नवीन लेखन...

आशय फिल्म क्लबचे संस्थापक-सचिव सतीश जकातदार

काही माणसं विशिष्ट ध्येय-उद्दीष्ट घेऊनच जन्माला येतात. त्यांच्या नावातच त्यांची ओळख समावून जाते. सतीश जकातदार हे व्यक्तिमत्व त्यातलंच!

आशय फिल्म क्लबचे संस्थापक-सचिव, सिनेपत्रकार व सिनेचळवळीचे संयोजक सतीश जकातदार यांचा  जन्म २७ ऑक्टोबर १९५५ रोजी झाला.

सतीश जकातदार आणि चित्रपट, सतीश जकातदार आणि आशय फिल्म क्लब ही ओळख अगदी पक्की होऊन गेलीय.

सतीश जकातदार मनोहर मासिकांत सिनेमावर लेखन करीत असत. शिवाय माणूसमध्ये ते कलात्मक चित्रपटांवर लेखन करत असत. अमोघ श्रीवास्तव, सलील आदर्श, अशी टोपणनावे घेऊन ते लेखन करीत असत. कॉलेजमध्ये असताना सतीश जकातदार यांनी प्रभाकर वाडेकरांच्या अर्थ काय या बेंबीचा नाटकात अभिनय केला होता. ऐंशीच्या दशकात जेव्हा दूरदर्शनचा उदय झाला त्याच दशकात ‘फिल्म क्लब’ सारखी चळवळ उभी करण्याचं महत्वाचे काम सतीश जकातदार यांनी केले. सांस्कृतिक दृष्टया संपन्नता असलेल्या, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय आणि फिल्म इन्स्टिट्यूट यासारख्या संस्थांमुळे पुण्यात चित्रपट विषयक घडामोडींनी चांगला जोर घेतला होता. पण तरीही या शहराची, इथल्या समाजाची एक गरज होती ती दुर्लक्षित राहिली होती आणि याचीच पूर्तता व्हावी या उद्देशाने सतीश जकातदार, वंदना भाले, दीपक देवधर, प्रभाकर वाडेकर, प्रसन्नककुमार अकलूजकर आणि मुकुंद संगोराम या चित्रपटप्रेमी मंडळींनी एकत्र येऊन १ ऑगस्ट १९८५ रोजी आशय फिल्म क्लबची स्थापना केली.

एक सुजाण प्रेक्षक तयार व्हावा या उद्देशाने जकातदारांनी चित्रपटाच्या बरोबरीने त्यावर चर्चाही घडवून आणल्या. फिल्म क्लबमध्ये जाऊन चित्रपट बघणं हे नवीन नव्हतं पण बघितलेल्या चित्रपटांवर चर्चा करणं हे मात्र नवीनच होतं.

सतीश जकातदार यांनी चित्रपट संग्रहालयाच्या वाटचालीवर आधारलेल्या प्रिझव्र्हेशन ऑफ मूव्हिंग इमेजेस या लघुपटाचे दिग्दर्शन केले आहे. लघुपटाची निर्मिती वंदना भाले यांची आहे. सतीश जकातदार यांनी वंदना भाले यांच्या साथीने मल्लिकार्जुन मन्सूर यांच्यावर एक लघुपट तसेच टोवर्डस बेटर टुमॉरो हा अनुबोधपटही काढला होता.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4334 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..