नवीन लेखन...

शिक्षणाचे मानसशास्त्र : असावा सुंदर चॉकलेटचा बंगला….

आजोबांचे डोळे चकाकले. “द गेम इज अफूट माय डीअर वॉटसन. लेट अस कँच द चॉकलेट चोर!”

****************************************

शैक्षणिक साहित्यात “गोष्ट” हा एक महत्वाचा घटक आहे. चांगली गोष्ट लक्ष वेधत, विचार प्रवृत्त करते, शिकवते आणि लक्षात राहते. शिक्षणात त्याचा प्रयोग कसा करावा? इयत्ता 4-6 साठी एव्हीडेन्स बेस्ड रिझनिंग, चिकित्सक विचार (Critical Thinking) शिकवण्यासाठी एक प्रायोगिक लेसन प्लॅन.

****************************************

घडले असे:

चिंटू, चिऊ आणि त्यांची चुलत भावंडे मिनी आणि मोंटू पहिल्या मजल्यावर शेजारी राहतात. आजी आजोबा तळ मजल्यावर रहातात. दुसऱ्या मजल्यावर आजोबांचे भाऊ आणि त्यांची मुलं रहात होती, पण गेली काही वर्षे ते इंग्लंड-अमेरिकेत आहेत. बिल्डिंग मध्ये अजून तिसरे कुणी नाही. त्यामुळे एकत्र कुटुंबाचे घर असल्यासारखे आहे.  सहाजिकच, चौघेही मुलं बहुतेक एकत्रच असतात. सगळे दरवाजे सताड उघडेच असतात, मुलं सर्व घरात मुक्तपणे वावरतात.

मुलं रोज संध्याकाळी चार वाजता आजोबांच्या सोबत सोसायटीच्या ग्राउंडवर  खेळायला जातात. आजोबा आपल्या बरोबर एक पिशवी घेतात, त्यात एक पाण्याची बाटली आणि ताईआत्याने दिलेला टॅबलेट असतो. कधी मुलांना खाऊ असतो आणि कधी परत येताना थोडीशी भाजी पिशवीतून आणतात. साडेसहा सातच्या सुमारास आजोबा आणि मूल घरी येतात. मुलांचे दोन्ही बाबा पण खाली आजोबा आजीची विचारपूस करायला ह्या वेळेस येतात. कधी सगळे खाली येऊन एकत्र जेवतात. आ्जी मग स्पेशल काहीतरी करते. मुलांना खूपच मजा येते.

आज असेच चार वाजता सगळे बागेत आले. मिनींनी आपली नवीन सायकल आणली होती. खरतर बाग फार लांब नव्हती, बिल्डिंग पासून करेक्ट गेट टू गेट पाचशे मीटर.

ग्राउंडला दोन तीन राउंड मारून आजोबा नेहमीच्या बाकड्यावर बसले. आज त्यांची गॅंग अली नव्हती म्हणून ते मुलांचा खेळ पाहत बसले होते. थोड्या वेळात चिंटू आला आणि त्यांनी आजोबाना, मी बॅडमिंटनची रॅकेट शटल घेऊन येतो असे सांगून, धावत घरी गेला. चिंटू चांगला फाष्ट धावतो पण आज त्याला जाऊन यायला 20 मिनिटे लागली. का रे वेळ लागला असे विचारल्यावर, फ्रीज मधून पाणी घेतलं प्यायला, आणि नेहमी प्रमाणे आजीने ग्लास विसळून जागेवर ठेव सांगितले, त्यात 10 मिनिट वेळ गेला असा म्हणाला.

मिनीने सॅडल घातले होते, तुमची पहिली सिंगल्स होई पर्यंत मी बूट घालून येते असे म्हणून ती सायकल स्टँड कडे गेली आणि सायकलवर घरी गेली. बूट आजी कडेच होते त्यामुळे वर जावे लागले नाही. बूट घालायच्या आधी स्वयपाकघरात धावत जाऊन पाणी प्याली. तिलाही जाऊन येऊन वीस मिनिट लागली. “तू तर सायकलवर गेली, मग वेळ का लागला?”  बूट घालायला वेळ लागत नाही का? म्हणून मिनीने थोडेसे  त्रासूनच उत्तर दिले. जाऊ दे म्हणून सगळे पुन्हा एकत्र खेळायला लागले.

