नवीन लेखन...

आर्ट ऑफ लिव्हिंगचे आध्यात्मिक गुरू श्री. रविशंकरजी

जीवन म्हणजे काय, ते कशा पद्धतीने जगले पाहिजे. स्वतःमधील ईंश्वर ओळखा व आनंदी जीवन जगा हा संदेश अखिल मानव जातीला देणारे आर्ट ऑफ लिव्हिंगचे आध्यात्मिक गुरू श्री. रविशंकरजी यांचा जन्म १३ मे १९५६ रोजी झाला.
एक मानवतावादी नेता, अध्यात्मिक गुरु आणि शांतीचे दूत म्हणून श्री श्री रवी शंकर यांची ख्याती जगभरात आहे. तणावमुक्त व हिंसामुक्त समाजाचे हे त्यांचं स्वप्न आह. हे स्वप्न साकार होत आहे ते दि आर्ट ऑफ लिविंगच्या शिबिरे आणि सेवा कार्यांमारफत. परिणामी, जगातील करोडो लोक एकत्रित नांदत आहेत.

चार वर्षाचे असताना ते श्रीमद्भगवद्गीता तोंडपाठ म्हणून दाखवू शकत आणि ते अनेकदा ध्यानस्थ अवस्थेत दिसून येत. त्यांचे पहिले गुरु होते सुधाकर चतुर्वेदी, ज्यांनी महात्मा गांधी यांच्याबरोबर खूप वर्षे काम केले. त्यांच्याकडे वेद साहित्य आणि भौतिकशास्त्र अशा दोन्ही पदव्या आहेत . श्री श्री रवी शंकर हे भारताच्या कर्नाटक राज्यातील शिमोगा इथे असताना दहा दिवसांच्या मौनात होते. ह्या काळातच सुदर्शन क्रिया, एक शक्तिशाली श्वसन तंत्र, याचा जन्म झाला. कालांतराने सुदर्शन क्रिया ही दि आर्ट ऑफ लिविंगच्या शिबिरांचे मुख्य गुणवैशिष्ट्य बनली. श्री श्री रवी शंकर यांनी आंतरराष्ट्रीय, नफा न कमावणारी, शैक्षणिक आणि मानवतावादी संस्था म्हणून दि आर्ट ऑफ लिविंगची स्थापना केली. या संस्थेचे शैक्षणिक आणि व्यक्तिमत्व-विकास कार्यक्रम हे तणाव निर्मुलनासाठी आणि स्वस्थ राहण्यासाठी लागणारी प्रभावी तंत्र शिकवतात. केवळ एका प्रकारच्या जनसमुदायाला आवाहन न करता हे कार्यक्रम जगभरात आणि समाजाच्या सर्व पातळ्यांवर उपयुक्त ठरले आहेत.

१९९७ साली त्यांनी इंटरनॅशनल (आंतरराष्ट्रीय) असोसिएशन (संस्था) फॉर हुमन (मानवतावादी) व्हॅल्यूज (मुल्ये) (आय.ए.एच.व्ही) ही संस्थासुद्धा प्रस्थापित केली. याचे मुख्य कारण होते ते म्हणजे दीर्घकालीन असे विकासाचे उपक्रम राबवणे व दि आर्ट ऑफ लिविंगबरोबर समन्वय साधून संघर्ष निवारण करणे. भारत, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिका इथे गावागावातून या दोन्ही संस्थांचे कार्यकर्ते युद्धपातळीवर दीर्घकालीन विकास-कामे हाती घेत आहेत. ४०,२१२ गावांमध्ये संस्थेचे काम सुरु आहेत. एक नावाजलेले मानवतावादी नेता म्हणून श्री श्री रविशंकर यांच्याकडे बघितले जाते. त्यांच्या प्रेरणेने नैसर्गिक आपत्तीग्रस्त, अतिरेकी हल्ल्यात आणि युद्धात बचावलेले, उपेक्षित आणि सतत संघर्षात भरडल्या जाणा-या जमातीतील मुले अशा विविध परिस्थितीतील लोकांना दिलासा देण्याचे काम चालू आहे.त्यांच्या संदेशाच्या ताकदीने अध्यात्मावर आधारित एक सेवा कार्याची लाट समस्त कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे. जगभर हे कार्यकर्ते आणीबाणीच्या परिस्थितीत या उपक्रमांना पुढे नेत आहेत.
एक अध्यात्मिक गुरु म्हणून श्री श्री रवी शंकर यांनी योग आणि ध्यान या परंपरांना पुनरुज्जीवीत केले आहे आणि २१व्य शतकाला शोभेल अश्या प्रकारे जागासमोर ठेवले आहे. प्राचीन ज्ञानाला पुनरुज्जीवन देण्याच्या पलीकडे जाऊन, श्री श्री रवी शंकर यांनी वैयक्तिक आणि सामाजिक परिवर्तनाची नवीन तंत्रे निर्माण केली आहेत. यात समावेश आहे तो सुदर्शन क्रिया या तंत्राचा ज्याने तणावापासून मुक्ती मिळवण्यात आणि आंतरिक उर्जेचे स्रोत्र शोधण्यात आणि दैनंदिन जीवनात शांती मिळवण्यात करोडो लोकांना मदत केली आहे. ३१ वर्षांच्या अल्पावधीतच त्यांच्या कार्यक्रमांनी आणि त्यांच्या पुढाकाराने सुरु झालेल्या उपक्रमांनी १५२ देशांमध्ये जवळजवळ ३७ करोड लोकांचे आयुष्य पालटले आहे.
जागतिक स्तरावर संघर्ष निवारण व हिंसामुक्तीचा प्रसार जगभरातील सार्वजनिक व्यासपीठे आणि सभांद्वारे केला जातो.

शांती हे एकच उद्देश्य असलेले एक तटस्थ व्यक्तीमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. म्हणूनच युद्धग्रस्त भागातील लोकांच्या आशांचे प्रतिनिधित्व श्री श्री करतात. इराक, आयव्हरी कोस्ट, काश्मीर आणि बिहार येथे विरोधी पक्षांना वाटाघाटी करण्यास एकत्र आणण्याचे काम त्यांनी केले असल्यामुळे त्यांना खास मान्यता मिळाली आहे. (भारतातील कर्नाटक सरकारने) कृष्णदेव राय याच्या राज्याभिषेकाच्या ५००व्या तिथी निमित्त त्यांना स्वागत समितीचे अध्यक्ष नियुक्त केले होते. (भारतातील जम्मू आणि काश्मीर सरकारने) त्यांना अमरनाथ मंदिराच्या बोर्डाचे सदस्य म्हणून नियुक्त केले होते. विविध उपक्रम आणि भाषणांतून श्री श्री रवी शंकर हे सातत्याने मानवी मूल्यांचे प्रबलीकरण करण्यावर जोर देतात. मानवतावाद ही आपली सर्वप्रथम ओळख आहे याची जाणीव करून देतात. सर्वधर्मसमभाव वृद्धिगत करणे आणि बहु-सांस्कृतिक शिक्षणाकरिता ते साद घालीत आहेत कारण धर्मांधतेवर हाच उपाय आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे आज महत्वाच्या ठिकाणी कायमची शांतता प्रस्थापित झाली आहे. त्यांच्या कामामुळे जगभरातील करोडो लोकांच्या जीवनात परिवर्तन घडून आले आहे. वंश, राष्ट्रीयता आणि धर्म यांच्या पलीकडे जाऊन “वासुदैव कुटुंबकम” स्थापित करण्याची प्रेरणा जगभर देत आहेत.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4222 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..