नवीन लेखन...

ऋतूचे चक्र आणि मन

कडाक्याची थंडी, दात कुडकडुती, हात-पाय गार, काटे अंगी येती नकोसा वाटतो,  मजला हिवाळा, वाट मी बघतो,  येण्या तो उन्हाळा   सुकूनची जाते,  हिरवे  रान शरिर राहते,  घाम निथळून लाही लाही होता,  त्रस्त होई जीव, शोधण्या  ढग,  मन घेई धाव   थांबवितो कामे,  वादळी वारा, पर्जन्याचा मारा,  पडताती गारा पाणी चहूकडे,  वाटते सुकावे, वर्षा  जावूनी,  सुक्यात खेळावे […]

खोडकर कृष्ण

किती रे खोड्या करिशी कृष्णा यशोदा तर गेली थकूनी..।।धृ।। झोपू दे रे तिजला आतां,  ती तर गेली खूप दमूनी दही दुधांनी भांडी भरली, काही प्याली, काही वाटली, काही तर ती उपडी झाली, पिऊनी सांडूनीच सगळे,  नासलेस दही दूध लोणी…१, किती रे खोड्या करशी कृष्णा, यशोदा तर गेली थकूनी गणरायाचे पूजन करितां मग्न झाली यशोदा माता लक्ष्य […]

यशासाठी प्रयत्नाची दिशा

प्रयत्न करिता जीव तोडून,  जेव्हा यश तुम्हा न येई सोडून देता त्याला तुम्ही,  नशिबास दोष देत राही..१ दोष नका देवू नशिबाला,  मार्ग निवडले तुम्ही चुकीचे का न मिळाले यश तुम्हा,   मूल्यमापन करा प्रयत्नाचे…२ चूक दिशेने प्रयत्न होता,  वाहून जातो सदा आपण यश जेव्हा मिळत नसते,  निराश होवून जाते मन…३ पुनः पुन्हा प्रयत्न करूनी,  यश न आले […]

विधी लिखीत

विधी लिखीत असे अटळ   त्याच प्रमाणे होई निश्चित कोण बदले मग काळाला    प्रभूचा सहभाग असे ज्यांत  ।।१।।   राम राज्याभिषेक समयीं   असता सर्वजण आनंदी राज्य सोडूनी वनी जाईल   जाणले नव्हते कुणी कधीं   ।।२।।   नष्ट करुनी सर्प कुळाला   तक्षकावरही घात पडे परिक्षिताचे प्रयत्न सारे   फिके पडती नियती पुढे   ।।३।।   आकाशवाणीचे शब्द ऐकतां   हादरुनी गेला कंस […]

योग्यतेनुसार यश

उंचावून झेप, नको घेवू उडी खोल आहे दरी, पाय तुझा मोडी…१ अंदाज घे तूं,  खोलीचा प्रथम यश येई तुला,  तया मध्यें ठाम…२ अनुमान काढ,  आपल्या शक्तीचे झेपेल कां ते,  विचार युक्तीचे…३ निर्णय घ्यावेस,  सदा विचारांनी निराश न होई,  त्यामध्ये कुणी….४ जाणून घे तूं, स्वत:ची पात्रता यश असे पाठी,  ज्याची जी योग्यता…५ डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०   […]

भावनेस हसती विचार

भावनेच्या जावूनी आहारीं,  नुकसान करतात सारे, तर्कशुद्धता विसरून जाते,  अंगात भरूनी वेडे वारे ..१, भावनेची लाटच उठता,  मती होते एकदम गुंग, बरोबर वा चूक काय, जाण रहात नसते मग..२ आपले सारे खरे असावे,  हाच होत असे अट्टाहास, आपण केल्या कर्मावरच,  बसतो आपला विश्वास..३ इंद्रीय आणि भावना यांची,  जमुनी जात असतां जोडी तर्कशुद्ध विचारांत त्याला, राहत नसते […]

खरे सुख अंतरी

सुख हे मृगजळ,  फसविते सर्वांला खेळ चालतो त्याचा,  चकविणे मनाला …१, बाह्य वस्तूंचे सुख,  क्षणिक  असते, मोहून जाता सर्व,  लक्ष्य तेच वेधते…२, खरे सुख अंतरी,  परि शोधी बाहेरी, चुकीचा हा हिशोब,  निराशा करी…३, अंतरातील सुख, नितांत  असते एकाच अनुभवाने,  जग विसरविते…४ डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०

‘आनंद’ भावना

ध्येय असावे तुमचे नेहमीं आनंद मिळवण्याकडे ‘आनंद ‘ हाचि ईश्वर असतो समजून घ्याहो हे कोडे   ।।१।।   शरीर देई  ‘सुख ‘  तुम्हांला क्षणिक ते तर असती सुखाच्या पाठीशी छाया असते ‘दुःख ‘  तयाला संबोधती   ।।२।।   सुखाबरोबर नाते असते सदैव अशाच दुःखाचे वेगळे त्यांना कुणी न करती जाणा तत्त्व हे जीवनाचे   ।।३।।   ‘आनंद ‘ भावना […]

आधार

वेलींना आधार होता,  वृक्ष वाटला दणकट परि बुंधा ज्याचा किडूनी गेला,  कोसळणार मग कधीतरी  १ नष्ट करिल तरूवेलींना,  धरणीवरती आडवा होता सौंदर्य दिले लताफूलांनी,  सारे कांहीं विसरूनी जाता  २ वेलींनो आणि झुडपानों,   सोडूनी घ्या आधार पोकळ स्वतंत्रपणे तुम्ही जगण्या ,  स्वावलंबनाचे टाका पाऊल  ३ डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०  

सदैव जागृत रहा

झोप घ्या हो शांत, जागृत राहूनी तुम्ही, विचित्र वाटे ही रित, परि येई तुमचे कामी …१ विश्रांती लागत असते, गरज म्हणून शरिराला ती तर मिळत नसते, केव्हांही तुमच्या मनाला ..२ चंचलता हा स्वभाव, आहे आपल्या मनाचा, शांत करण्या मना, उपाय नसे झोपेचा..३ एकाच दिशेने धावूनी, मिळवते मन विश्रांती एकाग्र चित्त असणे, उपाय हाच त्यावरती…४ चित्त करूनी […]

1 2 3 4 5 6 12
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..