नवीन लेखन...

देह ईश्वरी रूप

स्नान करूनी निर्मळ मनीं,   दर्पणापुढे  येऊन बसला  । जटा साऱ्या एकत्र बांधूनी,   भस्म लाविले सर्वांगाला  ।। ओंकाराचा शब्द कोरला,   चंदन लावूनी भाळावरती  । रूद्राक्षाच्या माळा बांधल्या,   गळा हात नि शिरावरती  ।। वेळेचे भान विसरूनी,   तन्मय झाला रूप रंगविण्या  । प्रभू नाम घेत मुखानें,  नयन आतूर छबी टिपण्यां  ।। पवित्र आणि मंगलमय,  वाटत होते स्वरूप बघूनी  । […]

सत्कारणी वेळ

करू नकोस विचार त्याचा,  करणे नाही जेंव्हां तुजला मोलाचे हे जीवन असता,  व्यर्थ दवडशी वेळ कशाला….१ दोन घडीचे जीवन सारे,  क्षणा क्षणाने जाईल निघूनी कुणासाठी हा काळ थांबला,  उत्तर याचे घे तू शोधूनी….२ लहरी उठतील विचारांच्या,  आघात होता जेंव्हां मनी विवेक बुद्धीने शांत करावी,  भाव तरंगे त्याच क्षणी….३ मर्यादेचे आयुष्य असता,  वाहू नकोस विचार प्रवाही भगवंताचे […]

आयुष्य लढा

चोखपणे तू हिशोब राहू दे,  आपल्या जीवन कर्माचा कुण्याही क्षणी पाढा वाचणे, भाग बनेल तो नशीबाचा…१ घीरट्या घालीत फिरत राही,  आवतीभवती काळ क्षणात टिपून उचलून घेतो,  साधूनी घेता अवचित वेळ..२ सदैव तुमच्या देहाभवती,  त्या देहाचे कर्मही फिरते आत्मा जाता शरीरही जाई,  कर्मवलय परि येथेच घुमते….३ पडसाद उमटती त्या कर्माचे,  सभोवतालच्या वातावरणी वेचूनी त्यातील भलेबुरे ,  मागे […]

शबरीचे निर्मळ प्रेम

ठेवूनी भक्तिभाव उरी  अर्पिती बोरे शबरी   ।।धृ।।   व्याकूळ होती राम भेटी रात्रंदिनी नाम ओठी नाचूनी गाऊनी भजन करी   ।।१।। ठेवूनी भक्तिभाव उरी  अर्पिती बोरे शबरी   बोरे जमवित चाखूनी वेचली अंबट तुरट दूर फेकली भोळ्या भक्तांची प्रभू कदर करी    ।।२।। ठेवूनी भक्तिभाव उरी  अर्पिती बोरे शबरी   उष्टी बोरे प्रभू चाखती शोषूनी त्यातील रसभक्ती शबरी […]

लग्नाचा पन्नासावा वाढदिवस

पन्नास वर्षे एकत्र नांदलो आयुष्यातील मार्गप्रवाही कसा काळ निघुनी गेला केव्हांच समजले नाही  ।।१।। काळ विसरलो,  वेळ न विसरे क्षणाक्षणाच्या प्रसंगाची सुखदुःखानी भरलेल्या अनेक अशा घटनांची ।।२।। सैल झाला जीवन गुंता कधीतो गेला आवळूनी उकलणार नाही कधीच तो जाणीव आली मनी  ।।३।। हेच असेल विधी लिखित जिंकणे वा हारणे आयुष्याचा मार्ग खडतर समजुनी त्याला घेणे  ।।४।। […]

तल्लीनतेत आहे ईश्वर

श्रीकृष्णाचे जीवन   बनली एक गाथा यशस्वी होई तुमचे जीवन   चिंतन त्याचे करिता    ||१|| तल्लीनतेच्या गुणामध्यें   लपला आहे ईश्वर तल्लीनतेचा आनंद लुटा    शिकवी तुम्हा मुरलीधर    ||२|| बालपणीच्या खेळामध्ये   जमविले सारे सवंगडी एकाग्रतेने खेळवूनी    आनंद पदरीं पाडी    ||३|| मुरलीचा तो नाद मधूर    मन गेले हरपूनी डोलूं लागले सारे भवतीं    मग्न झाल्या गौळणी    ||४|| टिपऱ्या घेवूनी नाच नाचला    गोपी […]

मग्न असलेले जग

मलाच वाटे – – जग मजलाच हांसते विचार करिता कळले  —  जगास फुरसत नसते  ।। धृ ।।   वेगांत चालते जग,    क्षुल्लक तुमचा सहभाग ह्या अथांग जनसागरीं,   कुणी न पुसती तुम्हांपरी आपल्यातच जग जगते विचार करिता कळले  —   जगास फुरसत नसते  ।। १।।   प्रत्येकांचे प्रश्न निराळे,    गर्क आहेत सोडविण्या सगळे उगाच होई भास मजला,    मनाचा […]

अतृप्त भूक

चंद्रा तुझे रूप कसे रे,  गोंडसवाने छान टक लावूनी बघता, हरपूनी जाते भान मधूर शुभ्र नभी चंद्र तो,  जणू चांदीची थाली अगणीत वाट्या विखूरलेल्या,  दिसे भोवताली टपोर चांदणे वाहूनी जाते,  त्या थाली मधूनी स्वाद लूटता धुंद होतो,  घेता ते झेलूनी रिक्त होते एक वाटी ती, भरूनी जाई दुजी प्राशन करिता सीमा नसे मग,  आनंदा माजी अतृप्त […]

नाजूक वेली

नाजूक नाजूक वेली मनीं तु माझ्या बसली   //धृ//   हिरवी साडी अंगावरी      खडी रंगीत किनारी ठिपके चमकती पांढरे       त्या साडीवरती पसरे आकर्षक साडी नेसली   //१// नाजूक नाजूक वेली मनीं तु माझ्या बसली   शरीर तुझे बांकदार      रुप तुझे मनोहर चपळाईने तूं वाढते       दूर जाण्या झेपावते वाकड्या चालीत शोभली  //२// नाजूक नाजूक वेली मनीं तु माझ्या बसली […]

वेड लावतोस तूं कुणां कुणां !

हे मुरलीधर मनमोहना वेड लावतोस तूं कुणां कुणां ? //धृ//   तुझ्या भोवती नाचती गौळणी भान त्यातर गेल्या हरपूनी थकूनी गेल्या नाच नाचुनी विसरुनी गेल्या घरदारानां //१// वेड लावतोस तूं कुणां कुणां ? हे मुरलीधर मनमोहना   रमले सारे गोकूळवासी पेंद्या, गोंद्या, सख्या, बन्सी बागडती सारें तव सहवासी करमत नाही तुजविण त्यांना //२// वेड लावतोस तूं […]

1 2 3 14
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..