नवीन लेखन...

स्वप्नांच्या उपवनात नव्हता त्या सुमनांचा वावर

गझल
जाती: समजाती-पद्मावर्तनी-लवंगलता
मात्रा: ८+८+८+४=२८मात्रा
************************************
स्वप्नांच्या उपवनात नव्हता त्या सुमनांचा वावर
पूर्ण रात्र ज्यांच्या गंधाचा उशास होता जागर

परिस्थितीचे वाळवंटही सहज काटता यावे
माथ्यावरती फक्त असावी तुझ्या कृपेची पाखर

निबरपणा गेला, गेला ताठाही कण्यातला या
झुकवत होती, झुलवत होती मला नित्य ही भाकर

अशा लिहित मी गेलो गझला, पेरत गेलो मजला
जणू लेखणी नव्हती माझ्या हाती होता नांगर

कूपमंडूकांमधे कशाला जाऊ तिथे रमाया
हृदयी माझ्या सरस्वतीचा जिवंत आहे पाझर

नको व्हायला अन्नाचा अवमान हातुनी माझ्या
नको तुझेही मन मोडाया, दे हातावर साखर

उगा न झाला शेर शेर गगनासम गझलेमधला
शब्दांच्या भवताली आहे नि:शब्दाची झालर

सुधारगृहात हृदयाच्या मी ठेवल्या व्यथा काही
त्यांना शमवायला नाही पुरली माझी फुंकर

कितीक निश्चल इच्छा पडुनी अजूनही या हृदयी
अलीकडे वाटते हृदय हे माझे एक शवागर

दु:ख अपेक्षाभंगाचे ना नादी लागत माझ्या
अपेक्षा न मी ठेवत कुठल्या बंद्या किंवा चिल्लर

–प्रा. सतीश देवपूरकर

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..