नवीन लेखन...

मनातुरता

क्षिणले स्वर आता थकलेली ही लोचने जाहली कातरवेळा वाटते तुजला भेटावे ।।१।। बिंब ते तेजाळलेले सांजेस गुलमुसलेले गगनही अंधारलेले वाटते तुजला भेटावे ।।२।। उचंबळलेल्या भावना मिठीस आसुसलेल्या शिथिल सारीच गात्रे वाटते तुजला भेटावे ।।३।। क्षितीजी रंग केशरी सत्यप्रीत ती आगळी मन स्मरणात गुंतलेले वाटते तुजला भेटावे ।।४।। वि.ग.सातपुते.(भावकवी) 9766544908 रचना क्र. ८० १९ – ६ – […]

कृष्णरूप

राऊळी, गाभारी नयन मी मिटलेले अंतरंग उजळलेले भक्तीप्रीतीत रंगलेले ।।१।। रूपडे निळेसावळे कृपासिंधू, कृपाळू ओढ नित्य अनावर भान माझे हरपलेले ।।२।। क्षणक्षण पुण्यपावन भक्तीत रंगगंधलेला ध्यानमग्न मीराराधा कृष्णरूप तेजाळलेले ।।३।। रूप लडिवाळ लाघवी अंतरी साक्ष दयाघनाची निरांजनी दिपवी ज्योत श्वास सारे सुखावलेले ।।४।। वि.ग.सातपुते.(भावकवी) 9766544908 रचना क्र. ७९ १८ – ६ – २०२१.

बाप

आधार निश्चीन्ततेचा वटवृक्षाचीच सावली साथ शाश्वत निर्भयी सोबत सुखदुःखातली ।।१।। मूक, करडे आभाळ सांत्वनी, आधार हात फक्त निस्वार्थीच दाता जीवनाला सावरणारा ।।२।। हाच खरा भगवंत जगी कृपाळू, कृपावंत सदा घडविणारा, जगविणारा पुजावा, भजावा अंतरी ।।३।। वि. ग.सातपुते.(भावकवी) 9766544908 रचना क्र. ८३. २० – ६ – २०२१.

असा मी

जगण्यात रोज मरतो मरण्यास खास जगतो.. साधून संधि मीही मनसोक्त येथ चरतो .. उत्कर्ष का कुणाचा पाहून आत जळतो .. खड्ड्यात तोहि पडता का मी हळूच हसतो.. अपघात दूर दिसता मागे खुशाल पळतो.. — विजयकुमार देशपांडे, सोलापूर 9011667127

लोकप्रिय गझल गायक पंकज उदास

१९८६ साली ‘नाम’ या चित्रपटातील ‘चिठ्ठी आयी है..’ या गाण्याच्या माध्यमातून पंकज उधास नावारूपाला आले. त्यांचा जन्म १७ मे १९५१ रोजी झाला. आज देशातील गझल गायनातील ते एक प्रमुख गायक मानले जातात. त्यांनी गझल गायनाला एक वेगळी शैली आणि आयाम प्राप्त करून दिले आहे. पंकज उदास यांनी एक से बढकर एक गझल देत रसिकांना त्यांच्या दुनियेत मश्गुल केले. सारं […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..