सिंधुदुर्ग – दहावी बारावीत अव्वल पण उच्चशिक्षणाच्या सोयी?
मालवणच्या आशिष झाट्येने NEET मध्ये राज्यात प्रथम क्रमांक आणि देशात एकोणिसावा क्रमांक पटकावल्याची बातमी मनाला उभारी देऊन गेली. AIIMS दिल्ली सारख्या भारतातील सर्वोत्तम कॉलेज मध्ये शिकण्याचा पर्याय आता त्याच्यापुढे आहे. केईम किंवा AIIMS ची निवड मी करेन असे त्याने टाइम्स ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले आहे. आशिष ने सिंधुदुर्गाच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये एक नवीन बेंचमार्क निर्माण केलाय. […]