नवीन लेखन...

विजेचे दुःख

चमकत लपकत आली कडकडाट करुनी गेली प्रकाशमान केले जगासी दूर केले अंधारासी भयाण होता अंधःकार लख्ख प्रकाश देई आधार घेई सर्वांच्या मनाचा ठाव भिती असूनही प्रसन्न भाव करुनी शक्तीचे भव्य प्रदर्शन निर्माण झाला मनी अभिमान परि दुःखी होते तीचे मन ‘क्षणिक’ लाभले तिला जीवन डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail- bknagapurkar@gmail.com  

वातावरण

विचारांची उठूनी वादळे अशांत होते चित्त सदा आवर घालण्या चंचल मना अपयशी झालो अनेकदां विष्णतेच्या स्थितीमध्यें नदीकांठच्या किनारीं गेलो वटवृक्षाच्या छायेखालच्या चौरस आसनावरी बसलो डोळे मिटूनी शांत बसतां अवचित घटना ती घडली विचारांतले दुःख जावूनी आनंदी भावना येऊं लागली एक साधूजन ध्यान लावीत बसत होता त्या आसनावरी पवित्र्याची वलये फिरती आसन दिसले रिकामें जरी वातावरणाची ही […]

भरताचा जाब

ज्याच्यासाठीं व्याकूळ झाली, उभी अयोध्या नगरी, कां धाडिला राम वनीं ?   कैकयीला भरत विचारी   ।।धृ।। आम्ही बंधू चौघेजण, झालो एका पिंडातून, कसा येईल भाव परका ? असतां एकची जीव, चार शरीरीं कैकयीला भरत विचारी   ।।१।। वचनपूर्ती ब्रीद ज्याचे, आदर्श जीवन रघूवंशाचे, कसली शंका मनांत होती ? पारख ना केलीस, त्या हिऱ्याची परी, कैकयीला भरत विचारी   ।।२।। […]

कळसूत्री बाहुल्या

बागेतील तारका- नाचत होत्या दोन बाहुल्या, इकडून तिकडे टकमक पाहात होत्या, हांसत चोहीकडे झीम्मा खेळे, फुगडी खेळे, गरगर फिरती हातवारे करुन त्या, माना डोलावती जवळ येवून गुजगोष्टी, सांगे एकमेकींना सासू नणंद यांच्या, कुलंगड्या काढतांना सुख दुःखाच्या कथा, सांगितल्या त्यांनीं कांहीतरी करुन दाखवूं, वदल्या दोघीजणी अज्ञानी गरीब बिचार्‍या, जेंव्हा संकल्प करती कळसुत्री बाहूल्या त्या, दोर इतरां हातीं […]

बीज वृक्षाचे चक्र कुणाचे ?

सुक्ष्म बिजाचे रोपण करतां, वृक्ष होई साकार कोण देई हा आकार ? तूं तर दिसत नाही कुणाला,  घडते मग  कसे ? कोण हे घडवित असे ? प्रचंड शक्ती देऊनी बीजाते, प्रचंड करितो वृक्ष कोण देई ह्यांत लक्ष ? त्याच वृक्ष जातीचे गुणही येती, रुजलेल्या त्या बीजांत ही किमया असे कुणांत ? तोच वृक्ष वाढूनी फळे देतो,  […]

1 12 13 14
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..