नवीन लेखन...

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग ३२)

खरं तर नगरमध्ये बरेच कार्यक्रम झाले त्याचे श्रेय माझे परमस्नेही विद्यमान श्री. सर्वोत्तम क्षीरसागर की जे पुण्यातील आमच्या सप्तर्षी मित्र मंडळ व महाकवी कालिदास प्रतिष्ठान या संस्थानच्या अगदी स्थापनेपासून माझ्या सोबतच होते. अत्यन्त उत्साही आणी हरहुन्नरी असे हे व्यक्तिमत्त्व! पुढे ते पुण्यातून नगर येथे स्थायिक झाले. पण पुण्यात त्यांचे वारंवार येणे असे त्यामुळे आमचा संपर्क सतत असे. त्यांचा स्वभाव मुळात व्यासंगी असल्यामुळे ते अजातशत्रू , सर्वत्र मैत्रभाव जपणारे आहेत. नगरमध्येही त्यांचे सर्व क्षेत्रात जिव्हाळ्याचे संबंध आजही आहेत. नगरमध्ये अनेक संस्थांवर आजही कार्यरत आहेत. तेंव्हा त्यांच्यामुळे मला नगर येथे अनेकवेळा माझे कार्यक्रम करण्याची संधी लाभली. या बाबत गेल्या ३१ व्या भागात लिहिले आहेच. पण नगर परिसरातील साहित्यिक मांदियाळी मला जी भेटली ती केवळ मित्रवर्य सर्वोत्तमजी क्षीरसागर यांचे मुळे. त्यांचेही पुस्तक प्रकाशित आहे.

नगरमधील नांवे मी मुद्दाम खाली उद्घृत करीत आहे की ज्यांचे साहित्य पुस्तक रूपाने प्रकाशित झाले आहे. त्यामध्ये सर्वश्री अनिल सहस्त्रबुद्धे, डॉ.लीला गोविलकर , सुधीर द. फडके, शुभदा कुलकर्णी, चंद्रशेखर करवंदे , ज्येष्ठ साहित्यिक डॉ. मनोहर बोपर्डीकर, नंदकुमार ब्रह्मे, रोहिणी उदास , पद्माकर देशपांडे, सौ.सुनंदा धर्माधिकारी, इंजिनिअर देवेंद्रसिंग वधवा, प्रा.पी.डी.ऋषी. आणखी एक अत्यन्त महत्वाचे म्हणजे या सर्वांमध्ये श्रीकृष्ण वसंत तांबे की जे कै.भा.रा.तांबे यांचे नातु यांची माझी कार्यक्रमात भेट झाली हा आनंद आगळा अविस्मरणीय आहे. या सर्वच साहित्यिकांमध्ये ज्यांना भीष्माचार्य म्हणावे असे नगरच्या शैक्षणिक, सांगीतिक आणि सामाजिक क्षेत्रातल्या प्रत्येकाचे मार्गदर्शक असलेले अर्ध्वयू!

माननिय डाॅ.मधुसूदन नागेशराव बोपर्डीकर सरांचा व माझा परिचय सर्वोत्तमजींच्यामुळे झाला होता. वयाच्या ८५व्या वर्षी देखील तरुणाईला लाजवेल असा कायम उत्साह असणाऱ्या बोपर्डीकरांनी डॉ. रामचंद्र देखणे यांच्या सत्कार समारंभात त्यांनी स्वतः लिहिलेल्या अत्यन्त उत्तम प्रासादिक शब्दातले मानपत्राचे स्वतः वाचन केले होते तो क्षण, तो उत्साह मला आजही स्मरतो आहे. बोपर्डीकर सर तसे मूळचे वाईचे. आणि माझे गुरुवर्य, कविवर्य प्रा. द.वि. केसकर हेही वाईचे त्यामुळे आमची खूप जवळीक झाली होती. हाही माझा भाग्ययोगच होता.