तेव्हड्यात मोंटूला तहान लागली. तो आजोबांकडे गेला आणि पाणी द्या म्हणाला. पण आज आजोबा पिशवी विसरले होते. त्यांनी त्याला ती घेऊन येण्यासाठी घरी पाठवलं. लवकर ये म्हणल्यावर मोंटून मनगटावरच्या घड्याळात स्टॉप वॉच चालू केला आणि पळाला. एक मिनिटात मोंटूने मिनीची सायकल घेतली आणि घरी येऊन आजीकडे पिशवी मागितली. आजीने फ्रीज उघडून पाण्याची बाटली आणि तिथले लांबडे चॉकलेट बार्स पिशवीत भरले आणि मोंटू कडे पिशवी दिली. परत येऊन मोंटूने सायकल स्टँडवर लावली आणि पुन्हा धावत एक मिनिटात आला. सगळं मिळून बारा मिनिटात परत आला. आजीने फाईव्ह मिनिट्स वेस्ट केले, नाहीतर अजूनही लवकर आलो असतो अशी फुशारकी मारली सवयी प्रमाणे.

मुलांचा खेळ संपल्यावर सगळे घरी आले आणि आजोबांना पिशवीतले चॉकलेट आठवले. पण पिशिवीत तीनच चॉकलेट होते! मी तर चार आणले होते सकाळी, प्रत्येकाला एक या हिशोबाने. “फ्रीजमधले मी सगळे दिले होते हो” आजीने सांगितले. पिशवीला भोक नाही, मग कसे पडले असतील? स्वयंपाकघरातही खाली पडलेले नव्हते.

द केस ऑफ द मिसिंग चॉकलेट बार! स्ट्रेंज! आजोबा पुटपुटले. आजोबांनी मुलांना विचारले तेव्हा चौघांनी कानावर हात ठेवला. मग आजोबांनी थोडा विचार केला आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच भाव तरळला. द गेम इज अफूट वॉटसन. नाऊ लेट अस कँच द चॉकलेट चोर! आजोबांनी आपली शेरलॉक होम्सची टोपी घातली आणि चोर शोधण्याचा विडा उचलला.

“It is a mistake to theorize before one has data. Insensibly one begins to twist facts to suit theories, instead of theories to suit facts.” (Sherlock Holmes in A Scandal in Bohemia.) आजोबांनी शेरलॉक होम्सचा डायलॉग मारल्या शिवाय राहवलं नाही.

चौकशी अर्थातच आजी पासून सुरू झाली. दुपारी कुणी आलं होतं का? आजोबांनी आजीला विचारले. आजी म्हणाली, “आता दुपारी कोण येणार? कचऱ्याची गाडी आला होता दुपारी एकच्या सुमारास. मी कचरा गाडीत टाकला आणि मग टीव्ही पाहत बसले जरा वेळ.” आजीने जरा तिरसटच उत्तर दिले.

“आणि हो विसरलेच बघा. साडेतीनच्या सुमारास तुम्हीच फ्रीज उघडलं आणि औषध घेतलं होतं ना? आणि मोंटू आला असेलच! कार्ट कधी स्वस्थ बसतच नाही. खाली वर चालूच असत, आणि सारखा फ्रीजमध्ये कारभार करतो. इकडचे तिकडे तिकडचे इकडे करतो, शिस्त म्हणून नाही पोराला. पण काम सांगितले तर नाही म्हणत नाही हो, कांम चटकन करतो. तसा लाघवी आहे.” आजी एकदा  बोलालयला लागली की थांबणे कठीणच!

“संध्याकाळी चिंटू आला होता आणि फ्रीज उघडून पाणी प्याला. मी फ्रीजच दार हळू लाव आणि ग्लास विसळून ठेव सांगितलं तर तसाच पळाला. मीच राहिलेलं उष्ट पाणी टाकून ग्लास विसळून ठेवला. मग मिनी आली. पोरगी गुणांची हो! ग्लास विसळून स्वच्छ पुसून जागेवर ठेवला. हात सावकाश आहे पण नेटका आहे बरं. शेवटी मोंटू आला. मी पिशवी भरून दिली त्याला. पिशवीभरे पर्यंत वरती जाऊन बाबा आलेत का बघून आला तेवढ्यात. स्वस्थ बसतच नाही दोन मिनिटं सुद्धा.”

