नवीन लेखन...

 देवाचिया दारीं

देवाचिया दारीं, मनाचा मुजरा, झुकवूनिया मान, हासे तो चेहरा ।। धृ ।।   जाई जेव्हां मंदिरी, घेतां प्रभू दर्शन, आनंदानें नाचते, हर्षित चंचल मन, नयन साठविती, त्या मंगल ईश्वरा, देवाचिया दारी मनाचा मुजरा  ।।१।।   नदीनाले धबधबा, उंच उंच वृक्ष वेली, कोकीळ गाती, मोर नाचे, इंद्रधनुष्याच्या खाली, रोम रोमातूनी शिरे, निसर्गाचा फवारा, देवाचिया दारी मनाचा मुजरा  […]

 झगडणारे जीवन

गर्भामधूनी बाहेर पडतां,  स्वतंत्र जीवन मिळे  । जीवन रस हा शोषित होती,  आजवरी त्याची मुळे  ।। निघून गेला पदर मायेचा,  डोईवरूनी त्याचा  । झेप घेयी तो आज एकला,  पोकळीत नभाच्या  ।। दु:ख क्लेशाचे वार झेलले,  कुणीतरी त्याचेसाठीं  । आज दुवा नसता  सारे पडती पाठी  ।। तेच रक्त परि फिरत होते, शरीरी त्याच्या सारे  । वंशाने जे […]

पुण्य संचय करा

ज्या ज्या वेळी येई संकट,   धांव घेत असे प्रभूकडे  । संकट निवारण करण्यासाठीं,  घालीत होता सांकडे  ।। चिंतन पूजन करूनी,  करीत होता प्रभू सेवा  । लाभत होती त्याची दया,  त्याला थोडी केव्हां केव्हां  ।। संकटी येता करी पूजन, उपयोग होईना त्याचा  । कामी येईल पुण्य ,  विचार करीतां भविष्याचा  ।। संचित पुण्य आजवरचे,  कार्य सिद्धीला लागते  […]

आला ! आला रे पाऊस !

आला  !   आला रे पाऊस ! धरणीला मीलनाची आंस    //धृ//   गेली होती तापूनी      रखरखली सारी, अंग जाता वाळूनी     भेगा पडती शरीरी  ।। थकली ती सोसूनी     उकाड्याचे चार मास आला  !   आला रे पाऊस ! धरणीला असे मीलनाची आंस    ।।१।।   पाणी गेले आटूनी     नदी नाले कोरडे, पहाटेच्या दवातूनी   झाडे जगती थोडे  ।। गेली हरळी जळूनी   […]

 कठीण खेळ

चंचल केलंस मन,    स्थिर करण्यासांगे  । दिलेल्या गुणाची मग,   बदलेल कशी अंगे ? निसर्ग नियमाच्या,   कोण विरूद्ध जाईल  । फायद्याचे ते का त्याचे परि होईल ? चपळता जसा गुण,  स्थिरपणा असे दुजा  । आगळ्यातील आनंद,  हिच त्यातील मजा  ।। देहा ठेवून चंचल,  सांगे स्थिरावण्या मन  । हा उलटा खेळ कसा,  खेळण्या भासे कठीण  ।।   डॉ. […]

 गुणधर्म

करूं म्हटले करूं न शकलो   रोकू म्हटले रोकू न शकलो जे जे स्फूरले येईल ते ते    ठरले असते होईल ते ते बघूनी बाह्य जगला ठरवी   मिळवीन तेच सुख भावी त्याचेसाठी स्थिती आगळी   उमज न येई ती सगळी धडपड करीतो गडबड करीतो   त्याच चाकोरीतूनी जाऊ लागतो सुप्त गुण हे अंगी लपले   उभारून ते येतील सगळे मात करूनी विचारावरती […]

  नियतीची चाकोरी

अथांग सारे विश्व हे, असंख्य त्याचे व्यवहार  । कसे चालते अविरत, कुणा न कधी कळणार  ।। खंड न पडता केव्हाही, सूर्य-चंद्र येई आकाशी  । वादळ वारा ऋतू बदले,  चूक न होई त्यांत जराशी  ।। घटना घडे पुन्हा पुन्हा, आकार रूपे बदलत  । हर घटनेचे वलय, फिरे एकची चाकोरीत  ।। प्रत्येक कालक्रमणाच्या आखून,  दिल्या मर्यादा  । ठेवी […]

 लोभस चांदणे

चंद्र आज एकला नभी उगवला  । रात पुनवेची मधूर भासला  ।। मेघांचा गालीचा आज नाहीं दिसला  । शितल वारा अंगी झोंबू लागला  ।। उलटून गेली रात्र मध्यावरती  । लुक लुकणारे तारे आतां दिसती  ।। पेटल्या गगनीं असंख्य फुलवाती  । तीव्र-मंद प्रकाशानें त्या चमकती  ।। त्या असंख्यात चंद्रमा एकची सापडे  । जो लोभसवाणा म्हणूनी सर्वा आवडे  ।। […]

पुंडलिकाचे दैवत

आईबापाच्या सेवेमध्यें, पुंडलीक रंगला, उभा विठ्ठल दारावरती,  हेच तो विसरला  ।।धृ।। आईबाप हे दैवत ज्याचे, रुप पाही त्यांच्यात प्रभूचे  । सेवा करीत आनंद लूटतां,  तल्लीन जो जहला उभा विठ्ठल दारावरती हेच तो विसरला  ।।१।। निद्रेमध्यें असतां दोघे, मांडी देऊनी आपण जागे  । कशी मोडू मी झोप तयांची,  प्रश्न विचारी भगवंताला, उभा विठ्ठल दारावरती हेच तो विसरला  […]

 साक्षीदार

‘घटना’ जेव्हां घडली अघटित  । कुणीही नव्हते शेजारी  ।। कां उगाच रुख रुख वाटते  । दडपण येवूनी उरीं  ।।   जाणून बुजून दुर्लक्ष केले  । नैतिकतेच्या कल्पनेला  ।। एकटाच आहे समजूनी  । स्वार्थी भाव मनी आला  ।।   नीच कृत्य जे घडले हातून  । कुणीतरी बघत होता  ।। सर्वत्र दिशेनें तो व्यापूनी आहे  । हेच सारे […]

1 6 7 8 9 10 12
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..