प्रभाते नाम घ्या जगदंबेचे

प्रभात झाली उठा हो मुखीं नाम घ्या जगदंबेचे   ।।धृ।।   कांहीं काळासाठीं नव्हता जगाचे पाठीं कोठे तुम्हीं होता न कळे आठवता जाग येऊनी मिळाले   भांडार आठवणींचे   ।।१।। प्रभात झाली उठा हो मुखीं नाम घ्या जगदंबेचे   विश्रांतीचा काळ हा शांततेने गेला पहा देह मनाची धावपळ थांवली कांहीं काळ पुनरपि लागते सर्वां   चैतन्य जीवनाचे   ।।२।। प्रभात झाली […]

योग्य वेळी

दिन दुबळे रोगी जर्जर,  कितीक पसरले या संसारी काटे काढूनी जीवनावरचे,  सुगंध घ्या कुणीतरी….१ शून्यामधले कितीकजण,  शून्यची सारे अवतीभवती परिस्थितीच्या वणव्यामध्ये,  धगधगणारे जीवन कंठती….२ आज हवे त्यांना कुणीतरी,  फुंकार घालील दु:खावरती सहानुभूतीचा शब्द,  निर्माण करील सहनशक्ति….३ क्षीण होता दृष्टी,  दिसेल कां धडपड श्रवणदोष येण्यापूर्वी,  ऐकून घे दु:खी ओरड…४ चपळ सारे अवयव असता,  धावपळीचे जीवन बघ तू […]

सदैव नामस्मरण

प्रभूनाम मुखीं होते रामतिर्थांच्या सदा  । ऐकू आले तेच निद्रेत असता एकदा  ।। चमत्कार दिसून आला एके दिवशी  । राम नामाचे ध्वनी उमटती देहापाशी  ।। विज्ञानाने उकल केली या घटनेची  । खात्री करिता सत्यता पटली याची  ।। चेतना मिळता स्वर यंत्रात ध्वनी उमटे  । त्याच ध्वनीच्या विद्युत लहरींनी शब्द फुटे  ।। शब्दांचे वलय फिरती देहाभोवती  । […]

आत्म्याची हाक

उचंबळूनी येतील शब्द,  हृदयामध्ये दडले जे  । संदेश असता सर्वांसाठी,  कुणी न म्हणतील ते माझे  ।।१ जे जे काही स्फूरूनी येते,  जेव्हा अवचित समयी  । हृदयामधली हाक असे,  ठरते आनंद दायी  ।।२ ‘आनंद’ आहे कोणता हा,  अन् येई कोठूनी  । अंतर्यामी सर्वांच्या ,  सदैव राही  बैसूनी  ।।३ बाहेर पडूनी झेप घेई   दूजा हृदयावरी  । तेथेही जो […]

मन तन बंधन

चंचल मन हे चंचल धारा,  पंख पसरीत उडे भरारा  । झेप घेवूनी उलटी सुलटी,  लक्ष तयाचे चमकत तारा  ।। लुकलुकणारे तारे अगणित,  नभांग सारे प्रसन्न चित्त  । ताऱ्यावरूनी ताऱ्यावरती,  झोके घेते सहज अविरत  ।। वेळ क्षणाचा पुरतो त्याला,  टिचक्या टपल्या मारीत गेले  । आवर घालणे कठीण होता, चटकन निसटून हातून गेले  ।। कोठून येते त्याला शक्ती, […]

मशाल

श्री गुरू दत्ताचे अवतार, अवतरले या भूमिवर  । विविध नामे परि,  दुर्बलांची करण्या कामे  ।१। अक्कलकोटचे निवासी, स्वामी समर्थ आले उदयासी  । दैवी शक्ती अंगी,  अंधारी चमकली ठिणगी  ।२। मशाल घेवून हाती,  आला धावत पुढती  । अति वेगाने, सर्वांची उजळीत मने  ।३। कर्म योग आणि भक्ती,  ह्या तीन ईश्वरी शक्ती  । एकत्र जाहल्या,  मशालीत त्या समावल्या  […]

 आज-उद्या

‘उद्या’ साठी जगतो आम्हीं   राहून मृत्युच्या दाढी  । भविष्यांतील सुख कल्पूनी   आज सारे कष्ट काढी  ।।   ‘आज’ राहतो नजिक सदैव    ‘उद्या’ चालतो पुढे पुढे  । आज नि उद्या यांची संगत     कधीही एकत्र न पडे  ।।   कष्ट ‘आज’ चे शिरीं वाहूनी   ध्येय ‘उद्या’ चे बघती  । हातीं न कांही पडते तेव्हां     निराश सारे होती  ।। […]

चाकोरी

नव्हतो आम्ही आमचे कधींही   बनले जीवन दुजामुळे  । कर्तेपणाचा भाव तरीही      येतो कां मनी ? ते न कळे  ।।   कसा आलो या जगतीं    ठाऊक नव्हते कांही मजला  । कसा वाढलो हलके हलके     जाण आहे याची मला  ।।   जेंव्हा झालो मोठा कुणीतरी   वाटू लागले कांही करावे  । काळाने परि दिले दाखवूनी   जीवन प्रवाही वाहात जावे  […]

 तूच माझा ईश्वर

मनांत ठसले रूप तुझे,  येते नयना पुढे  । रात्रंदिन मज चैन ना पडे…..।।धृ।। शरीर जरी सुंदर मिळे  । प्रयत्नांनी तूंच कमविले  ।। चपलता ही छाप पाडीते  । लक्ष्य खेचूनी तुझ्याकडे मनी ठसविले रूप तुझे येत नयना पुढे  ।१। हासणे खेळणें आणि चालणें  । ‘ढंगदार’  तुझे बोलणे  ।। शरीरामधल्या हालचालींना  । सहजपणाचे वळण पडे मनी ठसविले रूप […]

काव्य कलश

ही दया कुणाची झाली, सापडे शब्दांचा झरा  । उपसतो जरी सतत,  होत नसे निचरा  ।। गोड पाणी शब्दांचे,  ओठी अमृत वाटे  । पेला भरता काठोकाठ,  काव्य हृदयी उमटे  ।। पेला पेला जमवूनी,  कलश भरून आला  । नाहून जाता त्यात,  देह भान विसरला  ।। सांडता पाणी वाहे,  परसते चोहीकडे  । आस्वाद घेई जो जो, विसर जगाचा पडे  […]

1 2 3 6