नवीन लेखन...

निसर्गाचा चमत्कार

सोळा वर्षांचा ज्ञानोबा    महाकवी झाला गीतेंवरी टिपणी लिहून    मुकुटमनी ठरला गजाननाचा आशिर्वाद    लाभला त्याला ज्ञानेश्वरीचा प्रवाह    हातून वाहूं लागला अष्टावक्र दिसे विचित्र    परि महागीता रचिलि अकरा वर्षाच्या मुलानें    मान उंचावली विटी दांडू खेळत असतां    काव्य करुं लागला शारदा होती जिव्हेवरती    ज्ञान सांगू लागला निसर्गाची रीत न्यारी    चमत्कार तो करितो भव्य दिव्यता दाखवूनी    आस्तित्व त्याचे भासवितो डॉ. […]

तिचा पहिला नंबर

आदले दिवशी येऊनी,  तिजला अभिनंदन दिले पास झालीस सांगुनी,  मित्रांनी पेढे मागितले हास्यवदन करुनी,  साखर हातीं दिली हाती मिळतां निकाल,  पेढे देईन वदली आंत जाऊनी खोलीमध्यें,  बंद केले दार दुःख आवेग येऊनी,  रडली ती फार वरचा मिळेल नंबर,  तिजला होती आशा रात्र रात्र जागूनही,  मिळाली तिज निराशा खूप कष्ट करुनी,  अपयश येता पदरीं दुःख तया सारखे,  […]

स्फूर्ती दाता

तुम्ही गेला आणि गेले सुकूनी माझे काव्य समजूनी आले रूप तुमचे होते जे दिव्य तुमच्या अस्तित्वाने मजला येत असे स्फूर्ती प्रफूल्लीत ते भाव सारे ओठावर वाहती कोकीळ गाते गाणे जेंव्हां वसंत फुलतो वनी मोर नाचे तालावरती श्रावण मेघ बघूनी हासत डोलत कळी उमलते प्रात: समयी दवबिंदूच्या वर्षावाची किमया सारी ही गात नाचत फुलत राहतो चैतन्याने कुणी […]

आरसा

दाखवितोस हूबेहूब रुप आरशामध्ये मला मीच माझे रुप बघूनी चमत्कार वाटला सत्य स्थितीचे द्दष्य करुनी दाखविलेस सर्वाला उणें अधिक न करितां तसाच दिसे आम्हाला गुणदोष बघूनी देहाचे मुल्य मापन करितो आम्हीं चांगले राहण्या शिकवी हीच युक्ती नामी कांचेच्या आरशापरीं असे मनाचा अरसा आत्म्याची मलीनता दाखवुनी चांगला बनवी माणसा — डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com  

जादूगार तूं देवा

जादूगार तूं देवा,  दाखवी चमत्कार आठवण येण्या तुझी,  करितो हाः हाः कार   ।।धृ।। ढग काळे काळे जमवितोस सगळे गर्जती वादळे कडाडूनी विजा,  पर्जन्य होई भयंकर   ।।१।। जादूगार तूं देवा,  दाखवी चमत्कार आठवण येण्या तुझी,  करितो हाः हाः कार तळपते ऊन दग्ध होई जीवन जाई वाळून तेज वाढूनी सूर्याचे,  दाह करी फार   ।।२।। जादूगार तूं देवा,  दाखवी […]

निसर्गाचे चक्र

सतत फिरत राहते चक्र निसर्गाचे उत्पत्ति स्थीति लय ह्या कालकृमणाचे  ।।धृ।। एक एक पाकळी लहानशी कळी जाई उमलून फूल त्याचे बनून सुगंधी टपोरे फूल कांही वेळ राहील कोमेजून जाई देऊनी रुप बीजाचे परत अंकूरण होई दुजा एका झाडाचे  ।।१।। सतत फिरत राहते चक्र निसर्गाचे एक एक पाऊल टाकते मुल वाढते हसून बनते यौवन एटदार तो दहधारी […]

आठवावे मृत्यूसी

निसर्गाची रचना, जन्म मृत्यृची योजना, गती देई जीवन चक्रांना,  ईश्वरी शक्ती  १ उत्पत्ती लय स्थिती, या त्रिगुणात्मिक शक्ती याच तत्वे निसर्ग चालती,  अविरत   २ ईश्वरी योजना महान, खेळ जीवनाचा चालवून घडवी शक्तीचे दर्शन, निसर्ग रूपाने   ३ वस्तूचे निरनिराळे आकार,  चेतना देवूनी करी साकार यास जीवन संबोधणार,  आपण सारे   ४ मातीची भांडी असती, विभिन्न रूपे मिळती वापरून […]

आला ! आला रे पाऊस !

आला  !   आला रे पाऊस ! धरणीला मीलनाची आंस    //धृ// गेली होती तापूनी      रखरखली सारी, अंग जाता वाळूनी     भेगा पडती शरीरी  ।। थकली ती सोसूनी     उकाड्याचे चार मास आला  !   आला रे पाऊस ! धरणीला असे मीलनाची आंस    ।।१।। पाणी गेले आटूनी     नदी नाले कोरडे, पहाटेच्या दवातूनी   झाडे जगती थोडे  ।। गेली हरळी जळूनी   बीजे टाकूनी […]

मुंगी

मग्न राही सतत आपल्याच कामीं अन्नासाठी तूं फिरे दाही दिशानी जमवितेस कणकण एकत्र करुनी दूर द्दष्टीचा स्वभाव दिला तुज कुणी सुंदर तुझी वास्तूकला वारुळ केले छान सहस्त्रांच्या संखे राहतेस आनंदानं कष्ट करण्याचा गुण दाखवी साऱ्याना कष्टाला पर्याय नसे ह्या जीवना डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com      

भिकारीण

मधूर आवाज मिळूनी, उपकार झाले तिजवर सुंदर गाणे गाऊनी, आनंदीत करी इतर    // हातपाय दुबळे होते, दृष्टी नव्हती तिजला कष्ट करण्या शक्ति नव्हती, कसा मिळेल घास तिला    // परी ती होती आनंदी, गाण्याच्या ओघांत उचलित होती पैसे, पडता तिच्या पदरांत    // जरी झाला देह दुर्बल, जगण्याची होती आंस मनी मिळालेल्या आवाजाला, ऋणी समजे ती मनी   // […]

1 2 3 4 14
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..