नवीन लेखन...

।। श्रीपंत महाराज बाळेकुंद्रीकर ||

गुरुतत्त्व मासिकाचा ऑक्टोबर महिन्याचा अंक हा सद्गुरु श्री पंत महाराज बाळेकुंद्रीकर यांच्या जीवनचरीत्रावर आहे. महाराजांचे जीवन हे अलौकीक आहे. आपल्याला वाचनातुन लक्षात येईलच. गुरुतत्त्वाचे हे ३० वे पूष्प महाराजांच्या चरणी समर्पीत करीत आहे. श्रीपंत महाराज बाळेकुंद्रीकर यांचे व्यावहारिक नाव दत्तोपंत होते. वडिलांचे नाव रामचंद्रपंत व मातोश्रींचे गोदाक्का उर्फ सीताबाई. श्री पंतमहाराजांचा जन्म श्रावण वद्य ८ शके […]

क्षेत्र गाणगापूर तथा गंधर्वपूर

दत्त संप्रदायाची काशि म्हणुन गाणगापूर या तीर्थाचे महत्व सांगितले आहे. श्री नृसिहंसरस्वतीनी आपल्या ८० वर्षाचे कालखंडात १२ वर्षे क्षेत्र नरसोबाची वाडी येथे वास्तव्य केले. औदुंबर क्षेत्र (भिल्लवडी) व पंचगंगा संगम नृसिंहवाडी किंवा नरसोबाची वाडी ही दोन स्थाने म्हणजे नृसिहसरस्वतीची विशेष प्रीति असलेली ठिकाणे आहेत. श्रीपाद श्रीवल्लभ व नृसिह सरस्वती दोघेही कृष्णानदीचे भक्त होते. साक्षात हरीतनु कृष्णा […]

एक तर्क

श्रीदत्तमहाराजांचे सद्भक्त पुन्हा पुन्हा जन्म घेऊन श्रीदत्तमहाराजांचे कार्य करत आपली आत्मिक उनती साधतात. किंबहुना श्रीदत्तमहाराजाच आपल्या सद्भक्तांना पुर्नजन्म देऊन त्यांच्याकडून इप्सित कार्य करवून घेतात. गेल्या १००० वर्षांतील दत्तभक्तीचा आणि दत्तभक्तांच्या आयुष्याचा वेध घेतला असता याबद्दल प्रचिती येते. दामाजीपंतांनी दुष्काळात अन्नधान्याचे कोठार सर्वसामान्य जनतेसाठी खुले केले होते आणि तशीच घटना साताऱ्याचे देव मामलेदार यांच्या आयुष्यातही घडली. नावे […]

श्री. जगन्नाथ पाठक ।। सद्गुरुमाऊली जगन्मित्र ।।

सप्टेंबर २०१९ महिन्याचा गुरुतत्त्व विशेषांक दत्तमहाराजांची कर्मभूमी असलेल्या श्री क्षेत्र गाणगापूर स्थित जय गुरुदेव आश्रम ट्रस्टचे संस्थापक ब्रह्मलीन परमपूज्य जगन्नाथ चिंतामण पाठक गुरुजी यांच्या जीवनावर आधारित आहे. “भक्तकामकल्पदुम” श्रीमद्गुरुचारत्र” हा पाचवा वेद म्हणून मानल्या गेलेल्या परमाण प्रासादिक अलैकिक ग्रंथाची इ. स. १९५४ सालापासून गेली ६० वर्षे सातत्याने शेकड पारायणे करुन त्याद्वारे “ग्रंथ हेच गुरु” हे तत्त्व […]

।। सद्गुरु श्री राऊळ महाराज ||

गुरुतत्त्व मासिकाचा फेब्रुवारी महिन्याचा अंक हा सद्गुरु श्री राऊळ महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित आहे. महाराजांचे चरीत्र वाचन करताना आपल्याला त्याची अनुभूती येईलच. हे सर्व संत माहात्म्ये हे गुरुतत्त्वाचेच अवतार आहेत. जे मनुष्याला अध्यात्मिक प्रगती करून देण्यासाठी स्वतः खडतर असे जीवन जगून कुठल्याही परिस्थितीत साधना करून परमार्थिक उन्नती करुशकतो याचे मार्गदर्शन करीत असतात. सर्व सामान्यपणे जीवन […]

