नवीन लेखन...

तन मनातील तफावत

देह मनाच्या वया मधील,  तफावत ती दिसून येते चंचल असूनी मन सदैव,  शरिर परि बदलत राहते…१, चैतन्ययुक्त ते मन सदा,  स्थिर न राहते केव्हांही जन्मापासूनी मृत्यूपर्यंत भाग दौड ती चालत राही…२, परिस्थितीच्या चौकटीमध्यें,   विचारांचा दबाव राहतो शरिराच्या सुदृढपणाचा,  मनावरती परिणाम होतो…३, दिसून येते केव्हां केव्हां,  मन अतिशय उत्साही परि शरिराचा दुबळेपणा,  मनास त्याक्षणी साथ न देई….४ […]

सदृढ शरिरी चिंतन

योजना तुमची चुकून जाते,  जीवनाच्या टप्प्याची अखेरचा क्षण जवळीं येतां,  आठवण होते त्याची जोम असतां शरिरीं तुमच्या,  करिता देहासाठीं वृद्धत्वाचा काळ तुम्हीं ठेवता,  प्रभू चिंतना पोटीं गलित होऊनी गेली गात्रे,  अशांत करी मनां एकाग्रचित्त होईल कसे तें,  मग प्रभू चरणां दवडू नका यौवन सारे,  ऐहिक सुखामागें त्या काळातील प्रचंड ऊर्जेस,  लावा प्रभूचे मार्गे सदृढ असते शरीर […]

रावण वृति

रावण नव्हता कुणी राजा,  ती होती व्यक्ति व्यक्तीचा तो इतिहास नव्हता,  ती होती प्रवृत्ति….१, आजही दिसती कित्येक आम्हा,  रावण या जीवनीं कशी रंगेल जीवन कथा,  रावणा वांचूनी…२, विरोधात्मक बुद्धी तुमची,  अडथळे आणते क्रोध, लोभ, अहंकार गुणांनी, प्रवाहाला रोकते…३, सद्‌गुणांचा पाया खोलवर,  जेवढा तो गेलेला रावण वृत्ति हार जाईल,  त्याच मग वेळेला….४ डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com […]

यश येईल मागे मागे

नको लागूस प्रसिद्धीच्या मागें मागे येईल स्वयं ती तुझ्याच संगे संगे निराशूनी जावू नकोस रागें रागें हिंमत बांधूनी जावेस तू आगे आगे विणाविस तू यशाची शाल धागे धागे| सुखाच्या छटा चमकूनी रंगे रंगे सतत रहावे जीवनी जागे जागे तेव्हाच यश येत असते भागे भागे डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

दुष्टपणा

दगड टाकतां पाण्यावरी,  तरंगे त्याची दिसून आली दगड होई स्थीर तळाशी,  बराच वेळ लाट राहीली…१,   जेव्हा कुणीतरी क्रोध करी,  वातावरण दूषित होते क्रोध जातो त्वरीत निघूनी,  दूषितपणा कांहीं काळ राहते…२,   निर्मळपणा दिसून येई,  स्थिर होवून जातां जल पुनरपि पडता खडा क्रोधाचा,  सारे होवून जाते गढूळ…३,   स्थिर होण्यास वेळ लागतो,  गढूळ होई क्षणांत मन […]

सुक्ष्मात अनंत

एकटाच मी बसलो होतो,  शांत खोलीमध्यें दुरदर्शन ते करीत होते, करमणूक आनंदे……१,   दूरीवरील व्यक्ती बघूनी,  शब्द त्याचे ऐके केवळ चावी फिरवितां क्षणी,  दृष्य दुजे देखे…२,   जगामधली सर्व ठिकाणें,  खोलीत अदृष्य तीं साधनांचा उपयोग करिता,  जाण त्याची येती….३,   वातावरण प्रभूमय सारे,  व्यापले सर्व जगी सुक्ष्मापासूनी अनंतेचे,  गुण एकाचे अंगी….४,   तेथे आहे जे येथे […]

एका मनाचे हे भाग

एक विशाल मन,  भाग त्याचे अनेक विखूरले जावूनी, स्वतंत्र वाटे प्रत्येक…१, छोट्या त्या भागावरी,  वेष्टण शरिराचे अस्तित्व वेगळेच, भासते त्या मनाचे…२, मनाचे ते स्वभाव,  सारखेच असती फरक वृत्तीमध्ये,  कुणाच्याही नसती…३, अगणीत ती मनें, कोठे नसे फरक अनेक ती बनली, जनक तिचा एक….४ डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com    

प्रेम नाणे

तसेंच वागा इतरजणांशी,  वाटत असते ,तुमच्या मनीं अपेक्षा करता तुम्हीं प्रेमाची,  सदैव इतरांकडूनी…१, सहानूभुतीचा शब्द लागतो,  दैनंदिनीच्या तुमच्या जीवनीं क्षणा क्षणाला भासत असते,  जीवन तुमचे अवलंबूनी…२, प्रेम वाटतां इतरांना, परत मिळते तेच तुम्हांला प्रेम नाण्याचे मूल्य जाणूनी चलनांत ठेवा हर घडीला…३, याच नाण्यांनीं काम बनते, चटकन सारे बघा कसे दोन मनें ती सांधली जावूनी,  आनंद सर्वत्र […]

मुरब्बी

लोणच्याला चव येते,  थोडे मुरल्यानंतर आंबाही स्वादिष्ट लागे,  आंबून गेल्यानंतर….१, विचारांची मजा वाटे,  ऐकता ज्ञानी विचार पक्वपणा त्याच्यातील,  देई आनंदाला धार…२, पक्वपणा येण्यासाठीं,  अनुभवाची भट्टी हवी ज्ञान तेव्हां चमकते,  जेव्हां तर्कज्ञान पाही….३, विचारांत मुरलेला,  मुरब्बी तो असतो अनुभवाच्या शक्तीनें,  योग्य पावूल टाकतो…४ डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com  

चित्त मंदीरी हवे

लोटांगण घालूनी शरण गेला, देव मंदिरीं तो आदर दाखविण्या प्रभूचे ठायीं, प्रयत्न करितो समर्पणाचे भाव दाखविण्या,  देहाला वाकवी मन जोपर्यंत विनम्र नसे,  प्रयत्न व्यर्थ जाई मंदिरी तुमचे शरिर असूनी, मन असे इतरीं श्रम तुमचे निरर्थक बनूनी,  मिळेल कसा श्रीहरी इतरत्र राहूनी चित्त तुमचे,  असतां मंदिराकडे खरे पुण्य ते पदरीं पडते, हेंच जाणा कोडे — डॉ. भगवान […]

1 9 10 11 12
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..