आनंदमय जाग

हलके हलके निशा जावूनी,  उषेचे ते आगमन होई निद्रेमधल्या गर्भामध्यें,  रवि किरणांची चाहूल येई…१, त्या किरणांचे कर पसरती,  नयना वरल्या पाकळ्यावरी ऊब मिळता मग किरणांची,  नयन पुष्पें फुलती सत्वरी…२, जागविती ते घालवूनी धुंदी,  चैत्यन्यमय जीवन करी हा जादूचा तो स्पर्श असूनी,  न भासे ही किमया दुजापरी…३   डॉ. भगवान नागापूरकर ९००४९७९८५०  

आत्म्याचे बोल

काय आणि कसे बोलतो,  त्यांना माहीत नव्हते सहजपणे सुचणारे,   संभाषण ते असते….१, शिक्षण नव्हते कांहीं,  अभ्यासाचा तो अभाव परि मौलिक शब्दांनी,  दुजावरी पडे प्रभाव…२, जे कांहीं वदती थोडे,  अनुभवी सारे वाटे या आत्म्याच्या बोलामध्ये,  ईश्वरी सत्य उमटे….३   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०  

  ‘अ’ ते ‘ज्ञ’  चा मार्ग’

अ,आ,इ,ई,उ,ऊ, गिरवित पाटी पुस्तक हातीं घेतले ह,ळ,क्ष,ज्ञ, करुनी शेवटीं खरेच मजला ज्ञान मिळाले   आरंभातील ‘ अ ‘ शिकूनी अहंकार तो जागृत झाला तो तर राजा षढरिपूचा ज्ञानास त्याने दुर सारला   अज्ञान- राज्यामघ्यें भटकतां स्वतःशी गेलो विसरुनी ज्ञानी झालो आहोंत आपण समजे चार पुस्तके वाचूनी   हालके हालके पुढे चाललो ‘अ’ ‘आ’  सोडूनी ‘क्ष’ ज्ञ’ […]

विस्तृमी जगवी आनंद

स्मृतिदोषचि तो आम्हां शिकवी,  जीवन सुसह्य बनविण्याते अटळ असूनी प्रसंग कांहीं,   दुर्लक्ष करितो आम्ही त्याते…१, माझ्यातची तो ईश्वर आहे,  आम्हास जाणीव याची असते शोधांत राहूनी त्याच्या,  जीवन सारे फुलत राहते…२, मृत्यू घटना कुणा न चुकली,  परि आठवण येई न त्याची विस्तृत योजना मनी आंखतां,  काळजी नसते पूर्णत्वाची…३, विसरूनी जावूनी त्या मृत्यूला,  जीवनांत तो रंग भरी प्रेम […]

सर्वांची काळजी

मुसळधार ती वर्षा चालली,  एक सप्ताह तो होवून गेला पडझड दिसली चोहीकडे,  दुथडी वाहतो नदी-नाला…१, काय प्रयोजन अतिवृष्टीचे ?  हानीच दिसली ज्यांत खरी निसर्गाच्या लहरीपणानें,  चिंतीत झाली अनेक बिचारी….२, दृष्टी माझी मर्यादेतच,  विचार तिजला अल्प घटकांचा विश्वचालक काळजी करि,  साऱ्या चौऱ्यांशी लक्ष योनींचा….३   — डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०  

मनी प्रेम कर

तारूण्याच्या उंबरठ्यावरी,   ज्योत प्रेमाची पेटून जाते बाह्यांगाचे आकर्षण परि,   वयांत त्या भूरळ घालते…१, प्रेमामधली काव्य कल्पना,  शरिर सुखाच्या नजीक ती किंचित होतां देह दुर्बल त्याच प्रेमाची घृणा वाटती…२, प्रेम हवे तर प्रेम कर तूं,  मूळे असावी अंतर्यामी मना मधली ओढ खरी ती,  येईल अखेर तीच कामीं…३, अंतर्मनातील प्रेम बंधन,  नाते त्याचे अतूट असते देहामध्यें बदल घडूनही, […]

हर घडी मिळो सहवास

मानव देह देवूनी ईश्वरा, उपकार केले मजवरती सेवा करण्या तव चरणाची, संधी लाभली भाग्याने ती…१, कर्म दिले तू मानव योनीसी, श्रेष्ठत्व येई ते त्याचमुळे उद्धरून हे जीवन नेण्या, कामी येतील प्रयत्न सगळे…२, मुक्त होणे जन्म मरणातूनी, साध्य होई ते प्रभूसेवेने परि तीच मुक्ती वंचित करते, आनंदमयी प्रभू दर्शने…३, एक मागणे प्रभू चरणी, मुक्ती न देयी तू […]

चुकीचे मूल्यमापन

चार कविता सुंदर रचिल्या,  काव्य वाचन केले त्याचे रसिक जनाची स्तुति ऐकूनी,  स्वप्न रंगविले कालीदासाचे….१, कॉलेजातील रंगमंचावरी,  तल्लीन होवूनी भूमिका केली टाळ्याचा तो कडकडाट ऐकूनी, नटसम्राटाची आठवण झाली….२, जमले होते शंभर श्रोते,  भाषण ज्यांचे समोर केले श्रोत्या मधली स्फुर्ति बघूनी,  गांधी नेहरूसम होवूं वाटले…३, यश जेंव्हां पदरी पडते,  भारावूनी जातो आम्ही त्यावेळी कर्तृत्व शक्तीचे मूल्यमापन,  करीत […]

विपरीत आनंद

खोड्या करणे, त्रास देणे,   हाच बनला स्वभाव त्याचा वाटत होते बघून त्याला,  दूरोपयोग करि तो शक्तीचा…१ पाय ओढणे, खाली पाडणे,  कपड्यावरी तो चिखल फेकणे मारपिट ती करूनी केंव्हां,  गुंडपणा तो करित राहणे…२, बेफिकीर ती वृत्ती तयाची,  स्वार्थाने तो भरला पुरता तुच्छ लेखी इतर जनाना,  स्व आनंद साधत असतां….३, ‘आनंद’ मिळवणे हेच ध्येय,  जीवनाचे तत्त्व खरे ते […]

  सिकंदरची शांतता

दिग्वीजयाच्या स्वारीवरती,  निघे सिकंदर सैन्य घेवूनी जग जिंकण्या ध्येय मनाशीं,  महान आशा उरी बाळगूनी आश्वा रुढ ते सैनिक सारे,  सिकंदराच्या मागें धावती लगाम खेचूनी वृक्षा पाशीं,  एक साधू तो बघूनी थांवती पृच्छां करितां साधू म्हणाला,  शांत चित्त तो बसला असे मिळविण्यास ते कांहीं नसतां,  शोध प्रभूचा घेत दिसे सिकंदर वदे देश जिंकूनी,  संपत्ती घेई लुटून सारी […]

1 2 3 7