“अरे हो, आज कचरा नेणाऱ्याची मुलगी पण आली होती त्याचा बरोबर. चांगले मार्क मिळाले तिला. पेढा देऊन नमस्कार केला मुलीने. मी पण तिचे तोंड गोड केले काहीतरी देऊन. काय ते आठवत नाही बाई आत्ता.”

मग आजोबांनी मुलांना विचारले “ग्राउंड पासून चालत यायला किती वेळ लागतो” पळत आणि सायकलवर किती लागेल? मुलांनी एकच गदारोळ केला 2 किंवा फारतर फार तीन वर एकमत झाले शेवटी. मग आजोबा जऱ्या करड्या आवाजातच मुलांना म्हणाले ” बी सिरीयस वाँटसन्स. गेट टू गेट 500 मीटर अंतर, म्हणजे एक किलोमीटर मूलं जाऊन आली. मिने, गूगल कर जरा.” मिनीने सांगितले, “चालण्याचा स्पीड साधारण 10 ते 12 मिनिट प्रति किलोमीटर असतो, तर सायकलवर, धावत 7 ते 8 मिनिट लागतील.”

आजोबा म्हणाले “आजी गेव्ह समथिंग, चिंटू धावत गेला होता, आणि मिने तू  आणि मोंटू ने सायकल वापरली …, दॅट वी नो सो फार. सो हु टुक द फोर्थ चॉकलेट?”

आजोबांचा संशय कुणावर आहे सांगू शकाल?

****************************************

गोष्ट, लेसन प्लॅन पूर्ण करण्यापूर्वी थोडी पार्शवभूमी

****************************************
हा उपद्व्याप कशासाठी?

उद्दिष्ट: हा धडा पूर्ण केल्यावर, विद्यार्थी खाली नमूद केलेल्या संकल्पना प्रत्यक्षात कश्या करता येतील हे कथित सत्य/काल्पनिक प्रसंगाच्या अनुषंगाने करून दाखवू शकेल.
★ चिकित्सक विचार सारणी
★ प्रभावी संभाषण / संप्रेषण कौशल्य
★ सहसंवेदना
★ नात्यांची जपणूक
★ निर्णय क्षमता

जागतिक आरोग्य संघटनेचे जागतिक स्तरावर १० जीवन कौशल्य मांडली आहेत. २००९ पासून प्राथमिक शिक्षणाचा अब्यासक्रमात यांचा समावेश करण्यात आला आहे. (नोंद: मला इंटरनेटवर दुसरी पुष्टि मिळाली नाही, पण ही माहिती Ujjwala D. Lonkar, Ph.D. Principal Sharadabai Pawar College of Education for Women यांच्या अभ्यास निबंधातून मिळाली त्याची कडी शेवटी देतो.)

WHO जीवन कौशल्य यादी:
1. स्वत: बद्दलची जागृती Self Awareness
2. दुसऱ्याचा भावना समजावून घेणाऱ्या सहसंवेदना Empathy
3. चिकित्सक विचार सारणी Critical Thinking
4. सर्जनशील / सृजनशील सारणी Creative Thinking
5. निर्णय क्षमता Decision Making
6. समस्या निवारण Problem Solving
7. प्रभावी संभाषण / संप्रेषण कौशल्य Good Communication
8. नात्यांची जपणूक Interpersonal Relationship
9. तणाव व्यवस्थापन Management of Stress
10. भावनांची यशस्वी जुळवणी Management of Emotions

(Source: LIFE SKILLS by Dr. C. Karthik Deepa लिंक खाली दिली आहे.)

नौकरीसाठी लागणाऱ्या महत्वाच्या कौशल्यात सुद्धा हे दशभुतं सापडतात.  (गूगल करा, भरपूर दाखले मिळतील.) आणि याच दशभूतांचा अभाव, हजारो विद्यार्थ्यांना डिंगऱ्या असूनही नौकरी कामधंद्या पासून वंचीत ठेवतो. नौकरीचा इंटर्व्हियु असो किंवा आपले उत्पादन-सेवा विक्रीचा प्रयास असो, या कौशल्यांचा अभाव यशा पासून दूर ठेवतो. सेल्स टॉक किंवा इंटर्व्हियू मधे गोऱ्या गोमट्या नेटक्यांना पसंती मिळते हे हरलेल्यांची वायफळ बोंब कशी रूढ झाली कोण जाणे, पण सत्य सांगणाऱ्यांचा अभावही आश्चर्यकारक आहे. असो. इंटर्व्हियु घेणारे तज्ञ असतात, (वर दिलेले) जीवन कौशल्य शोधत असतात हे जाणून पुढे जाऊ.