गुढी पाडवा – माहात्म

सनातन भारतीय संस्कृतिनुसार वर्षातील साडेतीन मुहूर्त अतिशय महत्वाचे आहेत. गुढीपाडवा, अक्षयतृतीया व विजयादमी हे पूर्ण मुहूर्त आहेत. कार्तीक शुक्ल बलि प्रतिपदा हा अर्धामुहूर्त आहे. या दिवशी कार्यरंभ केल्यास कार्य सिध्दीस जाते. हा अनेक भाविकांचा अनुभव आहे. वर्षातील पहिला मुहूर्त गुढीपाडवा होय म्हणूनच याला विशेष महत्व आहे. वर्ष भरा चे सद्संकल्प या दिवशी करावयाचे असतात. सृष्टीच्या निर्मितीचा […]

नृसिंहभान देवस्थान

चैत्र शुद्ध त्रयोदशी शके १८०० दुपारी ४ च्या सुमारास वटवृक्षाखाली (सध्याचे वटवृक्ष देवस्थान) परब्रह्म श्री स्वामी महाराजांनी आपल्या सगुणदेहाचे महानिर्वाण केले. श्रीमहाराजांची समाधी कोठे करावी, या प्रश्नावर अनेकांचे वाद झाले. अखेर कारभारी रा. नानासाहेब बर्वे यांच्या मध्यस्थीने हा वाद मिटविण्यात आला. श्रीस्वामी महाराजांचे भक्त चाळप्पा यानी त्यांच्या घराजवळील श्रींनी स्थापन केलेल्या देवस्थानाच्या गर्भगृहात श्रींची समाधी बांधण्याकरीता […]

।। श्री राम समर्थ ।। समर्थांचा स्त्री दृष्टीकोन व समर्थ शिष्या

“जाम समर्थ” या समर्थांच्या जन्मगावी श्रीराम मंदिर आहे. तेथे जगातील १० वे आश्चर्य अनुभवावयास येते. तेथे सीतामाई श्रीरामांच्या उजव्या बाजूस उभ्या आहेत व येवढेच नाही तर तेथे लग्नकरुन पहिल्यांदा दर्शनास आलेल्या नवरदेवाने आपल्या नवविवाहित पत्निस नमस्कार करावा लागतो हा प्रघात आहे. ही पुरुष प्रधान संस्कृतीला बगल देणारी प्रथा ४५० वर्षापूर्वी श्री समर्थांनी आपल्या राममंदिरात घालून तत्कालीन […]

अध्यात्मात सद्गुणांचे महत्व

मार्गांधारे वर्तावि । विश्व हे मोहोरे लावावे ।। या ज्ञानदेवांच्या उक्तीप्रमाणे पू. स्वामी स्वरुपानंदाचे जीवन होते. सहज बोलण्यातून, अत्यंत हळुवारपणे ते साधकाला मार्गर्शन करीत असत. या सर्वांतून सर्वांच्या साधनेला गती मिळत असे. मानवी जीवन हे निवृत्ती व प्रवृत्तीच्या किनाऱ्यातून वाहत असते. साधकही या गतिमान जीवनात हेलकावे घेत असतो. तेव्हा आपले ज्ञानेश्वरी, दासबोध, श्रीमद्भागवतासारखे ग्रंथ, संतांचे अभंग, […]

सदगुरु श्री स्वामी स्वरूपानंद

घरातील सांप्रदायिक वातावरणामुळे पारमार्थिक संस्कार लहानपणापासून झाले होते. ते अलौकिक बुद्धिमत्तेमुळे विविध विषयांत पारंगत होत होते. रामचंद्रांना संस्कृत विषयात रस होता. एकीकडे त्यांचे आध्यात्मिक विषयांचे वाचन, श्रवण, मनन, निदिध्यास सुरु होते, तर दुसरीकडे त्यांच्या शैक्षणिक जडणघडणीच्या काळात पारतंत्र्याच्या जोखडाखाली सापडलेल्या भारत देशात स्वातंत्र्याचे वारे वाहत होते. तरुणाई नवचैतन्याने भारुन गेली होती. […]

1 2 3
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..