सर शिक्षणासाठी नगरला आले आणि नगरचेच झाले. नगर मधील प्रसिद्ध अशा हिंद सेवा मंडळाच्या सारडा महाविद्यालयात अनेक वर्षे प्राध्यापक आणि प्राचार्य म्हणून त्यांनी काम पाहिले. रयत शिक्षण संस्था, नगर काॅलेज अशा विविध ठिकाणी त्यांनी अध्यापन केले. मराठी, संस्कृत, प्राकृत आणि अर्धमागधी अशा तब्बल चार विषयांमध्ये त्यांनी एम.ए. च्या पदव्या संपादित केल्या. अगस्ती ऋषीं विषयीच्या प्रबंधावर त्यांना ‘विद्या वाचस्पती’ पदवी (Doctorate) प्रदान करण्यात आलेली आहे. “प्राचीन भारताचा इतिहास” आणि “हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत” हे त्यांचे विशेष आवडीचे विषय. हार्मोनियम वादनामध्ये त्यांनी गांधर्वची अलंकार पदवीही संपादित केली. तेंव्हा ते संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले आहेत.

आजवर त्यांनी लिहिलेली कथा, काव्य आणि ललित लेखनाची शंभर पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. स्वरानंद प्रबोधिनी नगर स्वरानंद भक्तीमंडळ, रियाझ मंच, स्वानंद बाल संस्कार केंद्र अशा विविध संस्थांच्या माध्यमातून त्यांनी अनेकानेक उपक्रम आणि कार्यक्रम केले. अनेकांना घडवलं. अनेक जुने नवे कलाकार एकत्र आणले. या कामी त्यांच्या सुविद्य पत्नी सन्माननीय कुमुदिनी मॅडम सुद्धा हिरिरीने आणि सरांच्या इतक्याच अग्रेसर असायच्या! अनेक संगीत मैफलींमधून दिग्गज कलाकारांना संवादिनीची आणि असंख्य संगीत नाटकांच्या गायक – गायिका नट – नट्यांना बोपर्डीकर सरांनी गावोगाव फिरुन ऑर्गनची बहारदार साथ संगत केलेली आहे. त्यांना मिळालेल्या सन्मान आणी पुरस्कारांनी सुद्धा शंभरी पार केलेली असावी. महाराष्ट्र शासनाच्या महाकवी कालिदास पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे.

अशा दिगग्ज व्यक्तिमत्वाचा सहवास आम्हाला लाभला त्यांनी पुणेकरांचा पु.ल.एक साठवण हा कार्यक्रम झाल्यानंतर आम्हा सर्व पुणेकरांना त्यांनी या संपादित केलेले गीतगोविंद हे राधाकृष्णाच्या निर्मल निर्मोही प्रितीचे सर्वांगसुंदर वर्णन असलेले अत्यन्त सुंदर आणी संग्राह्य असावे असे पुस्तक मला भेट दिले आणि मला म्हणाले “विगसा तुम्ही या पुस्तकावर अभिप्राय द्या!” हा सरांच्या मनाचा मोठेपणा होता.(पण इतक्या मोठया व्यक्तीच्या पुस्तकाला अभिप्राय देण्यास मी असमर्थ आहे हे मी जाणून होतो.)

मी वाचले त्यातून प्राचीन कवीवर्य जयदेव (इ.स. १२००) यांच्या अमोघ प्रतिभेचा मला आस्वाद घेता आला तसेच या पुस्तकाला लाभलेली ज्येष्ठ साहित्यिक कै. आनंद साधले यांचा भावानुवाद व प्रस्तावना वाचण्यास मिळाली. इतक्या साहित्यिक सारस्वतांचा परिचय केवळ माझे मित्र सर्वोत्तमजी क्षीरसागर यांचे मुळे झाला. त्यांचे आभार न मानता मी त्यांचा ऋणी आहे.

वि.ग.सातपुते.

9766544908. 

Avatar
About विलास सातपुते 459 Articles
मुद्रक, प्रकाशक, पत्रकार, संपादक, साहित्यिक (कवी,लेखक), संतचित्रकार, व्याख्याता व संस्थापक अध्यक्ष, महाकवी कालिदास प्रतिष्ठान, पुणे 41. व्यवसायात आजपर्यंत 1077 पुस्तकांचे मुद्रण केले आहे. स्वतःची 16 पुस्तके प्रकाशित आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..