य एकच. मी मला स्वतःला बदलायची तयारी ठेवायला हवी. नेमकी जेवणाची वेळ कोणती आहे, यावर पुनः मतमतांतरे असण्याची शक्यता आहे. आयुर्वेद म्हणतो. रोगाच्या मुळापर्यंत पोचा. तरच तो रोग कायमचा नष्ट होईल…… ……केवळ वैद्य सुविनय दामले म्हणतो आहे, म्हणून नव्हे, हा अहंकार […]

1 2
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..