शैक्षणिक अभ्यासक्रमात हे कौशल्य कसे शिकवले जातात हे पाहणे आवश्यक आहे. त्यासाठी शिक्षण मंडळाने शिफारस केलेल्या पाठ्यपुस्तकात दिलेले नमुना लेसन प्लॅन मधून (शिकवण्याची प्रस्तावित योजना) काही अंशी प्रयत्न असावा असे मला वाटले, बालभारती,  कुमारभारती असे प्लॅन निर्माण केलेले दिसतात. NCERT कडून ही मार्गदर्शक वाङ्मय छापले जाते, पण ते वाचून मी साशंक राहिलो.

परीक्षेत शिकवले ते शिकले का हे बघितले जाते. पण WHO लाईफ स्किल कौशल्यांना  परिक्षेत बघितलं जाते का हे पण पाहण्याचा मी प्रयत्न केला. मॉडेल क्वसचन पेपर बघितल्यावर या उद्दिष्टांकडे तितकेसे लक्ष दिले जात असावं असे वाटतं नाही.

स्मृती आणि बुद्धी दोन्ही कृती प्रयत्नांवर आधारित आहेत. मानस शास्त्राच्या भाषेत “अकॅडेमिक रिगर – काठिण्य” आवश्यक आहे. ज्ञान, कसब, हातोटी, कौशल्य प्राविण्य … आपसूक मिळत नाही. कष्ट, साधना आवश्यक आहे. (Experiential learning theory आणि बऱ्याच अभ्यासातून ह्याला दुजोरा मिळतो.)

पण टीका सोपी असते अशी टीका करणार्यांनी त्यांच्या मते योग्य काय हे पण सांगितलं पाहिजे आणि त्यावरची टीका टिप्पणी स्वीकारली पाहिजे. म्हणून मी प्रयत्न करून पाहतो आहे. शैक्षणिक साहित्यात “गोष्ट” हा एक महत्वाचा घटक आहे. चांगली गोष्ट लक्ष वेधत, विचार प्रवृत्त करते, शिकवते आणि लक्षात राहते. शिक्षणात त्याचा प्रयोग कसा करावा? इयत्ता 4-6 साठी एव्हीडेन्स बेस्ड रिझनिंग, चिकित्सक विचार शिकवण्यासाठी एक प्रायोगिक लेसन प्लॅन. माध्यम लेखन सीमा पाळण्यासाठी फार तपशिलात जात नाही. Review सूचना प्रतिक्रिया विचार जरूर सांगा.

****************************************

लेसन प्लॅन – वर्गात काय कराव

****************************************

*********  पाहिले सत्र: प्रस्तावना आणि विचार आरंभ

प्रथम आपले उद्दिष्ट आणि आपण काय करणार आहोत हे वर्गाला सांगा. सत्रात भाग घेण्याचे नियम सांगा.  गोष्टीची छापील प्रत सगळ्यांकडे आहे ही खात्री करा. मग गोष्ट वाचून दाखवा.

गोष्ट वाचुन झाल्यावर मुलांचे गट करा. प्रत्येक गटाला आपापसात चर्चा करून आजोबांचा संशय कुणावर असेल याचे उत्तर शोधायला सांगा. मुलं चर्चा करताना त्यांचा प्रश्नांचे उत्तर फक्त गोष्टीत दिलं आहे तेव्हडेच द्या, वाढवू नका. उत्तर नसेल तर, दिलेली नाही असं सांगा.

पंधरा मिनिटांनी, एक एक गटास आपले मत मांडण्यास सांगा. कुठलीही टीका टिप्पणी नको. फक्त छान, उत्तम असे कौतुक करा. पुढे आपण डिटेल चर्चा करू असे सांगा. कुणी चोर कोण हे सांगितलं तर ते स्वीकारून त्याची नोंद ठेवा.

*********  दुसरे सत्र: शास्त्रीय विचार पद्धत

इंग्रजीत दिलेलं शेरलॉक होम्सचे वाक्य समजावून सांगा. (It is a mistake to theorize … माहितीचा आधार घेऊनच विचार व्यक्त केले पाहिजे. आधीच काहीतरी ठरवून किंवा पूर्वग्रह करून मिळणारी माहिती त्याला जुळवण्यासाठी वेडीवाकडी तोडू-दुमडू नये. हे चुकीचं आहे.)

