सांग दर्पणा

’सांग दर्पणा कशी मी दिसते?’ आजवर अनेक तरुणींनी भिंतीवरच्या किंवा हातातल्या आरशाला हा सवाल केला असेल. साजशृंगार करण्यासाठी स्त्रियांनाच नव्हे तर पुरुषांनाही आरशाचा आधार लाभलेला आहे. […]

अश्मयुगापासून आजपर्यंत

आरशांचा उल्लेख रामायण-महाभारतातही आढळतो. ग्रीक, रोमन, आपली सिंधु संस्कृती यांच्या भरभराटीच्या कालखंडातही आरशांचा उपयोग होत असल्याचे पुरावे मिळालेले आहेत. संथ जलाशयाच्या पाण्यात डोकावून पाहताना आपणच आपल्याकडे पाहत असल्याचं दिसल्यापासून ही जादू आपल्या घरच्या घरीच हस्तगत करण्याचे प्रयत्न सुरू झाले. […]

किरणांची किमया

कोणत्याही वस्तूवर जेव्हा प्रकाशकिरण पडतात तेव्हा ते त्या वस्तूच्या आरपार निघून जाऊ शकतात. अशी वस्तू पारदर्शक असते. साहजिकच तिचा वापर आरशासाठी होणं शक्य नसतं. इतर काही वस्तू अशा असतात की त्यांच्यावर पडणारे प्रकाशकिरण त्यांच्याकडून संपूर्णतया शोषले जातात. अशा वस्तू संपूर्ण अपारदर्शक असतात. त्यांच्या पाठी त्या वस्तूंची छाया पडते. आपलं शरीर अशा वस्तूंमध्ये मोडतं. म्हणून तर सूर्यप्रकाशात किंवा रात्रीच्या वेळी दिव्याच्या प्रकाशात आपली छाया ठळकपणे पडते. […]

कला आरसेनिर्मितीची

काचेतून आरपार निघून जाणार्‍या किरणांचं प्रमाण कमी करून तिच्यावरून परावर्तित होणार्‍या किरणांचं प्रमाण वाढवलं तर त्या काचेचा आरसा बनतो, हे ध्यानात आल्यावर मग काचेचं तसं रुपांतर करण्यासाठीचे प्रयत्न सुरू झाले. काचेच्या पाठी जर एखादा पदार्थ बसवला तर आरपार गेलेल्या किरणांना परत उलट्या दिशेनं वळवता येईल, हे तर स्पष्टच होतं. […]

प्रतिमेचं उगमस्थान

जेव्हा एखादी वस्तू आरशासमोर उभी केली जाते तेव्हा त्या वस्तूपासून निघणारे असंख्य किरण त्या आरशाच्या पृष्ठभागावर जाऊन पडतात. प्रत्येक किरण त्या पृष्ठभागाशी वेगवेगळा कोन करत असतो. त्यामुळं अर्थातच तिथून परावर्तित होणारे किरणही वेगवेगळ्या कोनातून परत फिरतात. अर्थात ते सर्वच किरण एका विशिष्ट नियमाच्या चौकटीतच आपली दिशा ठरवतात.
[…]

उलटापालट !

तुम्ही तुमच्या आरशातल्या प्रतिमेकडे निरखून पाहिलं आहेत का? म््हणजे पाहिलं नक्कीच असेल. पण ते आपलं सौंदर्य न्याहाळण्यासाठी त्या प्रतिमेची लक्षणं ध्यानात घेण्यासाठी पहा. […]

प्रतिमाच प्रतिमा !

बच्चा भी खेले, बच्चेका बाप भी खेले अशी तोंडी जाहिरात करत खेळणी विकणारे अनेक जण चौपाटीवर, उपनगरी गाड्यांमध्ये, इतरत्र आपल्याला भेटत असतात. त्यातली किती खेळणी तशा प्रकारची असतात, हे सांगणं कठिण आहे. पण कॅलिडोस्कोप हे मात्र अशा प्रकारचं खेळणं आहे यात शंका नाही. […]

प्रकार तशी प्रतिमा

आपला नेहमीचा ओळखीचा म्हणजे ज्यात पाहून आपण भांग पाडतो किंवा वेणी घालतो तो आरसा म्हणजे साधा सपाट आरसा. त्याचा पृष्ठभाग गुळगुळीत आणि सपाट असतो. […]

एकतर्फी की दुतर्फी-१

चित्रपटांमध्ये तसंच टीव्हीवरच्या मालिकांमध्ये आपण नेहमी पाहतो, गुन्हेगाराची ओळख पटवण्यासाठी ओळख परेड चाललेली असते. गुन्हेगाराला ज्यानं पाहिलं आहे अशा प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराला बोलावलेलं असतं. तो अतिशय घाबरून गेलेला असतो. त्यानं गुन्हेगाराला पाहिलं आहे हे त्याला माहिती असतं, पण गुन्हेगाराला त्याची कल्पना नसते. […]

एकतर्फी की दुतर्फी-२

ज्यांना आपण एकतर्फी आरसा मानतो त्यांना वैज्ञानिक भाषेत दुतर्फीच म्हटलं जातं. आपल्या नेहमीच्या आरशामध्ये काचेच्या एका बाजूला पार्‍यासारख्या परावर्तक पदार्थाचा जाड सलग थर दिलेला असतो. […]

1 2
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..