नवीन लेखन...

स्मिता पाटील – भारतीय चित्रपटांची अनभिषिक्त महाराणी

आज रपट जाएँ तो हमेंं ना उठई यों, गगन सदन तेजोमय ही गाणी कानावर पडली की आठवण येते ती… वयाच्या विसाव्या वर्षी रुपेरी पडद्यावर पदार्पण करणाऱ्या स्मिता पाटीलची. त्या जवळजवळ ७५ चित्रपटांच्या अनभिषिक्त महाराणी ठरल्या होत्या. १९८४ मध्ये त्या आंतरराष्ट्रीय नायिका बनल्या. स्मिता पाटील यांची भूमिका असणारा गुजरातच्या दूध व्यापाऱ्यांवर आधारलेला मंथन (१९७६) हा सिनेमा यशस्वी तर झालाच पण भारतीय सिनेजगतात आजही सिनेमा महत्वाचा मानल्या जातो.

अभिनेत्री स्मिता पाटील यांचा जन्म १७ ऑक्टोबर १९५५ रोजी पुणे येथे झाला.  स्मिता पाटील या चित्रपट, दूरचित्रवाणी आणि नाट्य क्षेत्रातील अत्यंत सुप्रसिद्ध अभिनेत्री होत्या. त्यांचे अभिनयाचे शिक्षण पुण्यातील फिल्म ॲन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियात झाले होते. श्याम बेनेगल यांच्या ‘चरणदास चोर’ या चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.

१९७७ हे वर्ष तिच्या आयुष्यातील खूप महत्वाचं असं वर्ष ठरलं तिने केलेल्या ‘भूमिका’ चित्रपटातल्या रोल साठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं पारितोषिक मिळालं. पुढे ‘चक्र’ मध्ये याची पुनरावृत्ती झाली. त्या दशकात तिने शबाना आझमी, ओमपुरी, नसरुद्दीन शाह यांसारख्या कसदार अभिनेत्यांसोबत काम केले पण, यामुळे तिच्या वर समांतर चित्रपटात काम करणारी अभिनेत्री हा शिक्का बसला तो कायमचा. पण कोण काय बोलेल याचा विचार करणारी ती अभिनेत्री नव्हतीच. त्याच साली आलेल्या जैत ते जैत या चित्रपटामध्ये चिंधी ची भूमिका साकारली होती. या चित्रपटाच्या चित्रकारणाच्या वेळी ती भूमिकेत एवढी समरस होऊन गेली होती कि एखाद्या सामान्य कातकरी स्त्रीप्रमाणे सहजच डोंगर चढायची उतरायची. पुढे तिने गमन, अर्थ, चक्र, बाजार यासारख्या वेगळी धाटणीच्या चित्रपटात पण भूमिका केल्या आणि अभिनयाचा वस्तुपाठ घालून दिला. यापैकी अर्थ मधली ‘कविता संन्याल’ आणि बाजार मधली ‘नजमा’ प्रेक्षकांना खूप आवडली. समांतर चित्रपटांसोबत तिने व्यावसायिक हिंदी सिनेमे ही केले आणि ते ही तितकेच हिट झाले. अमिताभ सोबत ‘नमक हलाल’ मध्ये ‘आज रपट जाये तो’ मध्ये या गाण्यातली तिची ही निराळी अदा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली आणि ती कमर्शियल चित्रपटात सुद्धा तितक्याच सहजपणे काम करू शकते हे सिद्ध झालं.

मग १९८२ साली आला जब्बार पटेलांचा ‘उंबरठा’ त्यात तिने ‘सुलभा महाजन’ ची साकारलेली भूमिका अजूनही मराठी चित्रपटसृष्टीमध्ये बिनतोड आहे. सार्वजनिक जीवनातही ती महिलांविषयक काम करणाऱ्या अनेक संस्थांशी प्रत्यक्ष पण जोडली गेली होती. त्यामुळे उंबरठा मधल्या तिने साकारलेली भूमिका अधिकच वास्तवदर्शी वाटते.

आपल्या संबंध आयुष्यात ती कायमच सडेतोड राहिली आहे. समाज काय म्हणेल याची तिने कधीच फिकीर केली नाही. राज बब्बर सोबत केलेलं लग्न हे त्याचं उत्तम उदाहरण.

स्मिता पाटील यांना १९८५ साली भारत सरकारने पद्मश्री गौरव पुरस्काराने सन्मानित केले.

भारतीय सिनेमाच्या शतकपूर्तीनिमित्त भारत सरकारने २०१३ मध्ये स्मिता पाटील यांच्यावर पोस्टेज स्टॅंप प्रकाशित केला होता.

१३ डिसेंबर १९८६ रोजी स्मिता पाटील यांचे निधन झाले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..