विचार करण्याची विविध पद्धती सांगा. Logical, Deductive, Analytical, Scientific, Evidence based reasoning म्हणजे काय हे सांगा. (वाचकहो, अधिक माहिती: गूगल गुरुजी!)

मुलांना प्रथम सर्व शक्यता मांडायला सांगा. उदा:
1. एक चॉकलेट दुकानंतच राहिल्या/पडल्यामुळे तीनच आणले होते.
2. आजीने कचरेवाल्याच्या मुलीला दिले आणि विसरली.
3. आजोबांनीच खाल्लंपण आजी रागवेल म्हणून सांगत नाहीत.
4. आजीने खाल्ले, पण आजोबा रागावतील म्हणून सांगत नाही.
5. चिऊ आलीच नव्हती पण बाकीचे तिघे आले होते. त्यामुळे तिघांपैकी एक कुणीतरी घेतलं असेल. सगळे रागावतील म्हणून सांगत नाही.

आता फळ्यावर एक तक्ता तयार करा. पहिल्या कॉलममधे (उभी रांग) घरातल्या आणि आले-गेलेल्या लोकांची नावे लिहा. पहिल्या रो (आडवी रांग) वरती ज्ञात धागेदोरे असे लिहा (फॅक्टस अँड एव्हीडेन्स). त्याचा खाली दुसऱ्या रकान्यात स्वयंपाकघरात आले होते का असे लिहा. तिसऱ्या रकान्यात फ्रिजमधे डोकावले का असे लिहा. पुढचे रकाने रिकामे ठेवा.

दुसऱ्या कॉलम मधे व्यक्ती स्वयंपाकघरात आली होती का याचे उत्तर हो/नाही असे भरण्यास सुरू करा. एक दोन भरल्यावर मुलांना पूर्ण करायला सांगा. दहा मिनिटं वेळ देऊन मुलांना कुठे आलात विचारा आणि त्यांच्या सल्ल्याने फळ्यावरचा तक्ता भरा. जिथे नाही उत्तर येत त्या रोवर काट मारा – ही व्यक्ती आता संशयित नाही.

या तक्त्यावरून आता पाच संशयित आहेत असे सांगून गोष्टीचा पुढचा भाग सांगा.

**************************************************

गोष्टीचा पुढचा भाग

आजोबांनी आता मुलांकडे मोर्चा वळवला. मुलांना आज दुपारी कोण काय करत होता विचारले. आज आम्ही दुपारी एकत्र पिक्चर बघितला टीव्ही वर, खाली आलोच नाही असे मुलांनी सांगितले. कुणीही जागेवरून उठलं नाही? असे कसे होईल? पाणी प्यायला आणि बाथरूमला जायला उठलो, पण खाली कोणी आलं नाही, मुलं आपल्या सांगण्यावर ठाम होती.

आजोबांनी आपली संशयितांची यादी बघितली आणि …

**************************************************

वर्गात मुलांना विचार करून आपले मत मांडू द्या. (संशयितांच्या यादीत फरक होतो का असे विचारायला हरकत नाही.)

सर्वांना आत्तापर्यंतचा तपास वापरून निष्कर्ष मांडायला सांगा. निष्कर्ष मांडण्याची पद्धत POINT, EVIDENCE, EXPLAIN, (PEE) शिकवा.

हळूच यातून मोंटू यादीतून बाहेर पडतो इकडे त्यांना न्या. आता राहिले आजी, आजोबा, चिंटू आणि मिनी. पूर्ण निष्कर्षास येण्यासाठी अजून माहिती हवी याकडे मुलांना वळवा.

*********  तिसरे सत्र: चिकित्सक विचार – Critical Thinking

पहिल्या सत्रात कुणी कुणाचे नाव चोर म्हणून सांगितले त्याची आठवण द्या.

आता चार संशयित आहेत, तर पुढे कसे जावं हे मुलांना विचार करून सांगू द्या. सर्व रास्त सूचना स्वीकारा, जास्त टिप्पणी नको.

संपूर्ण आणि सर्वांगीण विचार न करता कुणावर आरोप करण्यामुळे नाते संबंधावर होणारे दुष्परिणाम सांगा. आपल्याच घरात, आपल्यासाठीच आणलेली वस्तू घेतली तर आपण चोर होतो का? खाल्ले असेल कुणी मुलांनी, राहीलं असेल मागे असं म्हणून सोडून दिले तर चालले असते का?

मुलांना विचार करू द्या, सर्व विचार स्वीकारून चिकित्सक विचारसरणी म्हणजे काय ते सांगा. (विषय विस्तारासाठी खाली लिंक आहे ती पहा हवे असल्यास.)

गोष्टीचा शेवटचं भाग सांगा.

**************************************************

गोष्टीचा पुढचा भाग

मग आजोबांनी स्वयंपाकघरात जाऊन कचऱ्याची टोपली बघितली. ती रिकामी होती.

“Once you eliminate the impossible, whatever remains must be the truth Watson!” ― Sherlock Holmes in The Sign of Four

आजोबा मिळालेल्या माहितीवर विचार करू लागले…
**************************************************

इंग्रजीत दिलेलं शेरलॉक होम्सचे वाक्य समजावून सांगा. (Once you eliminate the impossible,  …)

मुलांना निष्कर्ष सांगण्याचा प्रयत्न करू द्या. निष्कर्ष असा आहे: टोपलीत व्रँपर नाही म्हणजे दुपारी कुणीही चॉकलेट घेतलं नाही.

हा निष्कर्ष ग्राह्य धरला तर राहिले दोघेच – चिंटू आणि मिनी. त्यांनी ते घेतले असेल तर खाल्ले कधी? त्या एकलेअर्स – गोळ्या नव्हत्या, लांबडे चॉकलेट बार होते. खाण्यास 3 ते 4 मिनिटं वेळ लागेल! व्रँपर कुणी सहसा खिशात ठेवत नाही, टोपलीत टाकतात, किंवा आळशी तिथेच जेवणाच्या टेबलवर ठेवतील. म्हणून आजोबां एक चॉकलेट विसरले हाच योग्य निष्कर्ष. (आजीने कचरेवल्याचा मुलीला दिले आणि विसरली हा निष्कर्ष सुद्धा चालू शकेल.)

सारांश सांगा आणि धडा संपल्याचे सांगा. गृहपाठ म्हणून काय शिकलो ते लिहून काढायला सांगा.

*********** समाप्त  ***********

References:
• विद्यार्थ्यामध्ये चिकित्सक विचारांची रुजवणूक करणे काळाची गरज –  Ujjwala D. Lonkar, Ph.D. Principal Sharadabai Pawar College of Education for Women SCHOLARLY RESEARCH JOURNAL FOR INTERDISCIPLINARY STUDIES SJIF 2014 = 4.889 ISSN 2278-8808  http://www.srjis.com/pages/pdfFiles/146650614018.Lonkar%20Mdm.pdf
• National Education Policy 2020 document (includes the desirability of teaching critical thinking skills) https://www.education.gov.in/sites/upload_files/mhrd/files/NEP_Final_English_0.pdf
• WHO LIFE SKILLS Dr.C.Karthik Deepa Assistant Professor Department of Education Avinashilingam University
(https://www.slideshare.net/mobile/deepachitravel/life-skills-39480615)
• Balbharati books  http://cart.ebalbharati.in/BalBooks/ebook.aspx

— राजा वळसंगकर
4.2.2021

 

Avatar
About राजा वळसंगकर 18 Articles
नमस्कार. मी व्यवसायाने इन्स्ट्रक्शनल डिझाइनर आहे. शैक्षणिक मजकूर / साहित्य उत्तम शिकता कसे येईल ह्याचा शास्रोक्त विचार करून ई-लर्निंग प्रणाली तयार करावी लागते. सादर करण्यासाठी नाटक / चित्रपटाच्या स्क्रिप्ट (स्टोरी बोर्ड) प्रमाणे मजकूर पुनः बांधणी करून लिहावा लागतो. नंतर या स्क्रिप्ट प्रमाणे प्रणालीकरते (प्रोग्रामर्स) संगणकावर किंवा मोबाइलवर चालणारी प्रणाली तयार करतात. सादरीकरणासाठी मजकूर अँड स्क्रिप्ट तयार करणे हे माझे मुख्य काम. ह्यातला मुख्य अभ्यासाची तोंड ओळख मराठीतुन करून देण्याचा माझा लेखन प्रपंच. अभिप्राय - प्रतिक्रिया - crabhi@hotmail.com

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..